‘वनाकृवि’, तेलबिया संशोधन संस्था यांच्यात करार 

तेलबियांवर संशोधनासाठी हैदराबाद येथील भारतीय तेलबिया संशोधन संस्था आणि परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ यांच्यात सोमवारी (ता. २२) हैदराबाद येथे सामंजस्य करार करण्यात आला.
Parbhani
Parbhani

परभणी ः  तेलबियांवर संशोधनासाठी हैदराबाद येथील भारतीय तेलबिया संशोधन संस्था आणि परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ (वनामकृवि) यांच्यात सोमवारी (ता. २२) हैदराबाद येथे सामंजस्य करार करण्यात आला.  कुलगुरू डॉ. अशोक ढवण यांच्‍या प्रमुख उपस्थितीत भारतीय तेलबिया संशोधन संस्थेच्‍या संचालिका डॉ. एम. सुजाता, विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर यांनी करारावर सह्या केल्या. या वेळी विद्यापीठातील लातूर येथील तेलबिया संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. एम. के. घोडके, संशोधन संपादक डॉ. मदन पेंडके, हैदराबाद येथील शास्त्रज्ञ डॉ. सुधाकर बाबू, डॉ. रत्नकुमार उपस्थित होते. भारतीय तेलबिया संशोधन संस्‍था देशातील तेलबिया पीक संशोधनात अग्रगण्‍य संस्‍था आहे. या दोन संस्थांमध्ये होत असलेल्या संशोधन कार्यासाठी, तसेच पदव्युत्तर आणि आचार्य पदवी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांच्या संशोधनासाठी हा सामंजस्य करार महत्त्वाचा ठरणार आहे. करारामुळे विद्यापीठांतर्गत असलेल्या कृषी जैवतंत्रज्ञान तसेच कृषी विद्याशाखेतील विविध विद्यार्थ्यांना भारतीय तेलबिया संशोधन संस्था, हैदराबाद येथील विविध प्रयोगशाळेत संशोधनात्मक कार्य करता येणे शक्य होणार आहे.  संशोधनाला मिळेल चलना विद्यापीठास्तरावरील तेलबिया पिकांच्‍या संशोधन कार्य अधिक वृद्धिंगत होण्याच्या दृष्टीने हा करार फायदेशीर ठरणार आहे. यासोबतच दोन्ही संस्थांमध्ये विविध तंत्रज्ञानाचे देवाणघेवाण होणार आहे. भविष्यात दोन्ही संस्थांमार्फत एकत्रित संशोधन प्रकल्प सादर करण्यात येतील. तेलबियांपासून विविध मूल्यवर्धित पदार्थ निर्मिती तंत्रज्ञान महिला बचत गट तसेच शेतकरी गटांना तांत्रिक मार्गदर्शन करण्यात येईल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com