Agriculture news in marathi, Agitations in Akot against recovery of electricity bills | Page 2 ||| Agrowon

वीजबिल वसुलीविरोधात अकोटमध्ये आंदोलन

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 26 नोव्हेंबर 2021

अकोला ः थकीत वीजबिल वसुलीसाठी एकीकडे महावितरणकडून कार्यवाही केली जात आहे. तोच आता शेतकरी रस्त्यावर उतरू लागले आहेत. याचे चित्र गुरुवारी (ता.२५) अकोट येथे पाहायला मिळाले.

अकोला ः थकीत वीजबिल वसुलीसाठी एकीकडे महावितरणकडून कार्यवाही केली जात आहे. तोच आता शेतकरी रस्त्यावर उतरू लागले आहेत. याचे चित्र गुरुवारी (ता.२५) अकोट येथे पाहायला मिळाले. महावितरणविरुद्ध रोष व्यक्त करण्यासाठी तालुक्यातील शेतकऱ्यांनी अकोट येथे धडक दिली. शेतकऱ्यांच्या एकजुटीसमोर अखेरीस अधिकाऱ्यांना एक पाऊल मागे येत वीजपुरवठा सुरू करण्याचे आश्‍वासन देत तातडीने कार्यवाही सुरू करावी लागली.

जिल्ह्यात वीजबिल वसुलीचा मुद्दा सातत्याने तापत आहे. अकोट तालुक्यात सिंचन क्षेत्र अधिक आहे. त्यामुळे कृषिपंपांची संख्याही मोठी आहे. अनेक शेतकऱ्यांकडे वीजबिलेही थकलेली आहेत. शेतकरी संघटनेने या मुद्यांवर महावितरणविरुद्ध रणशिंगही फुंकले. १३ नोव्हेंबरला संघटनेने महावितरण प्रशासनाला निवेदन देत विजबिले अनैतिक असल्याचे स्पष्ट केले. शेतकऱ्यांना दिलेले बिल त्यांच्याकडून घेणे लागत नाही. आठ तास पुरवठा सुरु असताना २४ तासांचे बिल देण्यात आले. यासाठीचे अनुदान कंपनीने मिळवलेले आहे, असे दावे शेतकरी संघटनेने केले होते. 

रोहित्र सुरु करण्यासाठी थकीत बिल भरण्याचे बंधन न घालता तातडीने दुरुस्ती करून द्यावी, अशी मागणी केली. मात्र, महावितरणने वीजबिल वसुलीसाठी काही ठिकाणी तालुक्यात रोहित्र बंद केले. याला विरोध करण्यासाठी विविध गावातील शेतकरी अकोट येथे धडकले.

शेतकरी संघटनेचे अध्यक्ष ललित बहाळे, सतीश देशमुख, जिल्हाध्यक्ष लक्ष्मीकांत कौठकर, शेतकरी विकास देशमुख यांनी शेतकऱ्यांच्या बाजूने युक्तिवाद केला. अखेरीस बंद केलेले रोहित्र तातडीने सुरु करण्याबाबत आश्‍वासन देण्यात आले. रोहित्र दुरुस्तीबाबत शुक्रवारी (ता.२६) होणाऱ्या बैठकीत चर्चा करून तोडगा काढण्याचे ठरविण्यात आले. शेतकऱ्यांच्या मागण्यांना न्याय न मिळाल्यास शनिवारी (ता.२७) शेतकरी संघटना तीव्र स्वरूपाचे आंदोलन करेल, अशी माहिती कौठकर यांनी दिली.


इतर बातम्या
खते मुबलक; पण किंमत जादा पुणे : राज्यात रब्बी हंगामात रासायनिक खतांची...
ज्येष्ठ विचारवंत डॉ. एन. डी. पाटील...कोल्हापूर ः ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत, माजी...
खानदेशात कांदा पिकाची दहा हजार हेक्टरवर...जळगाव ः खानदेशात कांदा पिकाची लागवड सुरूच आहे....
कांदाच बनला टुमदार बंगल्याची ओळख नाशिक ः  या नभाने या भुईला दान...
ईश्‍वेद समूहाच्या टिश्‍युकल्चर ...अकोला : सिंदखेडराजा येथील ईश्‍वेद बायोटेक टिश्‍...
कापूस आयात शुल्क  रद्दच्या विषयावरील...जळगाव ः कापसावरील आयात शुल्क रद्द करण्यासह वायदा...
नाशिकच्या स्टार्टअपचा राष्ट्रीय पातळीवर...नाशिक : केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष...
तूर विक्रीसाठी शेतकऱ्यांची  खुल्या...अमरावती : सोयाबीन व कापसानंतर खरीप हंगामातील...
‘गिरणा’चे वस्त्रहरण करणाऱ्यांवर कारवाई...चाळीसगाव, जि. जळगाव ः जळगाव जिल्ह्याची जीवनवाहिनी...
चांदवडमध्ये कांदा लिलाव सुरूनाशिक : अकरा जानेवारीपासून सोमवार (ता. १७) पर्यंत...
पुणे विभागात रब्बीतील कांदा लागवडीत वाढपुणे : आगामी काळात कांद्याला चांगले दर...
‘अशोक’च्या निवडणुकीत ‘लोकसेवा’ची सत्ता...नगर ः श्रीरामपूर तालुक्यातील अशोक सहकारी साखर...
ग्रामपंचायतींना इंटरनेट सेवा त्वरित...सोलापूर : जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतींना...
नगरमध्ये सहाशे शेतकऱ्यांना मिळणार... नगर ः शेतकऱ्यांना शेळीपालन, कुक्कुटपालन...
नांदेड जिल्ह्यात रब्बीत विक्रमी पेरणीनांदेड : पावसाळ्यात झालेल्या विक्रमी पावसामुळे...
शेतीमाल तारण योजनेत सात बाजार समित्याऔरंगाबाद : पणन मंडळाच्या औरंगाबाद विभागातील...
‘स्वाभिमानी’चे पीकविम्यासाठीचे ठिय्या...बुलडाणा : पीकविम्याच्या मुद्यावर चिखलीमध्ये...
उस्मानाबाद जिल्हा बँकेच्या संचालक...उस्मानाबाद : उस्मानाबाद जिल्हा बँकेच्या संचालक...
नगरच्या सहकारावर नागवडे, मुरकुटेंची पकडउस्मानाबाद : नगर ः जिल्ह्यात श्रीगोंदा...
तुरीच्या दरात काहीशी सुधारणाआठवडाभरात तुरीची आवक काहीशी मंदावली होती तसेच...