agriculture news in marathi, agitation today due to ban for onion export, nagar, maharashtra | Page 2 ||| Agrowon

शेतकरी संघटनेचे आजपासून कांदा सत्याग्रह आंदोलन

टीम अॅग्रोवन
सोमवार, 7 ऑक्टोबर 2019

नगर  ः निवडणुका जिंकण्यासाठी कांदा उत्पादक शेतकरी आणि कांदा व्यापाऱ्यांचा बळी देण्याची सुरू झालेली प्रथा बंद झाली पाहिजे. निर्यात खुली करून, कांदा व्यापारावरील सर्व निर्बंध हटवण्यासाठी आजपासून (ता. ७) राज्यात कांदा सत्याग्रह आंदोलन सुरू केले जात असून कांदा बाजार बंद केले जाणार आहेत. निर्यात खुली करून सर्व निर्बंध हटविल्याचे आदेश पारित होईपर्यंत हे आंदोलन सुरू राहील, असे शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अनिल घनवट यांनी सांगितले. 

नगर  ः निवडणुका जिंकण्यासाठी कांदा उत्पादक शेतकरी आणि कांदा व्यापाऱ्यांचा बळी देण्याची सुरू झालेली प्रथा बंद झाली पाहिजे. निर्यात खुली करून, कांदा व्यापारावरील सर्व निर्बंध हटवण्यासाठी आजपासून (ता. ७) राज्यात कांदा सत्याग्रह आंदोलन सुरू केले जात असून कांदा बाजार बंद केले जाणार आहेत. निर्यात खुली करून सर्व निर्बंध हटविल्याचे आदेश पारित होईपर्यंत हे आंदोलन सुरू राहील, असे शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अनिल घनवट यांनी सांगितले. 
कांदा उत्पादक शेतकऱ्यांवरील अन्याय दूर होईपर्यंत शिवसेना-भाजप महायुतीच्या सभांवर बहिष्कार घाला, त्यांना मते देऊ नका असे आवाहन घनवट यांनी केले. 

नगर येथे रविवारी (ता. ६) आयोजित पत्रकार परिषदेत श्री. घनवट बोलत होते. नगरला येथील व्यापारी भवनमध्ये शेतकरी संघटनेची उच्चाधिकार बैठक झाली. बैठकीला श्री. घनवट यांच्यासह शेतकरी संघटना न्यासाचे कार्याध्यक्ष गोविंद जोशी, स्वतंत्र भारत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. मावेंद्र काचोळे, महिला आघाडीच्या सीमाताई नरोडे, युवा आघाडीचे अभिमन्यू शेलार, शशिकांत भदाणे, अर्जुन बोराडे, संतु पाटील झांबरे, विक्रम शेळके, बापुराव आढाव, शरद गद्रे, कारभारी कणसे, डॉ. संजय कुलकर्णी, धनाजी धुमाळ, अंबादास चव्हाण यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

श्री. घनवट म्हणाले, की निर्यात बंदी व साठ्यावरील मर्यादेमुळे कांद्याचे दर कोसळले आहेत. साठ्यांवरील मर्यादेमुळे व्यापाऱ्यांना कांदा खरेदी करणे अशक्य झाले आहे. घाऊक व्यापाऱ्याला पाच क्विंटलची मर्यादा घालणे म्हणजे कांदा व्यापाराचा अभ्यास नसणे आणि कांदा व्यापारी, शेतकऱ्यांची क्रूर थट्टा आहे. त्यामुळे शेतकरी संघटनेने आंदोलन पुकारले आहे. हे आंदोलन दोन टप्प्यात असेल. कांद्यावरील निर्बंध हटेपर्यंत कांदा व्यापार बंद ठेवण्यात येईल व शेतकऱ्यांना पूर्ण व्यापार स्वातंत्र्य व तंत्रज्ञान स्वातंत्र्य दिले जात नाही तो पर्यंत भाजप- शिवसेनेच्या सभांवर बहिष्कार घालणे व त्यांच्या उमेदवारांना मतदान न करण्याची भूमिका शेतकरी घेतील. 
शहरी ग्राहक संघटित मतांच्या ताकदीवर सरकारे पाडतात. त्यांची दहशत राज्यकर्त्यांच्या मनावर आहे. निवडून येण्यासाठी शेतकरी, व्यापाऱ्यांचा बळी दिला जातो. कोणताही असा निर्णय घेण्याअगोदर सरकार कांदा व्यापारी किंवा शेतकरी प्रतिनिधींचा विचार घेण्याची तसदी सुद्धा घेत नाही हे अत्यंत घातक आहे. या पुढे असा अन्याय सहन करण्याची वेळ येऊ नये म्हणून या निवडणुकीत शेतकऱ्यांनी आपल्या मताचा हिस्का दाखवून द्यावा. शासनाने शेतकरी व व्यापारी प्रतिनिधींशी चर्चा करून निर्बंध हटविण्याबाबत चर्चा करावी, अशी अपेक्षा श्री. घनवट यांनी व्यक्त केली.  
 
