कृषी सल्ला (कापूस, तूर, रब्बी ज्वारी,गहू,भाजीपाला व फुलपिके)

मराठवाड्यात पुढील पाच दिवसांत आकाश स्वच्छ ते ढगाळ राहील. दिनांक २१ व २२ नोव्हेंबर रोजी मराठवाड्यात बीड, उस्मानाबाद, लातूर, नांदेड आणि परभणी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी अतिशय हलक्या पावसाची शक्यता आहे
Infestation of sigatoka disease on banana leaf
Infestation of sigatoka disease on banana leaf

मराठवाड्यात पुढील पाच दिवसांत आकाश स्वच्छ ते ढगाळ राहील. दिनांक २१ व २२ नोव्हेंबर रोजी मराठवाड्यात बीड, उस्मानाबाद, लातूर, नांदेड आणि परभणी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी अतिशय हलक्या पावसाची शक्यता आहे. विस्तारित अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात ता. २० नोव्हेंबर ते ३ डिसेंबर या दरम्यान किमान व कमाल तापमानात सरासरीपेक्षा घट होण्याची शक्यता आहे.  कापूस 

  • वेचणी अवस्था
  • कापूस पिकाची वेचणी करून घ्यावी. कुठल्याही परिस्थितीत कापसाची फरदड (खोडवा) घेऊ नये. 
  • तूर 

  • फुले लागणे ते शेंगा लागणे अवस्था
  • तूर पिकात अळ्यांचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास, नियंत्रणासाठी फवारणी प्रति लिटर पाणी क्विनॉलफॉस (२५ टक्के) २ मि.लि. किंवा  इमामेक्टीन बेन्झोएट (५ टक्के) ०.४४ ग्रॅम.
  • पिकाच्या आवश्यकतेनुसार पाणी व्यवस्थापन करावे. 
  • रब्बी ज्वारी 

  • वाढीची अवस्था
  • पेरणी केलेल्या रब्बी ज्वारीला एक महिना पूर्ण झाला असल्यास ४० किलो नत्र खताची मात्रा देऊन पाणी व्यवस्थापन करावे. 
  • उगवण झालेल्या रब्बी ज्वारी पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास, नियंत्रणासाठी फवारणी प्रति लिटर पाणी थायामिथोक्झाम (१२.६ टक्के) अधिक लॅंबडा सायहॅलोथ्रीन (९.५ झेडसी) (संयुक्त कीटकनाशक) ०.५ मि.लि. किंवा स्पिनेटोरम (११.७ एससी) ०.४ मि.लि.    
  • गहू

  • पेरणी अवस्था
  • गहू पिकात पाणी व्यवस्थापन करावे.
  • भाजीपाला व फुलपिके

  • पुनर्लागवड केलेल्या भाजीपाला पिकात तण व्यवस्थापन करून पाणी व्यवस्थापन करावे. 
  • तुती रेशीम उद्योग 

  • सत्तर दिवसांच्या अंतराने वर्षाकाठी ५ वेळा तुती छाटणी करावी. प्रत्येक ४५ दिवसांच्या अंतराने फांद्या छाटणी करावी. रेशीम कीटकांना खाद्य द्यावे. पट्टा पद्धत लागवडीत (५ × ३ आणि २ फूट) काळे प्लॅस्टिक कापड आच्छादन, द्रवरूप खत व पाणी ठिबक सिंचनाने देणे सोईचे होते. 
  • ८ टन प्रति एकर प्रमाणे ४ टन जून व ४ टन नोव्हेंबर महिन्यात कुजलेले शेणखत द्यावे.
  • केळी 

  • केळी बागेत सिगाटोगा रोगाच्या व्यवस्थापनासाठी, फवारणी प्रति लिटर पाणी प्रोपीकोनॅझोल १ मि.लि. अधिक स्टिकर १ मि.लि.
  • केळी बागेत तणाचे नियंत्रण करावे. 
  • केळी बागेत झाडांना मातीचा आधार देऊन पाणी व्यवस्थापन करावे.
  • संपर्क ः डॉ. कैलास डाखोरे, ७५८८९९३१०५ (ग्रामीण कृषी मौसम सेवा, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com