`वाढीव वीज बिले माफ न केल्यास तीव्र आंदोलन करू`

वाढीव वीज बिलांच्या विरोधात भारतीय जनता पक्षातर्फे सोमवारी राज्यभर करण्यात आलेल्या आंदोलनाला प्रचंड प्रतिसाद मिळाला.
bjp agitation
bjp agitation

मुंबई : वाढीव वीज बिलांच्या विरोधात भारतीय जनता पक्षातर्फे सोमवारी राज्यभर करण्यात आलेल्या आंदोलनाला प्रचंड प्रतिसाद मिळाला. वीज बिलांची होळी करण्याच्या आंदोलनात राज्यभरातील कार्यकर्ते तसेच सामान्य नागरिकही सहभागी झाले होते. राज्य सरकारने वाढीव वीज बिले रद्द न केल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा भाजपने दिला आहे. राज्यभरात सुमारे २ हजार ठिकाणी हे आंदोलन करण्यात आले. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कराड (जि. सातारा) येथे आंदोलनात भाग घेतला. तर सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूर, वर्धा येथे आंदोलनात भाग घेतला. प्रदेश सरचिटणीस आ. देवयानी फरांदे यांनी नाशिक येथे आंदोलनात भाग घेतला. पक्षाचे सर्व प्रमुख पदाधिकारी, खासदार, आमदार, तसेच महापौर, जिल्हा परिषद अध्यक्ष, नगराध्यक्ष आदी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शेकडो लोकप्रतिनिधींनी या आंदोलनात भाग घेतला. मुंबई प्रदेश भाजपा अध्यक्ष आमदार मंगलप्रभात लोढा यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले. मुंबईत झालेल्या आंदोलनात आमदार अतुल भातखळकर, विद्या ठाकूर आदी सहभागी झाले होते.       नागपूर येथे आंदोलनात सहभागी होताना प्रदेश सरचिटणीस आणि माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले की, आपल्याच आश्वासनांना हरताळ फासणाऱ्या नाकर्त्या सरकारला जागे करण्यासाठी हे आंदोलन करण्यात येत आहे. 

नागपूर येथे आंदोलनात सहभागी होताना प्रदेश सरचिटणीस आणि माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले की, आपल्याच आश्वासनांना हरताळ फासणाऱ्या नाकर्त्या सरकारला जागे करण्यासाठी हे आंदोलन करण्यात येत आहे. लॉकडाऊन काळात दुकाने, ऑफिसेस बंद होती तरी लाखा लाखांची बिले अनेकांना पाठवण्यात आली. धंदा बंद असताना लाँड्री, सलूनसारख्या व्यावसायिकांनी बिले भरायची तरी कशी हा विचार सरकारने केला नाही. तेवढी संवेदनशीलताच या सरकारकडे नाही. बिल भरले नाही म्हणून गोरगरिबांच्या घरचा वीजपुरवठा तोडण्यासाठी महावितरण चे अधिकारी गेले तर भाजपा कार्यकर्ते त्यांना प्रतिबंध केल्याशिवाय राहणार नाहीत.  प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले... 

  • १०० युनिटपर्यंतची मोफत विजेचे आश्वासन पाळले नाही 
  • लॉकडाऊनच्या काळात भरमसाठ वीजबिले आली 
  • सरकारने बिलांमध्ये सवलत जाहीर केली होती 
  • वाढीव वीजबिल भरावी लागतील 
  • आश्वासनांपासून राज्य सरकार पळ काढत आहे 
  • सरकारच्या नाकर्तेपणामुळे सामान्य जनता भरडली जातेय 
  • वीज बिलांमध्ये सुधारणा होईपर्यंत आंदोलन चालूच राहील 
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com