agriculture news in Marathi, agreement for establishment of farmers producer company, mumbai, maharashtra | Agrowon

शेतकरी कंपन्या स्थापन करण्यासाठी करार
टीम अॅग्रोवन
रविवार, 21 जुलै 2019

पुणे ः नाबार्डच्या कंपनी विकास फंडातून शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करण्यासाठी महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ नोडल एजन्सी म्हणून काम करणार आहे. याबाबतचा करार नाबार्ड आणि महामंडळामध्ये नुकताच झाला आहे. या कराराअंतर्गत महामंडळ पीकनिहाय क्लस्टरची निवड करून, शेतकरी उत्पादन कंपन्या स्थापनेसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणार असल्याचे महामंडळाचे कार्यकारी संचालक मिलिंद आकरे यांनी सांगितले. 

पुणे ः नाबार्डच्या कंपनी विकास फंडातून शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करण्यासाठी महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ नोडल एजन्सी म्हणून काम करणार आहे. याबाबतचा करार नाबार्ड आणि महामंडळामध्ये नुकताच झाला आहे. या कराराअंतर्गत महामंडळ पीकनिहाय क्लस्टरची निवड करून, शेतकरी उत्पादन कंपन्या स्थापनेसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणार असल्याचे महामंडळाचे कार्यकारी संचालक मिलिंद आकरे यांनी सांगितले. 

आकरे म्हणाले, ‘‘महामंडळाच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचा महत्त्वाकांक्षी योजनेत, ग्रामीण भागातील कृषी आधारित रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यासाठी गावपातळीवर पीकनिहाय क्लस्टर निवड करून शेतकरी उत्पादन कंपन्या स्थापनेसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यात येणार आहे.

नाबार्डकडेदेखील उत्पादक कंपनी विकास फंड स्थापन केला असून, या फंडातून शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापनेसाठी महामंडळ नाबार्ड सोबत काम करणार आहे. याबाबतचा करार करून, नाबार्डने महामंडळाला पत्र दिले आहे. शेतकरी उत्पादक कंपनी स्थापनेबरोबरच प्रशिक्षण, अभ्यास दौरे, व्यवसाय आराखडा, बाजार जोडणी, शासकीय योजनांचा आणि वित्तीय संस्थांबरोबर समन्वय आदी  मुद्द्यांवर महामंडळ काम करणार आहे.’’

तर या प्रकल्पाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महामंडळाचे महाव्यवस्थापक प्रतीक पोखरकर आणि राज्य व्यवस्थापक ॲड. विजय गोफणे तज्ज्ञ म्हणून काम करणार आहेत. कराराच्या वेळी नाबार्डचे मुख्य सरव्यवस्थापक उदय शिरसाळकर, डॉ. उषामणी पी, श्री कृष्णन व्ही तर महामंडळाचे कार्यकारी संचालक मिलिंद आकरे, प्रतीक पोखरकर, विजय गोफणे, जालिंदर बडदे आदी उपस्थित होते.

इतर अॅग्रो विशेष
बागलाण तालुक्यात पूर्वहंगामी...नाशिक ः पूर्वहंगामी अर्ली द्राक्ष उत्पादनासाठी...
नांदेड, परभणी जिल्ह्यात गुलाबी बोंड...परभणी: परभणी, नांदेड जिल्ह्यांतील बीटी कपाशीवरील...
राज्यात पावसाची उघडीपपुणे : ऑगस्ट महिन्याच्या सुरवातीला मुसळधार...
कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील ऊस...कोल्हापूर : साखर कारखाने म्हटले की सर्वांच्या...
परभणी दुग्धशाळेतील संकलनात सव्वादोन लाख...परभणीः शासकीय दूध योजनेअंतर्गत परभणी येथील...
आवळा प्रक्रिया उद्योगातून बनविली ओळखजाचकवस्ती (ता. इंदापूर, जि. पुणे) येथील सुमन...
फळबागेतून शेती केली किफायतशीरकनका बुद्रुक (ता. मेहकर, जि. बुलडाणा) शिवारात...
युवा शेतकऱ्याने केले यशस्वी ब्रॉयलर...लातूर जिल्ह्यातील हडोळती येथील महेश गोजेवाड या...
मराठवाड्यातील खरिपावर संकटाचे ढग गडदऔरंगाबाद : गेल्या हंगामात दुष्काळाने पिचलेल्या...
दक्षिण महाराष्ट्रात उसाचे वैभव लयालाकोल्हापूर/सांगली : पंचगंगा, कृष्णा, वारणा,...
तीन लाखाची लाच घेताना नाशिक बाजार...नाशिक: नाशिक  कृषी उत्पन्न बाजार...
कातळावर लिली; तर टायरमध्ये फुलला...रत्नागिरी जिल्ह्यातील मेर्वी येथील प्रगतिशील...
कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यतापुणे ः पावसासाठी पोषक वातावरण नसल्याने पावसाचा...
राज्यात हलक्या पावसाचा अंदाजपुणे : बंगालच्या उपसागरातील कमी दाब...
कोल्हापूरमध्ये पुरात घट, धरणातून विसर्ग...कोल्हापूर  : जिल्ह्यातील पुराची परिस्थिती...
ग्लायफोसेट तणनाशक कर्करोगकारक नाही :...वॉश्‍गिंटन : ग्लायफोसेट हे तणनाशक मानवास कर्करोग...
ऑगस्ट महिन्यातही पाणीटंचाई कायम; २ हजार...पुणे : पावसाने दमदार हजेरी लावल्याने कोकण,...
पिंपळगावकरांनी भाजीपाला शेतीतून साधली... बीड जिल्ह्यात अहमदनगर- अहमदपूर राज्य...