नगर जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचे प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन 

जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचे आंदोलन
जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचे आंदोलन

नगर  ः जिल्हा परिषदेअंतर्गत काम करणाऱ्या संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या अनेक महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या मागण्या शासन स्तरावर दुर्लक्षित असल्याने याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शुक्रवारी कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषदेसमोर लाक्षणिक उपोषण केले. 

महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियन, जिल्हा परिषद लेखा कर्मचारी संघटना, जिल्हा परिषद आरोग्य सेवा कर्मचारी संघटना, जिल्हा परिषद ग्रामसेवक संघटना, महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कल्याण महासंघ, जिल्हा परिषद अपंग कर्मचारी संघटना, जिल्हा परिषद औषध निर्माण अधिकारी संघटना, महाराष्ट्र राज्य प्रयोगशाळा वैज्ञानिक कर्मचारी संघटना, जिल्हा परिषद लिपिक कर्मचारी संघटना, महाराष्ट्र राज्य बहुजन आरोग्य कर्मचारी संघटना, पशुचिकित्सा व्यवसाय कर्मचारी संघटना, महाराष्ट्र राज्य हिवताप निर्मूलन संघटना व सर्व मित्र संघटनेतील जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांनी एक दिवसाचे उपोषण केले.

सातवा वेतन आयोगातील खंड २ अहवालातील वेतन त्रुटी, लिपिक लेखा परिषद वाहनचालक, आरोग्य पशुसंवर्धन महिला व बालकल्याण स्थापत्य अभियांत्रिकी सहायक आरेखक व इतर संवर्गातील त्रुटी दूर कराव्यात. जुनी पेन्शन योजना लागू करावी, महाराष्ट्र विकास सेवा पदोन्नतीमध्ये कोटा वाढवावा, अनुकंपा तत्त्वावरील नियुक्तीमधील टक्केवारीची अट रद्द करून त्वरित शैक्षणिक पात्रतेनुसार नियुक्ती द्यावी, यांसह अन्य मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले.

त्यात सुभाष कराळे, राज्य समन्वयक विकास साळुंके, जिल्हाध्यक्ष किशोर शिंदे, जिल्हा सचिव व जिल्हा परिषद संवर्गीय कर्मचारी संघटनांचे अध्यक्ष, लेखा संवर्ग यशवंत सालके, वाकचौरे, एम. पी. कचरे, संजय कडूस, शशिकांत रासकर, ए. वाय. नरोटे, सोमनाथ भिटे, बाळासाहेब खुळे , राधेश्याम सपकाळे, के. के. जाधव, राजेंद्र म्हस्के, हेमंत कुलकर्णी, चंद्रकांत वाकचौरे सहभागी झाले होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com