सेंद्रिय कर्बवाढीसाठी ‘एनसीएल’चा पुढाकार

करार
करार

पुणे: राज्यातील उसाची उत्पादकता तसेच जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढविण्यासाठी राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा (एनसीएल) आता पुढे आली आहे. यासाठी ‘डीएसटीए’च्या माध्यमातून थेट शेतकऱ्यांच्या बांधावर विविध प्रयोग केले जाणार आहेत. ‘डीएसटीए’ अर्थात डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशनकडे काही जीवाणू व बुरशींचा संग्रह असून, संशोधनातही पुढाकार घेतला आहे. त्यामुळेच राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेने आपले संशोधन शेतकऱ्यांच्या बांधावर नेण्यासाठी ‘डीएसटीए’बरोबर करार केला.  या वेळी ‘एनसीएल’चे संचालक अश्विनीकुमार नांगिया यांच्यासह वरिष्ठ शास्त्रज्ञ महेश धारणे, डॉ. सय्यद दस्तगीर, डॉ. शुभांगी उंबरकर तसेच ‘डीएसटीए’च्या वतीने उपाध्यक्ष एस. एस. गंगावती, कार्यकारी संचालक डॉ. एस. एम. पवार, डॉ. सुभाष शिंदे, डॉ. मोहन डोंगरे, डॉ. संतोष चव्हाण उपस्थित होते.  ‘डीएसटीए’ने या प्रकल्पासाठी शास्त्रज्ञ डॉ. संतोष चव्हाण यांच्याकडे मुख्य समन्वयकाची जबाबदारी दिली आहे. “राज्याच्या ऊसशेतीचे चित्र बघता उत्पादकता आणि सुपीकता, या दोन्ही बाबी अतिशय आव्हानात्मक स्थितीत आहेत. ‘डीएसटीए’ व ‘एनसीएल’ या दोन्ही नामवंत संस्था एकत्रितपणे काम करीत ही आव्हाने पेलण्यासाठी भविष्यातील प्रयोग दिशादायक ठरू शकतील. त्यासाठी आम्ही पहिल्या टप्प्यात २० शेतकऱ्यांच्या बांधावर चाचण्या घेणार आहोत,” अशी माहिती डॉ.चव्हाण यांनी दिली.  सेंद्रिय कर्ब वाढविण्याचे प्रयत्न अॅसिटोबॅक्टर, पीएसबी, केएमबी व स्युडोमोनास या जिवाणूंचा तसेच ट्रायकोडर्मा, मेटारायझियम, बिव्हेरिया, निमोरिया यांची ऊस उत्पादकतेमधील भूमिका वाढविण्याचा प्रयत्न या प्रकल्पातील शास्त्रज्ञांचा आहे. मात्र, सेंद्रिय कर्ब वाढल्याशिवाय बुरशी व जिवाणूंचीदेखील वाढ होत नाही. त्यासाठी प्रथिने, मेद, वनस्पतीवर आधारित समुद्र घटक यांचा नैसर्गिक वाढ प्रवर्तकांचा वापर प्रयोगांमध्ये केला जाणार आहे. शेतकऱ्यांच्या बांधावर कोणते संशोधन होणार

  • जिवाणू, बुरशी, नैसर्गिक वाढ प्रवर्तकांचा वापर
  • ऊसवाढीत व जमीन क्षारता घटविण्यासाठी सेंद्रिय घटकांची मदत 
  • हुमणी, अमेरिकन लष्करी अळीचे नियंत्रण
  • ऊसशेतीमधील सध्याची आव्हाने 

  • रासायनिक खतांचा असंतुलित वापर
  • आवश्यकतेपेक्षाही जादा सिंचन 
  • उपयुक्त जिवाणू व बुरशींची झपाट्याने घट
  • उसाखालील जमिनीची घटणारी सुपीकता
  • क्षारपड जमिनींमुळे उत्पादकतेवर परिणाम
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com