लिंबूवर्गीय फळपीक सल्ला

affected fruits and leaves
affected fruits and leaves

संत्रा-मोसंबी आंबे बहराचे नियोजन या वर्षी अगदी डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात देखील बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाची नोंद झाली आहे. आंबे बहर घेतलेल्या संत्रा-मोसंबी बागांमध्ये अशा परिस्थितीत अनेक अडचणी उद्भवू शकतात.

  • ज्या बागेमध्ये मागील ८-१० दिवसांत  क्लोरमेक्वाट क्लोराईड (सीसीसी) फवारणी झाली होती. तिथे पाऊस आला असल्यास पुन्हा क्लोरमेक्वाट क्लोराईड (सीसीसी) २ मि.लि. (हलक्या जमिनीत १.५ मि. लि.) प्रतिलिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी. किंवा   
  • सीसीसी ऐवजी पॅक्लोब्युट्राझॉल ६ मि.लि. प्रतिझाड (२०-२५% तीव्रतेचे असल्यास ३०-२५ मि.ली. प्रतिझाड) या प्रमाणात पाच लिटर पाण्यात मिसळून आळ्यात मातीद्वारे देता येईल. फवारणीद्वारे द्यावयाचे असल्यास ५ मि.ली. प्रतिलिटर पाणी याप्रमाणे फवारणी घेता येईल. ही ॲग्रेस्को शिफारस आहे.  
  • याबाबतीत बरेच बागायतदार मोनो पोटॅशिअम फॉस्फेट (०:५२:३४) हे खत फवारणीतून द्यावे की नाही, याबद्दल विचारणा करीत आहेत. मात्र, सीसीसी किंवा पॅक्लोब्युट्राझॉल ही दोन्ही रसायने वाढ प्रतिबंधक असून, त्यासोबत कोणत्याही अन्य संजीवक किंवा वाढ प्रवर्धक खतांचा/रसायनांचा समावेश करू नये. ते परस्परविरोधी ठरेल.   
  • आवश्यक असल्यास बुरशीनाशकाचा वापर करणे शक्य आहे.   
  • २० जानेवारीनंतर बागेला पाणी द्यावयाचे आहे. त्याचे नियोजन करून ठेवावे. 
  • संत्रा-मोसंबी मृग बहराचे नियोजन

  • या आठवड्यात झालेल्या पावसामुळे मृगबहर असलेल्या बगीच्यांमध्ये बुरशीजन्य फळगळ/तपकिरी कूज येऊ शकते. फोसेटिल एएल २.५ ग्रॅम अधिक कार्बेन्डाझीम १ ग्रॅम प्रतिलिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी.   
  •  फळांचा आकार व गोडी वाढवण्यासाठी,  जिबरेलिक आम्ल (जीए-३) १.५ ग्रॅम अधिक युरीया १.५ किलोग्रॅम प्रति १०० लिटर पाणी या प्रमाणे मिसळून फवारावे.   
  • या फवारणीनंतर पंधरा दिवसांनी २-४-डी १.५ ग्रॅम प्रमाणे अधिक मोनो पोटॅशिअम फॉस्फेट (०ः५२ः ३४) १.५ किलो प्रति १०० लिटर पाणी याप्रमाणे मिसळून फवारणी करावी. 
  • लिंबाच्या हस्त-आंबे बहराचे व्यवस्थापन या वर्षी प्रलंबित पावसाळ्यामुळे लिंबाच्या हस्तबहरावर ही परिणाम होत आहे. बऱ्याच बागेमध्ये ताण बसलेला नाही, तरी सर्व लिंबू बागायतदारांनी क्लोरमेक्वाट क्लोराईड किंवा पॅक्लोब्युट्रॅझॉल या वाढनिरोधकाची वरील संत्रा मोसंबीमध्ये दिल्याप्रमाणे एक फवारणी करावी. येथेही २० जानेवारीनंतर बागेला पाणी द्यावयाचे आहे. त्यासाठी नियोजन करून ठेवावे.   संपर्कः डॉ. अंबादास हुच्चे, ७५८८००६११८ आयसीएआर - केंद्रीय लिंबूवर्गीय फळ संशोधन संस्था, नागपूर)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com