agriculture news in marathi agri advisory about citrus fruits | Page 3 ||| Agrowon

लिंबूवर्गीय फळपीक सल्ला

डॉ. अंबादास हुच्चे
शनिवार, 28 डिसेंबर 2019

संत्रा-मोसंबी आंबे बहराचे नियोजन

या वर्षी अगदी डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात देखील बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाची नोंद झाली आहे. आंबे बहर घेतलेल्या संत्रा-मोसंबी बागांमध्ये अशा परिस्थितीत अनेक अडचणी उद्भवू शकतात.

संत्रा-मोसंबी आंबे बहराचे नियोजन

या वर्षी अगदी डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात देखील बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाची नोंद झाली आहे. आंबे बहर घेतलेल्या संत्रा-मोसंबी बागांमध्ये अशा परिस्थितीत अनेक अडचणी उद्भवू शकतात.

 • ज्या बागेमध्ये मागील ८-१० दिवसांत  क्लोरमेक्वाट क्लोराईड (सीसीसी) फवारणी झाली होती. तिथे पाऊस आला असल्यास पुन्हा क्लोरमेक्वाट क्लोराईड (सीसीसी) २ मि.लि. (हलक्या जमिनीत १.५ मि. लि.) प्रतिलिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी. किंवा 
   
 • सीसीसी ऐवजी पॅक्लोब्युट्राझॉल ६ मि.लि. प्रतिझाड (२०-२५% तीव्रतेचे असल्यास ३०-२५ मि.ली. प्रतिझाड) या प्रमाणात पाच लिटर पाण्यात मिसळून आळ्यात मातीद्वारे देता येईल. फवारणीद्वारे द्यावयाचे असल्यास ५ मि.ली. प्रतिलिटर पाणी याप्रमाणे फवारणी घेता येईल. ही ॲग्रेस्को शिफारस आहे.
   
 • याबाबतीत बरेच बागायतदार मोनो पोटॅशिअम फॉस्फेट (०:५२:३४) हे खत फवारणीतून द्यावे की नाही, याबद्दल विचारणा करीत आहेत. मात्र, सीसीसी किंवा पॅक्लोब्युट्राझॉल ही दोन्ही रसायने वाढ प्रतिबंधक असून, त्यासोबत कोणत्याही अन्य संजीवक किंवा वाढ प्रवर्धक खतांचा/रसायनांचा समावेश करू नये. ते परस्परविरोधी ठरेल. 
   
 • आवश्यक असल्यास बुरशीनाशकाचा वापर करणे शक्य आहे. 
   
 • २० जानेवारीनंतर बागेला पाणी द्यावयाचे आहे. त्याचे नियोजन करून ठेवावे. 

संत्रा-मोसंबी मृग बहराचे नियोजन

 • या आठवड्यात झालेल्या पावसामुळे मृगबहर असलेल्या बगीच्यांमध्ये बुरशीजन्य फळगळ/तपकिरी कूज येऊ शकते. फोसेटिल एएल २.५ ग्रॅम अधिक कार्बेन्डाझीम १ ग्रॅम प्रतिलिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी. 
   
 •  फळांचा आकार व गोडी वाढवण्यासाठी,  जिबरेलिक आम्ल (जीए-३) १.५ ग्रॅम अधिक युरीया १.५ किलोग्रॅम प्रति १०० लिटर पाणी या प्रमाणे मिसळून फवारावे. 
   
 • या फवारणीनंतर पंधरा दिवसांनी २-४-डी १.५ ग्रॅम प्रमाणे अधिक मोनो पोटॅशिअम फॉस्फेट (०ः५२ः ३४) १.५ किलो प्रति १०० लिटर पाणी याप्रमाणे मिसळून फवारणी करावी. 

