ग्रामसभेला जादा अधिकार हवेत

लोकशाहीच्या यशस्वितेसाठी, बळकटीसाठी ग्रामसभेला जादा अधिकार देणाऱ्या कायद्याची गरज आहे. तसा कायदा देशभरात करण्यासाठी जनशक्तीच्या दबावाची गरज आहे.असे आवाहन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केले आहे.
ग्रामसभेला जादा अधिकार हवेत Gram Sabha needs more rights: Anna Hazare
ग्रामसभेला जादा अधिकार हवेत Gram Sabha needs more rights: Anna Hazare

नगर (प्रतिनिधी) : लोकशाहीच्या यशस्वितेसाठी, बळकटीसाठी ग्रामसभेला जादा अधिकार देणाऱ्या कायद्याची गरज आहे. तसा कायदा देशभरात करण्यासाठी जनशक्तीच्या दबावाची गरज आहे. लोकपाल कायद्याप्रमाणे सरकारवर दबाव निर्माण करण्यासाठी जनतेने पुन्हा एकदा एकत्र यावे, असे आवाहन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केले आहे.  संविधान दिनानिमित्त हजारे यांनी जनजागृती व लोकशिक्षण या हेतूने व्हिडिओ प्रसारित करीत संदेश दिला. त्यात हजारे यांनी म्हटले आहे, की देशात लोकशाही यशस्वी करण्यासाठी ग्रामसभेला जादा अधिकार देणारा कायदा होणे गरजेचे आहे. सरकार फक्त जनआंदोलनापुढे झुकते. लोकशाही बळकट करण्यासाठी ग्रामसभेला जादा अधिकार देण्याची गरज आहे. कोणतेही सरकार आंदोलनास घाबरत नाही, तर ते सत्तेवरून पायउतार होण्यास घाबरते. त्यासाठी आंदोलनाच्या माध्यमातून जनतेने देशव्यापी जनरेटा निर्माण करणे गरजेचे आहे. जनआंदोलनातून सरकारवर दबावगट तयार होतो. देशाला स्वातंत्र्य मिळून इतकी वर्षे झाली, तरी देशात खरी लोकशाही आली नाही. अनेक पक्ष, त्यातून निर्माण झालेली झुंडशाही, या मुळे जनतेला खरी लोकशाही मिळाली नाही. देशात संसद, राज्यात विधानसभा, तशी गावात ग्रामसभा व शहरात प्रभाग सभा, अशी रचना करणारा कायदा होणे गरजेचे आहे. सरकारी खजिना जनतेच्या मालकीचा आहे. त्यामुळे सर्व आर्थिक व्यवहार पारदर्शक झाले पाहिजेत. गावातील सर्व निर्णय ग्रामसभेच्या संमतीने घेणे गरजेचे असल्याचे हजारे म्हणाले.  स्वातंत्र्यानंतरही जनआंदोलनातून अनेक कायदे तयार झाले. आता खऱ्या लोकशाहीसाठी लढा देणे गरजेचे आहे. जनआंदोलन हे मोठे हत्यार असल्याचा विसर जनतेला पडला आहे. लोकपाल आंदोलनाच्या वेळी जनता जशी जागृत झाली होती, त्याप्रमाणेच पुन्हा जागृत झाल्यास लोकशाही बळकट करणारा, ग्रामसभेला जादा अधिकार देणारा कायदा होऊ शकतो, असे हजारे यांनी म्हटले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com