agriculture news in Marathi agreement for technical support in POKARA project Maharashtra | Agrowon

‘पोकरा’अंतर्गत तांत्रिक सहकार्यासाठी करार

टीम अॅग्रोवन
बुधवार, 22 जानेवारी 2020

बदलत्या हवामानात शेतीचे नियोजन करणे अवघड आहे. ते नियोजन करण्यास शेतकऱ्यांना मदत तसेच विभागाच्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांसाठी स्थानिक परिस्थितीनुसार कृषी हवामान सल्ला देणे प्रकल्पांतर्गत प्रयत्नामुळे शक्‍य होईल.
- गणेश पाटील, संचालक, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प

औरंगाबाद: नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या (पोकरा) माध्यमातून देशातील व राज्यातील नामवंत संशोधन संस्थांसोबत तांत्रिक सहकार्यासाठी करार करण्यात आला आहे. या करारामुळे आता बदलत्या हवामानामध्ये शेतीचे चांगले नियोजन करण्यास शेतकऱ्यांना मदत होईल. तसेच, कृषी विभागाच्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांना विविध भागांतील शेतकऱ्यांसाठी स्थानिक परिस्थितीनुसार कृषी हवामान सल्ला देणे शक्‍य होणार आहे.   

‘पोकरा’अंतर्गत राज्यातील १५ जिल्ह्यांमधील ५१४२ गावांमध्ये अंमलबजावणी करण्यात येत आहे. हवामान बदलानुसार उद्भवलेल्या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी शेतकऱ्यांना सक्षम बनविणे आवश्‍यक आहे. यासाठी प्रकल्पांतर्गत निवडलेल्या लघू - पाणलोटातील गावांना नियमित कृषी हवामान सल्ला मिळणे आवश्‍यक आहे. तसेच, कमी पर्जन्यमानकाळामध्ये पिकांवर होणारा विपरीत परिणाम कमी करण्यासाठी आपत्कालीन पीक आराखडा तयार करण्याबाबतचे ज्ञान गावपातळीवर असणे आवश्‍यक आहे. 

या पार्श्र्वभूमीवर ‘पोकरा’ प्रकल्पांतर्गत देशातील व राज्यातील नामवंत संशोधन संस्थांबरोबर शुक्रवारी (ता. १७) तांत्रिक सहकार्यासाठी करार करण्यात आला, त्यासाठी प्रकल्पाच्या मुंबई कार्यालयात विशेष बैठक घेण्यात आली. या बैठकीत कृषी विद्यापीठांबरोबर सामंजस्य करार, तर केंद्रीय कोरडवाहू शेती संशोधन संस्था हैदराबाद (CRIDA) यांच्यासोबत करार मसुदा अंतिम करण्यात आला.

प्रकल्प संचालक गणेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीला कृषी संशोधन परिषद दिल्ली (ICAR) येथील साहाय्यक निदेशक डॉ. एस. भास्कर, केंद्रीय कोरडवाहू शेती संशोधन संस्थेचे संचालक डॉ. जी. रवींद्र चारी, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. शरद गडाख, कृषी विद्यावेत्ता व संशोधन संस्थांबरोबरचे सामंजस्य कराराचे समन्वयक म्हणून काम पाहणारे विजय कोळेकर आणि इतर शास्त्रज्ञ व प्रकल्प कार्यालयातील विशेषज्ञ उपस्थित होते.

असे आहेत कराराचे विषय
केंद्रीय कोरडवाहू शेती संशोधन संस्था हैदराबाद या संस्थेशी लघू पाणलोट (गावसमूह)स्तरावर आपत्कालीन पीक आराखडा तयार करणे आणि नियमित कृषी हवामान सल्ला देण्याचा करार करण्यात आला आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला, डॉ. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी व महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी या तीनही विद्यापीठांशी पिकाची पाण्याची गरज अचूकपणे ठरविण्यासाठी उच्च तंत्रज्ञानाचा वापर करणे, कोरडवाहू शेतीच्या उत्पादकतेमध्ये वाढ करण्यासाठी हवामान अनुकूल तंत्रज्ञानाचा प्रसार करणे आणि आपत्कालीन परिस्थितीमध्ये शेतीचे नुकसान कमी करण्यासाठी शेतकऱ्यांना सल्ला देण्याचा करार करण्यात आला आहे. 
 


इतर बातम्या
सरदारांच्या वंशजांकडून शिवछत्रपतींना ८५...पुणे : फुलांची आकर्षक सजावट असलेला ‘जिजाऊ शहाजी...
कोल्हापूर : साखर उताऱ्यात खासगी कारखाने...कोल्हापूर : यंदाच्या गळीत हंगामात फेब्रुवारीच्या...
वाईत हळदीला दहा हजारांवर दर वाई, जि. सातारा : वाई शेती उत्पन्न बाजार...
वाशीम जिल्ह्यातील महिला बचतगट डिजिटल...वाशीम : राष्ट्रीय  कृषी व ग्रामीण विकास बँक...
जुने वाण राज्यातील शेतकऱ्यांपर्यंत...नगर : राहीबाई यांनी जुनी परंपरा पुनर्जीवित केली...
शेतमजुराच्या मुलीने पटकावला ‘शिवछत्रपती...अकोला ः प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर एका खेड्यातील...
साडेआठ हजार कोटी खर्चूनही 'जलयुक्त' फेल...मुंबई : फडणवीस सरकारची महत्त्वाकांक्षी जलयुक्त...
पीक विमा योजना यापुढे ऐच्छिक; केंद्र...नवी दिल्ली : केंद्र सरकारने शेतकऱ्यांना दिलासा...
जातीय सलोख्याला ठेच लागते की काय अशी...जुन्नर, जि. पुणे : सर्वसामान्यांना भेडसावणाऱ्या...
राज्यातील आजारी यंत्रमाग उद्योग...कडेगाव, जि. सांगली ः राज्यातील आजारी यंत्रमाग...
राज्यात तापमानात चढ-उतार शक्यपुणे : राज्याच्या कमाल आणि किमान तापमानात वाढ...
राज्यासह देशात शिवजयंती उत्साहात साजरीपुणे : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी...
शेतकरीभिमुख संशोधनावर भर : कुलगुरू डॉ....अकोला  ः डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ...
नगर जिल्ह्यामध्ये कमी पाण्यावरील फळझाडे...नगर : पाच वर्षांपासून दुष्काळाशी सामना करताना...
लेखी आश्वासनानंतर बाजार समिती...नाशिक : शासनाने जाहीर केलेला महाभाई भत्ता मिळावा...
लातूर विभागात सूक्ष्म सिंचनातील ११...नांदेड : पंतप्रधान कृषी सिंचन योजनेंतर्गत यंदा...
खानदेशात पपईचा हंगाम अंतिम टप्प्यातजळगाव ः खानदेशात पपईचा हंगाम अंतिम टप्प्यात आहे....
सातारा : अधिकृत विक्रेत्यांकडून...सातारा : बाजार समितीच्या आवारातील...
ग्रामीण पर्यटन विकासाचा ‘शिवनेरी...पुणे ः गड किल्ल्यांच्या पर्यटनाच्या माध्यमातून...
हवामानबदलाशी लढण्यासाठी एक हजार कोटी...पुणे ः जागतिक हवामानबदलाची समस्या संपूर्ण जगासमोर...