agriculture news in marathi, agitation for water rotation, aurangabad, maharashtra | Agrowon

जायकवाडीच्या पाण्यासाठी पाटबंधारे कार्यालयात शेतकऱ्यांचा ठिय्या
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 16 मे 2019

पैठण, जि. औरंगाबाद : जायकवाडी प्रकल्पातून आपेगाव व हिरडपुरी बंधाऱ्यात पाणी सोडण्याच्या मागणीसाठी दोन दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. बुधवारी (ता. १५) तिसऱ्या दिवशी शेतकऱ्यांच्या या आंदोलनाची धार तीव्र झाली. बुधवारी दुपारी १ वाजेनंतर शेतकऱ्यांनी जायकवाडी प्रकल्पानजीक असलेल्या पाटबंधारे विभागाच्या कार्यालयात ठाण मांडले. जोवर न्यायोचित भूमिका घेतली जात नाही तोवर कार्यालयातून न हटण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतला आहे.  

पैठण, जि. औरंगाबाद : जायकवाडी प्रकल्पातून आपेगाव व हिरडपुरी बंधाऱ्यात पाणी सोडण्याच्या मागणीसाठी दोन दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. बुधवारी (ता. १५) तिसऱ्या दिवशी शेतकऱ्यांच्या या आंदोलनाची धार तीव्र झाली. बुधवारी दुपारी १ वाजेनंतर शेतकऱ्यांनी जायकवाडी प्रकल्पानजीक असलेल्या पाटबंधारे विभागाच्या कार्यालयात ठाण मांडले. जोवर न्यायोचित भूमिका घेतली जात नाही तोवर कार्यालयातून न हटण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतला आहे.  

हाताला काम, जनावरांना चारा, आपेगाव व हिरडपुरी बंधाऱ्यात जायकवाडीतून पाणी सोडण्यासाठी गोदावरीच्या पात्रात पाणी सोडण्याच्या मागणीसाठी जलसमाधी आंदोलन करण्याचा इशारा अन्नदाता शेतकरी संघटनेच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी दिला होता. परंतु पोलिसांनी त्यांना प्रकल्पाच्या दिशेने जाऊ न दिल्याने शेतकरी सोमवारी (ता. १३) प्रकल्पाच्या भिंतीखालील गोदावरी पात्राच्या काठावर ठाण मांडून बसले. त्या दिवशी रात्रीही शेतकऱ्यांनी नदीपात्रात मुक्काम केला. या वेळी ठोस आश्वासन न देणाऱ्या शासन व प्रशासनाचा शेतकऱ्यांनी निषेध केला.

दरम्यान, मंगळवारी (ता. १४) सायंकाळपर्यंत मागण्यांविषयी ठोस भूमिका घेण्याचे प्रशासनाच्या सूत्रांनी कळविले. मात्र मंगळवारीही याविषयी ठोस निर्णय न झाल्याने आंदोलन सुरूच होते. बुधवारी तिसऱ्या दिवशी मात्र आंदोलक शेतकऱ्यांनी जायकवाडी प्रकल्पाजवळील पाटबंधारे विभाग नाथनगर(उत्तर)च्या कार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयात ठाण मांडले. आतून दरवाजा लावून जवळपास दोनशे शेतकऱ्यांनी स्वत:ला कार्यालयात कोंडून घेतल्याची माहिती ‘अन्नदाता’चे अध्यक्ष जयाजीराव सूर्यवंशी यांनी दिली. जोवर निर्णय होत नाही तोवर कार्यालयात बसून राहण्याचा निर्णय आंदोलक शेतकऱ्यांनी घेतला आहे. दुपारी साडेतीन वाजेपर्यंत याप्रकरणी निर्णय झालेला नव्हता. 

इतर बातम्या
`चांद्रयान २' चंद्राच्या कक्षेत दाखलनवी दिल्ली ः भारताची महत्त्वाकांक्षी...
अकोल्यातील प्रकल्पात अत्यल्पच साठाअकोला : यंदाच्या पावसाळ्याचे सुमारे अडीच महिने...
अकोला जिल्ह्यात ६० हजार हेक्टर क्षेत्र...अकोला ः यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यात असमतोल...
मराठवाड्यात २७ टक्केच पीक कर्जवाटपऔरंगाबाद : यंदाच्या खरिपासाठी शेतकऱ्यांना...
सिंधुदुर्गात कालव, जिताडा मस्त्यबीज...मुंबई : राज्यात सागरी उत्पादनवाढीस...
ठिबकला ८० टक्के अनुदान; आंदोलनाला...भोसे, जि. सोलापूर : राज्य शासनाने कोरडवाहू...
मांडाखळीत संत्रा बागांत फळगळपरभणी : कमी पाण्यामुळे जमिनीमध्ये ओलाव्याची...
रश्‍मी बागल यांचा शिवसेनेत प्रवेशसोलापूर : जिल्ह्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसची...
मांजरपाड्याचे पाणी दरसवाडी धरणात पोचलेनाशिक : येवल्याच्या दुष्काळी भागात पाणी...
माशांच्या पाच नव्या जातींचा घेतला शोध अरुणाचल प्रदेश राज्यातील इटानगर येथील राजीव गांधी...
राज्य बँकेची ३५ हजार कोटींची उलाढालमुंबई : अहवाल वर्षात इतिहासात ३५,४४० कोटी इतकी...
कोल्हापुरात मोहीम स्वरूपात पंचनाम्यास...कोल्हापूर: महापुराच्या प्रलयानंतर आता...
नाशिक जिल्ह्यात मक्यावर अमेरिकन लष्करी...नाशिक  : चालू खरीप हंगामात मका पिकावर मोठ्या...
सांगली जिल्हा बॅंकेच्या १२ शाखांचे...सांगली   ः महापुराचा फटका शेती आणि...
एकात्मिक शेती पद्धत वापरासाठी ‘कृषी’...मुंबई  : पीक उत्पादन वाढून शेतकऱ्यांचे...
`अतिपावसाने होत्याचं नव्हतं झालं`; पुणे...पुणे ः शेतकरी पाणीटंचाईच्या संकटातून सावरण्याचा...
अपघात विमा योजनेत शेतकऱ्यासह कुटुंबातील...मुंबई: गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा...
राज्यात पूरप्रवण क्षेत्राबाबत संशयकल्लोळपुणे : कृष्णा व गोदावरी नदीच्या खोऱ्यात सतत पूर...
पूरग्रस्तांसह अतिवृष्टीत पिके...कोल्हापूर   : पूरग्रस्तांसह अतिवृष्टीत...
युतीतील अनेक जण आमच्या संपर्कात ः अजित...यवतमाळ : राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस आणि...