agriculture news in marathi agri advisori | Agrowon

उन्हाळी पिकांसाठी सल्ला

एस. एन. देशमुख
मंगळवार, 12 मे 2020

विदर्भासह विविध ठिकाणी उन्हाळी पिकांमध्ये खालील स्थिती आहे. सध्याच्या कोवीड-१९ विषाणूंच्या प्रादुर्भाव व सोशल डिस्टंन्सिंगचा विचार करता मनुष्यबळाची कमतरता तीव्रतेने जाणवत आहे. अशा वेळी कमीत कमी माणसांसह खालील कामांना त्वरीत प्राधान्य देणे गरजेचे आहे.

विदर्भासह विविध ठिकाणी उन्हाळी पिकांमध्ये खालील स्थिती आहे. सध्याच्या कोवीड-१९ विषाणूंच्या प्रादुर्भाव व सोशल डिस्टंन्सिंगचा विचार करता मनुष्यबळाची कमतरता तीव्रतेने जाणवत आहे. अशा वेळी कमीत कमी माणसांसह खालील कामांना त्वरीत प्राधान्य देणे गरजेचे आहे.

उन्हाळी भात

  • भात पीक निसवल्यानंतर दहा दिवस पाण्याची पातळी १० सेंमी ठेवावी. त्यानंतर हळूहळू पाण्याची पातळी कमी करावी. कापणीपूर्वी दहा दिवस बांधीतील पाणी पूर्णपणे काढून टाकावे. पीक फुलोरा अवस्थेत असताना ताण पडू देऊ नये.
  • सध्या भातावर करपा आणि मानमोडी या रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. या रोगांची लक्षणे आढळून येताच, प्रती लीटर पाणी कार्बेन्डाझीम (५० टक्के डब्ल्यूपी) १ ग्रॅम किंवा मॅन्कोझेब (७५ टक्के प्रवाही) २ मि.लि. किंवा हेक्साकोनॅझोल (५ टक्के प्रवाही) २ मि.लि. मिसळून फवारणी करावी.

भुईमुग

  • सुपर्ण उगवण झाल्यानंतर पीक फुलावर येईपर्यंत पाण्याचा थोडासा ताण द्यावा.
  • साधापणपणे झाडावरील ७५ ते ८० टक्के पाने पिवळी झाल्यानंतर शेंगा पक्व झाल्याचे समजावे. पीक काढणीस तयार असल्याचे समजावे.
  • गोदिंया जिल्ह्यामध्ये भुईमुगावर तांबेरा आणि टिक्का या रोगांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. या रोगाच्या नियंत्रणासाठी टेब्युकोनॅझोल (२५ टक्के डब्ल्यूजी) १ ते १.५ ग्रॅम प्रती लीटर किंवा ५०० ते ७५० ग्रॅम प्रती हेक्टरी ५०० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

तीळ

  • उन्हाळी तीळ पिकास आवश्यकतेनुसार पेरणीपूर्वी व पेरणीनंतर जमिनीच्या मगदूराप्रमाणे १० ते १५ दिवसांनी ओलीत करावे. ओलीत करताना पाणी साचून राहणार नाही, याची काळजी घ्यावी.
  • पीक परिपक्वतेचा कालावधी पूर्ण होताच कापणी करून पेंढ्या बांधाव्यात. या पेंढ्या तीन ते चार दिवस वाळवल्यानंतर पेंड्या झटकून तीळ वेगळा करावी.

संपर्क-. एस. एन. देशमुख, ०७१८२-२८०१८०
(कार्यक्रम समन्वयक (प्र.), कृषी विज्ञान केंद्र, हिवरा, पो. रतनारा, ता. जि. गोंदिया.)


इतर ताज्या घडामोडी
सोलापूर जिल्ह्यात दमदार पाऊस सोलापूर : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून...
नगर जिह्यात पावसाने पिकांचे अतोनात...नगर  : जिल्ह्याच्या बहुतांश भागात...
सोनी गावामध्ये आहेत २८८ शेततळीसोनी (ता. मिरज,जि.सांगली) या गावात  कृषी...
कर्नाळा बँकेत ३६ ग्रामपंचायतींचे पैसे...मुंबई : ‘शेकाप’चे माजी आमदार विवेक पाटील यांच्या...
मराठवाड्याच्या विकासासाठी शासन कटीबध्द...औरंगाबाद : मराठवाड्याच्या सर्वांगिण विकासासाठी...
केंद्राच्या कांदा निर्यातबंदी विरोधात...नाशिक : केंद्र सरकारने कुणाचीही ओरड नसताना, अन्न...
औरंगाबादमधील नुकसानग्रस्त पिकांचे...औरंगाबाद : ‘‘जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नुकसान...
खानदेशातील पपई पिकाला अतिपावसाचा फटकाजळगाव : खानदेशात पपई पिकाला अतिपावसाचा फटका बसला...
नांदेडमध्ये ३८ हजार हेक्टर पिकांचे...नांदेड : अतिवृष्टी व पूरामुळे जिल्ह्यातील ३८१...
‘म्हैसाळ’मधून पावणेदोन टीएमसी पाणी उचललेसांगली  ः कृष्णा नदीला आलेल्या पूराचे पाणी...
कांदा निर्यातबंदीविरूध्द कॉंग्रेसचे...रत्नागिरी : कांदा निर्यातीबाबतचा निर्णय...
मुसळधार पावसामुळे पिके भुईसपाटपुणे ः राज्यातील अनेक भागांत कमीअधिक स्वरूपात...
पानपिंपरी पिकाला विम्याचे कवच द्याअकोला ः जिल्ह्यात पानपिंपरी या वनौषधीवर्गीय...
सीमाभाग आणि बंदरातील कांदा सोडा; अन्यथा...नाशिक : टाळेबंदी शिथिल झाल्यानंतर शेजारील...
कोल्हापुरात ‘गोकूळ’चे दूध रोखण्याचा...कोल्हापूर : मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्याच्या...
शरद पवार यांनी ऊसतोड कामगारांची कोंडी...नगर ः ऊसतोडणी कामगारांच्या तोडणी दरात वाढ करावी...
फळबाग लागवडीसाठी जमिनीची निवड महत्त्वाचीसामान्यपणे फळबागा अयशस्वी होण्यामध्ये किंवा...
बियाणासाठी घरचे सोयाबीन ठेवताना...बियाण्यासाठी निवड करण्यात आलेल्या प्लॉटमध्ये...
महिला बचत गटांच्या माध्यमातून हळद...सहकाराच्या धर्तीवर संघटित झालेल्या राजापूर...
पुणे जिल्ह्यात दोन लाखावर शेतकऱ्यांना...पुणे : जिल्हा बॅंकेकडून खरीप हंगामासाठी गेल्या...