‘टेंभू’ पाणीप्रश्नी शेतकऱ्यांचे कडेगाव तलावात जलआंदोलन

टेंभू योजनेच्या पाणीप्रश्नी आंदोलन करताना शेतकरी
टेंभू योजनेच्या पाणीप्रश्नी आंदोलन करताना शेतकरी

कडेगाव, जि. सांगली  : टेंभू योजनेचे पाणी खंबाळे औंध येथून मुख्य कालव्यातून बंदिस्त पाइपलाइनद्वारे कडेगाव लघुपाटबंधारे तलावात सोडावे. कडेगाव तलाव ‘टेंभू’च्या लाभ क्षेत्रात घ्यावा. ‘टेंभू’चे पाणी ६ आवर्तनांद्वारे द्यावे. कडेगाव कालव्याची हद्द निश्चित करावी आदी मागण्यासाठी येथील शेतकऱ्यांसह सामाजिक कार्यकर्ते डी. एस. देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवारी (ता.४) जल आंदोलन सुरू झाले.

कडेगावसह परिसरातील शेतकरी टेंभू योजनेच्या पाण्यापासून वंचित राहत आहेत. यासाठी जलसमाधी आंदोलन पुकारण्यात आले आहे. टेंभू योजनेच्या अधिकाऱ्यांनी या मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु या मागण्या अद्याप पूर्ण न झाल्याने येथील शेतकऱ्यांनी बुधवारी गनिमी काव्याने कडेगाव तलावात जल आंदोलन सुरू केल्याचे सामाजिक कार्यकर्ते डी. एस. देशमुख यांनी सांगितले. यावेळी दत्तात्रय भोसले, अशोक शेटे, राजाराम माळी, जीवन करकटे, शिवाजी माळी, आनंदा रास्कर आदी शेतकरी उपस्थित होते.  कडेगाव तलावात जलआंदोलन करताना शेतकरी... पहा video

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com