agriculture news in marathi, agitation for water, pune, maharashtra | Agrowon

पाण्यासाठी भीमा नदीपात्रात ठिय्या आंदोलन
सकाळ वृत्तसेवा
रविवार, 19 मे 2019

 मांडवगण फराटा, जि. पुणे  : घोड आणि चासकमान धरण १०० टक्के भरल्यानंतरही पाण्याचे योग्य प्रकारे नियोजन न केल्याने भीमा नदीचे पात्र कोरडे पडले आहे. या दुष्काळी स्थितीमुळे पिण्याच्या पाण्याचा आणि शेतीचा प्रश्न गंभीर झाला आहे. पाण्याअभावी जळून चाललेली चारा पिके, फळपिकांचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, पिण्याच्या पाण्यासाठी टॅंकर सुरू करावेत या मागण्यांसाठी शनिवारी (ता. १८) राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे माजी आमदार अशोक पवार यांच्या नेतृत्वाखाली ठिय्या आंदोलन करण्यात आले. 

 मांडवगण फराटा, जि. पुणे  : घोड आणि चासकमान धरण १०० टक्के भरल्यानंतरही पाण्याचे योग्य प्रकारे नियोजन न केल्याने भीमा नदीचे पात्र कोरडे पडले आहे. या दुष्काळी स्थितीमुळे पिण्याच्या पाण्याचा आणि शेतीचा प्रश्न गंभीर झाला आहे. पाण्याअभावी जळून चाललेली चारा पिके, फळपिकांचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, पिण्याच्या पाण्यासाठी टॅंकर सुरू करावेत या मागण्यांसाठी शनिवारी (ता. १८) राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे माजी आमदार अशोक पवार यांच्या नेतृत्वाखाली ठिय्या आंदोलन करण्यात आले. 

शिरूर तालुक्याचा पूर्व भाग आणि दौंड तालुक्यात भीमा नदीचे पात्र कोरडे पडले आहे. या भागात जनावरांची संख्या मोठ्या प्रमाणात असून, पाणी आणि चाऱ्याअभावी दूध व्यवसाय अडचणीत आला आहे, तर पिण्याच्या पाण्याची टंचाई वाढत आहे. दुष्काळी स्थितीकडे शासनाने पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचे श्री. पवार यांनी सांगितले. यावेळी नायब तहसीलदार दिलीप जाधव यांना मागण्यांबाबत निवेदन देण्यात आले.  जिल्हा परिषदेच्या कृषी सभापती सुजाता पवार, वैशाली नागवडे, अप्पासाहेब पवार, रवी काळे, बाबासाहेब फराटे, मनीषा सोनवणे, सीमा फराटे, प्रतिभा बोत्रे, निर्मला ढवळे आदी या वेळी उपस्थित होते. 

इतर ताज्या घडामोडी
हवामान बदलाच्या अभ्यासासाठी नियामक मंडळ...मुंबई : हवामान बदलाचा मानवी आरोग्यावर होणाऱ्या...
शेतकऱ्यांना अनुदानावर सेफ्टी किटचा...यवतमाळ  ः दोन वर्षांपूर्वी जिल्ह्यात...
राष्ट्रीय पशू वाहतूक बंदीचा आर्थिक फटका...इंग्लंडमध्ये लाळ्या खुरकुत (एफएमडी), बोव्हाईन...
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीन डोंगर...सिंधुदुर्ग : अतिवृष्टीने खचलेल्या डोंगरांपैकी...
कॉंग्रेसच्या आजपासून ‘महापर्दाफाश' सभा...मुंबईः संपूर्ण राज्य भयंकर दुष्काळ आणि...
जानकर साहेबांची ताकत चौकात नाही; शिवाजी...मुंबई : राज्यात राष्ट्रीय समाज पक्षाची ताकत ...
ड्रायझोनमधील वरुडला ठिबक अनुदानातून...अमरावती  ः सर्वाधिक संत्रा लागवड व...
जलसमस्येवरील उपायांच्या प्रयत्नात...औरंगाबाद: मराठवाड्यासह राज्यात निर्माण होणाऱ्या...
नांदेड, हिंगोली, परभणी जिल्ह्यात...नांदेड  : नांदेड, परभणी, हिंगोली...
पुण्यात भाजीपाल्याची आवक, दर स्थिरपुणे  ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
पंतप्रधान शेतकरी मानधन योजनेच्या...वाशीम : केंद्र शासनाने शेतकऱ्यांसाठी सुरू...
झरे परिसरात महावितरणकडून वीजजोडणीस...झरे, जि. सांगली : झरे व परिसरातील घरगुती व...
परभणी जिल्ह्यात पीक कर्जवाटपाच्या गतीला...परभणी : चालू आर्थिक वर्षातील पहिल्या साडेचार...
देवळा तालुक्यातील ‘त्या’...नाशिक : मागील पंधरवड्यात कळवण, सुरगाणा तालुक्यात...
सोलापूर जिल्ह्यात दोन लाख वीज...सोलापूर : घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या...अकोला  ः भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय...
देश, राज्यात बेरोजगारी हेच मोठे आव्हान...नगर : मागील पाच वर्षांत नोटबंदीसारख्या...
साताऱ्यातील भूस्खलन बाधितांचा पुनर्वसन...सातारा  : अतिवृष्टी व भूस्खलनामुळे बाधित...
नगर झेडपीत सहा महिन्यांत माहिती...नगर  ः जिल्हा परिषदेतून विविध योजनांची...
...तर बारामतीची जागाही जिंकता आली असती...नागपूर  ः ‘ईव्हीएम’मध्ये गडबड करायची असती तर...