कृषी सल्ला : आंबा, चिकू, कलिंगड, टोमॅटो, कांदा

diseases of gram and sapota
diseases of gram and sapota

आंबा

  • तुडतुडे या किडीच्या नियंत्रणासाठी लॅम्बडा सायहॅलोथ्रीन (५ टक्के प्रवाही) ०.५ मिलि किंवा  
  • प्रोफेनोफॉस (५० टक्के प्रवाही) १ मिलि प्रतिलिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी.
  • कलिंगड व खरबूज 

  • सध्या कलिंगड आणि खरबूज या पिकांची लागवड चालू झालेली आहे.   
  • या पिकात प्रामुख्याने केवडा, भुरी, पानावरील ठिपके, मर आणि विषाणूजन्य रोगांमध्ये मोझॅक व बड नेक्रोसीस या रोगांचा प्रादुर्भाव दिसून येतो. 
  • नियंत्रण (फवारणी प्रतिलिटर पाणी

  • कलिंगडाचे पीक दोन ते तीन पानांवर असताना, थायामेथोक्झाम ०.४ ग्रॅम अधिक मॅन्कोझेब २.५ ग्रॅम.
  • नागअळी  

  • नागअळी पानाच्या आत शिरून आतील भाग खाते. पानावर नागमोडी रेषा तयार होतात. नागअळीच्या नियंत्रणासाठी निंबोळी अर्क (४ टक्के ) किंवा कडूनिंबयुक्त कीटकनाशक (ॲझाडिरेक्टिन १० हजार पीपीएम) २ ते ३ मि.ली. प्रति लीटर प्रमाणे फवारणी करावी.  
  •  सदर फवारण्या फुले येण्यापूर्वी कराव्यात.   
  •  फुले आल्यानंतर शक्यतो निओनिकोटीनाइड्स ग्रुपमधील (उदा. ॲसीटामिप्रिड, इमिडाक्लोप्रीड व थायोमेथोक्झाम) सारखी कीटकनाशके फवारु नये.
  • कांदा

  •  वाढीच्या अवस्थेत असलेल्या कांदा पिकावर फुलकिडींचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. हे प्रमाण फेब्रुवारी-मार्च महिन्यापर्यंत वाढत राहते. 
  • नियंत्रण (फवारणी प्रतिलिटर पाणी)

  •  लॅम्बडा सायहॅलोथ्रीन (५ टक्के एससी) ०.६ ते १ मिलि आवश्यकतेनुसार १० ते १५ दिवसांच्या अंतराने पुढील फवारणी घ्यावी.   
  • करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास,   
  •  मॅन्कोझेब २.५ ग्रॅम किंवा क्लोरोथॅलोनील २.५ ग्रॅम किंवा टेब्युकोनॅझोल १ मिलि.   
  •  वरील दोन्ही प्रादुर्भाव एका वेळी दिसत असल्यास ही बुरशीनाशके वरील कीटकनाशकात मिसळून फवारणे शक्य आहे. 
  • टोमॅटो  लागवड

  •  सध्या बऱ्याचशा भागात टोमॅटोची लागवड सुरू झालेली आहे.   
  •  टोमॅटो पिकात पर्णगुच्छ रोगाचा प्रसार पांढरी माशी मार्फत होतो. विषाणूजन्य ठिपक्यांचा मर रोग फुलकिड्यामार्फत पसरतो.  या किडींचे नियंत्रण वेळीच करणे गरज असते.  
  •  त्यासाठी रोगग्रस्त झाडे दिसताच उपटून नायनाट करावा. 
  •  गरजेनुसार फिप्रोनील (५ इसी) १.५ मिली अधिक मॅन्कोझेब २.५ ग्रॅम किंवा कार्बेन्डाझीम १ ग्रॅम   
  •  फळ पोखरणाऱ्या अळीच्या नियंत्रणासाठी,  थायामेथोक्झाम (१२.६ %) अधिक लॅम्बडा सायहॅलोथ्रीन (९.५ टक्के झेडसी) (संयुक्त कीटकनाशक) ०.२५ मिली.  
  •  ४ टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी.
  • चिकू

  • बी पोखरणाऱ्या अळीच्या नियंत्रणासाठी, फवारणी प्रतिलिटर पाणी  
  • प्रोफेनोफॉस (५० टक्के) १ मिलि किंवा  लॅम्बडा सायहॅलोथ्रीन (५ ई.सी.) १ मिलि किंवा डेल्टामेथ्रीन (२.८ ई.सी. प्रवाही) १ मिलि.
  • (सर्व किटकनाशकासाठी लेबलक्लेम आहेत.) संपर्क ः  ०२४२६-२४३२३९ (कृषी विद्या विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com