लिंबाच्या हस्त-आंबे बहराचे व्यवस्थापन

या वर्षी प्रलंबित पावसाळ्यामुळे लिंबाच्या हस्तबहरावर ही परिणाम होत आहे. बऱ्याच बागेमध्ये ताण बसलेला नाही, तरी सर्व लिंबू बागायतदारांनी क्लोरमेक्वाट क्लोराईड किंवा पॅक्लोब्युट्रॅझॉल या वाढनिरोधकाची वरील संत्रा मोसंबीमध्ये दिल्याप्रमाणे एक फवारणी करावी. येथेही २० जानेवारीनंतर बागेला पाणी द्यावयाचे आहे. त्यासाठी नियोजन करून ठेवावे.  

संपर्कः डॉ. अंबादास हुच्चे, ७५८८००६११८
आयसीएआर - केंद्रीय लिंबूवर्गीय फळ संशोधन संस्था, नागपूर)


इतर फळबाग
सीताफळात योग्य परागसिंचन होणे आवश्यकसीताफळाची फळधारणा तापमानावर जास्त अवलंबून...
नारळाला द्या शिफारशीत खतमात्रानारळ झाडाच्या सभोवताली पहिले वर्ष १ फूट, दुसरे...
असे करा लिंबूवर्गीय फळपिकांचे व्यवस्थापनसध्या काही संत्रा बागांना पूर्ण ताण बसून आंबिया...
दीड वर्षात पपईसह पाच पिकांचा 'तनपुरे...पपईच्या दीर्घ कालावधीच्या पिकात कांदा, पपई...
जीवनसत्त्व, क्षार घटकांचा पुरवठा करणारे...अंजिरामध्ये ओमेगा ३ आणि ओमेगा ६ हे घटक मुबलक...
द्राक्ष रिकट पूर्व तयारीसह व्यवस्थापनसध्याच्या वातावरणाचा विचार करता किमान...
केळी सल्लासूत्रकृमीग्रस्त जमिनीस खोल नांगरट देऊन उन्हात २...
केळीवरील सोंडकिडीचे कामगंध...जागतिक पातळीवर केळीचे सर्वाधिक उत्पादन घेणाऱ्या...
दर्जेदार केळी उत्पादनाचे तंत्रकेळी घडातील फळांच्या आकारात एकसमान बदल होऊन घड...
द्राक्ष सल्ला : तापमानातील चढ-उताराचे...सध्याच्या तापमानाचा विचार करता द्राक्षबागेत...
पिवळ्या पर्णछत्राची समस्या, कारणे जाणून...पावसाळा सरल्यानंतर थंडी पडली की बऱ्याच बागांमध्ये...
लिंबूवर्गीय फळपीक सल्ला सद्य:स्थितीत शेतकऱ्यांनी आंबिया बहरासाठी ...
असे करा रुगोज चक्राकार पांढरी माशीचे...थंडी वाढू लागल्यानंतर कडाक्याच्या थंडीला सुरुवात...
अशी करा पपईची लागवडपपई लागवड वर्षभर मुख्यत्वे जून-जुलै, सप्टेंबर-...
नवीन द्राक्ष बागेमध्ये रिकट घेण्याचा काळसध्या वातावरण कमी होत असून, काही ठिकाणी ढगाळ...
असे करा संत्रा बागेत आंबिया बहरासाठी खत...संत्रा-मोसंबी बागेपासून आर्थिक उत्पादन...
फळबागेत आच्छादन कराफळपिकांमध्ये साधारणपणे १० अंश सेल्सिअसपेक्षा...
अशी करा नवीन द्राक्ष लागवडीची तयारीद्राक्ष लागवडीसाठी हा कालावधी महत्त्वाचा आहे....
गारपीटग्रस्त संत्रा बागेसाठी उपाययोजनामराठवाड्यातील काही भागांसह विदर्भात पुन्हा पाऊस व...
भुरी, मिलिबग नियंत्रणासाठी उपाययोजना...सध्याच्या परिस्थितीमध्ये द्राक्षबागेमध्ये काही...