नीरेचे पाणी न मिळाल्यास आज पुन्हा आंदोलन

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

सोलापूर   : नीरा उजवा कालवा पाण्यासंदर्भात सांगोला तालुक्‍यातील शेतकऱ्यांचे पंढरपूर येथील कार्यालयासमोरील धरणे आंदोलन आमदार गणपतराव देशमुख यांनी अधिकाऱ्यांशी फोनवरून चर्चा केल्यानंतर दोन दिवस स्थगित करण्यात आले. पण पाणी काही मिळाले नाही. आता पुन्हा आश्‍वासन मिळाले आहे. पण हे पाणी न मिळाल्यास शनिवारपासून (ता. ११) पासून पुन्हा धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. 

नीरा उजवा मैल ९३ खालील क्रमांक तीनवरील तालुक्‍यातील गावांना उन्हाळी हंगामातील पाणी आधिकाऱ्यांच्या गलथान कारभारामुळे मिळाले नाही. या पाण्यासाठी तालुक्‍यातील शेतकऱ्यांनी पंढरपूर येथील कार्यालयासमोर शुक्रवारी (ता. ३) धरणे आंदोलन केले होते. या वेळी आधिकाऱ्यांनी रविवारपासून (ता. ५) पाणी सोडण्याचे आश्‍वासन दिले होते. या आंदोलनावेळी शेतकऱ्यांबरोबर आमदार गणपतराव देशमुखही उपस्थित होते. पाणी न आल्याने शेतकरी पुन्हा बुधवारपासून (ता. ८) आंदोलन करणार होते.

परंतु आमदार गणपतराव देशमुख यांनी लाभधारक शेतकऱ्यांची सांगोला येथे बैठक घेतली. या वेळी आमदार देशमुख यांनी फलटण, पुणे, माळशिरस, पंढरपूर अशा विविध अधिकाऱ्यांबरोबर फोनवरून चर्चा केली. पाण्यासाठी अजून दोन दिवस अधिकाऱ्यांना वेळ द्यावा असे ठरले. शुक्रवारपर्यंत पाणी न आल्यास शनिवारपासून पुन्हा पंढरपूर येथील नीरा उजवा कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले जाईल, असा या बैठकीत निर्णय घेण्यात आला. त्यामुळे आता काय निर्णय होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com