‘...तर जशास तसे उत्तर’
अनिल घनवट म्हणाले, की शेतकरी हितासाठी संघटना काम करत आहे. निर्यात खुली करून, कांदा व्यापारावरील सर्व निर्बंध हटविण्यासाठी हे आंदोलन केले जात आहे. हे आंदोलन अधिक तीव्र होईल. आंदोलन कोणी मोडण्याचा प्रयत्न केला तर त्याला जशाच तसे उत्तर दिले जाईल.
 


इतर ताज्या घडामोडी
कोरिवडेतील पूरबाधित क्षेत्राचे चुकीचे...आजरा, जि. कोल्हापूर  ः कोरिवडे (ता. आजरा)...
मर्जीतील लोकांना हळद रोपांचे वाटप,...सिंधुदुर्ग : अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून मर्जीतील...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील पाच...नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील १२६...
खानदेशात अभूतपूर्व खतटंचाईजळगाव ः खानदेशात युरिया, १०.२६.२६, दाणेदार सुपर...
फर्टिगेशन करताना घ्यावयाची काळजीठिबक सिंचनाद्वारे पिकांचे पाणी व्यवस्थापन करताना...
मराठवाड्यातील पाणी टंचाईग्रस्त...औरंगाबाद : साधारणपणे आठवडाभरापूर्वी १४२ वर असलेली...
पालखी मार्गावरील शेतकऱ्यांच्या अडचणीवर...अकलूज, जि. सोलापूर : पुणे ते पंढरपूर या पालखी...
तीळ लागवड तंत्रतीळ हे भारतातील सर्वांत जुने तेलबिया पीक आहे....
शेतकरी नियोजन (पीक कापूस)पीक - कापूस गणेश शामराव नानोटे, निंभारा, ता....
जळगावात हिरवी मिरची १८०० ते ३००० रुपये...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी (...
तंत्र मका लागवडीचे...पावसाचे प्रमाण तसेच जमिनीच्या मगदुराप्रमाणे...
हिंगोली जिल्ह्यातील कर्जवाटपात व्यापारी...हिंगोली : जिल्ह्यातील विविध बॅंकांनी गुरुवार (ता....
नांदेड, परभणी, हिंगोलीत पावसाची ६०...नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील ६०...
सोलापूर जिल्ह्यात ‘स्वाभिमानी’कडून...सोलापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने...
अकोला जिल्ह्यात ४० टक्के क्षेत्र...अकोला ः जिल्ह्यात जून महिन्यात असमतोल स्वरूपाचा...
ग्राहकांच्या वीजबिलाच्या तक्रारी...सोलापूर : वीज ग्राहकांच्या बिलविषयक तक्रारी...
‘स्मार्ट’ योजनेअंतर्गत देवळा ॲग्रो...नाशिक : जागतिक बँक अर्थसहाय्यित बाळासाहेब ठाकरे...
नगर जिल्ह्यात ९१ हजार हेक्टर क्षेत्रावर...नगर ः यंदा सुरुवातीलाच चांगला पाऊस झाल्याने...
वाशीम जिल्हा परिषद करणार दुधाळ...वाशीम : जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागामार्फत...
पुणे जिल्ह्यात उघडिपीनंतर पुन्हा...पुणे ः यंदा जूनच्या सुरुवातीपासून पावसाने चांगली...