हातकणंगले येथे राजू शेट्टी यांना आंदोलकांचा विरोध

राजू शेट्टी
राजू शेट्टी

कोल्हापूर  : मराठा आरक्षणाच्या आंदोलनावेळी रविवारी (ता. २९) खासदार राजू शेट्टी यांना आंदोलनकर्त्यांनी विरोध केला. आंदोलनकर्त्यांची भेट घेण्यासाठी ते हातकणंगले येथे आले असता आंदोलकांनी ‘राजू शेट्टी चले जाव’ अशी घोषणा दिल्याने वातावरण गंभीर बनले. अखेर आंदोलकांच्या भावना पाहून त्यांनी तेथून निघून जाणेच पसंत केले.

रविवारी हातकणंगले येथे एका कार्यक्रमासाठी श्री. शेट्टी आले होते. शेजारीच मराठा आरक्षणप्रश्‍नी आंदोलन सुरू होते. यामुळे आंदोलकांना भेटून त्यांच्या भावना जाणून घेण्यासाठी ते आंदोलनस्थळी गेले. पण, श्री. शेट्टी यांचे आगमन होताच कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर प्रश्‍नांचा भडिमार करण्यास सुरवात केली. 

आरक्षण आमचा हक्क आहे. आमच्यासाठी कोणत्याच लोकप्रतिनिधींनी गंभीरपणे प्रश्‍न मांडले नाहीत. त्यामुळे आमच्या भावना तीव्र झाल्याचे आंदोलकांनी श्री. शेट्टी यांना सांगितले. खासदार शेट्टी यांनी आपण हा प्रश्‍न संसदेत मांडल्याचे सांगण्याचा प्रयत्न केला.परंतु, कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी झाल्याने श्री. शेट्टी यांनी तेथून जाण्याला प्राधान्य दिले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com