agriculture news in Marathi, agreement for skill development, Maharashtra | Agrowon

कृषी कौशल्य विकासासाठी सहकार्याचा करार
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 19 जुलै 2019

अकोला ः  केंद्र शासनाची पंतप्रधान कौशल्य विकास योजना आणि राज्य शासनाच्या छत्रपती राजाराम महाराज कौशल्य विकास व उद्योजकता अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या या कार्यक्रमासाठी गुरुवारी (ता. १८) अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठासोबत सहकार्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कमिटी सभागृहात आयोजित कृषी शैक्षणिक संस्थांच्या बैठकीत वैयक्तिक कृषी कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्यास सिमॅसिस लर्निंग एलएलपीस सहकार्य करण्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला. 

अकोला ः  केंद्र शासनाची पंतप्रधान कौशल्य विकास योजना आणि राज्य शासनाच्या छत्रपती राजाराम महाराज कौशल्य विकास व उद्योजकता अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या या कार्यक्रमासाठी गुरुवारी (ता. १८) अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठासोबत सहकार्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कमिटी सभागृहात आयोजित कृषी शैक्षणिक संस्थांच्या बैठकीत वैयक्तिक कृषी कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्यास सिमॅसिस लर्निंग एलएलपीस सहकार्य करण्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला. 

या वेळी कुलगुरू डॉ. विलास भाले हे अध्यक्षस्थानी होते. व्यासपीठावर विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. विलास खर्चे, शिक्षण विस्तार संचालक डॉ. डी. एम. मानकर, सकाळच्या वऱ्हाड आवृत्तीचे सहयोगी संपादक संदीप भारंबे, सिमॅसिस लर्निंगचे (एलएलपी) सहायक   सरव्यवस्थापक अमोल बिरारी यांची उपस्थिती होती. ़़़``या कृषी कौशल्य विकास प्रशिक्षणाच्या माध्यमातून बेरोजगार युवकांना रोजगारासाठी दिशा मिळेल. कौशल्यावर आधारित उत्पादनक्षम व्यवस्था निर्माण होऊन सामाजिक समृद्धी येईल,’’ असे प्रतिपादन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले यांनी केले.  

विद्यापीठाने जे कौशल्य विकासाचे कार्य हाती घेतले ते या कार्यक्रमाच्या माध्यमातून, आपल्या इच्छाशक्तीतून यशस्वी करता येईल. केंद्र सरकारच्या कौशल्य विकास योजनेतून तरुणांना रोजगाराची चांगली संधी मिळणार आहे. सकारात्मक युवा पिढी घडविण्यासाठी, शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी हा उपक्रम कौतुकास्पद व स्तुत्य आहे, असेही डॉ. भाले म्हणाले. या वेळी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातंर्गत कार्यरत २६ कृषी महाविद्यालयांचे प्राचार्य, कृषी विज्ञान केंद्रांचे प्रमुख तसेच क्रीडा अधिकारी उपस्थित होते. अमोल बिरारी यांनी प्रास्ताविकात या कौशल्य प्रशिक्षणाबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. किशोर बिडवे यांनी केले.

इतर बातम्या
`चांद्रयान २' चंद्राच्या कक्षेत दाखलनवी दिल्ली ः भारताची महत्त्वाकांक्षी...
अकोल्यातील प्रकल्पात अत्यल्पच साठाअकोला : यंदाच्या पावसाळ्याचे सुमारे अडीच महिने...
अकोला जिल्ह्यात ६० हजार हेक्टर क्षेत्र...अकोला ः यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यात असमतोल...
मराठवाड्यात २७ टक्केच पीक कर्जवाटपऔरंगाबाद : यंदाच्या खरिपासाठी शेतकऱ्यांना...
सिंधुदुर्गात कालव, जिताडा मस्त्यबीज...मुंबई : राज्यात सागरी उत्पादनवाढीस...
ठिबकला ८० टक्के अनुदान; आंदोलनाला...भोसे, जि. सोलापूर : राज्य शासनाने कोरडवाहू...
मांडाखळीत संत्रा बागांत फळगळपरभणी : कमी पाण्यामुळे जमिनीमध्ये ओलाव्याची...
रश्‍मी बागल यांचा शिवसेनेत प्रवेशसोलापूर : जिल्ह्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसची...
मांजरपाड्याचे पाणी दरसवाडी धरणात पोचलेनाशिक : येवल्याच्या दुष्काळी भागात पाणी...
माशांच्या पाच नव्या जातींचा घेतला शोध अरुणाचल प्रदेश राज्यातील इटानगर येथील राजीव गांधी...
राज्य बँकेची ३५ हजार कोटींची उलाढालमुंबई : अहवाल वर्षात इतिहासात ३५,४४० कोटी इतकी...
कोल्हापुरात मोहीम स्वरूपात पंचनाम्यास...कोल्हापूर: महापुराच्या प्रलयानंतर आता...
नाशिक जिल्ह्यात मक्यावर अमेरिकन लष्करी...नाशिक  : चालू खरीप हंगामात मका पिकावर मोठ्या...
सांगली जिल्हा बॅंकेच्या १२ शाखांचे...सांगली   ः महापुराचा फटका शेती आणि...
एकात्मिक शेती पद्धत वापरासाठी ‘कृषी’...मुंबई  : पीक उत्पादन वाढून शेतकऱ्यांचे...
`अतिपावसाने होत्याचं नव्हतं झालं`; पुणे...पुणे ः शेतकरी पाणीटंचाईच्या संकटातून सावरण्याचा...
अपघात विमा योजनेत शेतकऱ्यासह कुटुंबातील...मुंबई: गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा...
राज्यात पूरप्रवण क्षेत्राबाबत संशयकल्लोळपुणे : कृष्णा व गोदावरी नदीच्या खोऱ्यात सतत पूर...
पूरग्रस्तांसह अतिवृष्टीत पिके...कोल्हापूर   : पूरग्रस्तांसह अतिवृष्टीत...
युतीतील अनेक जण आमच्या संपर्कात ः अजित...यवतमाळ : राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस आणि...