कृषी सल्ला : तूर, हरभरा, ज्वारी, कांदा, बोर

कृषी सल्ला : तूर, हरभरा, ज्वारी, कांदा, बोर
कृषी सल्ला : तूर, हरभरा, ज्वारी, कांदा, बोर

तूर शेंगा पक्वतेची अवस्था

  • शेंग माशी, घाटे अळी आणि पिसारा पतंग या किडींच्या नियंत्रणासाठी फवारणी प्रति लिटर पाणी.इमामेक्टिन बेन्झोएट (५ टक्के दाणेदार) ०.४ ग्रॅम किंवा फ्ल्युबेंडायअमाईड (२० टक्के दाणेदार) ०.५ ग्रॅम किंवा क्लोरॲण्ट्रानिलीप्रोल (१८.५ टक्के प्रवाही) ०.३ मिली.एकरी २०० लिटर पाणी वापरावे. आवश्यकता भासल्यास पुढील फवारणी कीटकनाशक बदलून १५ दिवसाच्या अंतराने करावी.  
  • मर आणि वांझ रोगाची झाडे आढळल्यास उपटून नष्ट करावी. 
  • हरभरा घाटे भरण्याची अवस्था

  • बागायती हरभऱ्यामध्ये खुरपणी किंवा कोळपणी करून जमीन भुसभुशीत करून घ्यावी.  
  • घाटे अळीच्या प्रादुर्भावाचा आगाऊ अंदाज येण्यासाठी हेक्टरी ५ कामगंध सापळे दर ५० मीटर अंतरावर शेतात उभारावेत. दर १५ दिवसांनी त्यातील ल्युर बदलावेत.  
  • घाटे अळीचा प्रादुर्भाव दिसताच निंबोळी अर्क ५ टक्के किंवा ॲझाडिरेक्टीन (३०० पी पी एम) ५ मिली प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी.   
  • ज्या ठिकाणी जिरायती हरभऱ्यात मोठ्या अवस्थेतील घाटे अळी आढळून येत असल्यास, त्यांच्या नियंत्रणासाठी क्लोरॲण्ट्रानिलीप्रोल (१८.५ टक्के प्रवाही) ०.२५ मिली प्रति लिटर या प्रमाणे एकरी २०० लिटर द्रावण फवारावे.   
  • १५ डिसेंबरनंतर हरभऱ्याची लागवड आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरत नाही, त्यामुळे लागवड करणे टाळावे. 
  • रब्बी ज्वारी मावा या किडीच्या नियंत्रणासाठी फवारणी प्रति लिटर पाणी डायमेथोएट (३०% प्रवाही) १ मिली.  कांदा कांदा पिकावर फुलकिड्यांचा व करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यांच्या नियंत्रणासाठी फवारणी प्रति लिटर पाणी, डायमेथोएट (३० ईसी) १.५ मिली किंवा लॅम्बडा सायहॅलोथ्रीन (५ ईसी) ०.६ मिली या पैकी एका कीटकनाशकासोबत मॅन्कोझेब २.५ ग्रॅम किंवा टेब्युकोनॅझोल १ मिली यापैकी एका बुरशीनाशकांची फवारणी करावी. या द्रावणामध्ये १ मिली स्टिकरचा वापर करावा.  बोर फळ पोखरणाऱ्या अळीच्या व्यवस्थापनासाठी निंबोळी अर्क ५ टक्के किंवा ॲझाडिरेक्टीन (१० हजार पीपीएम) २ मिली प्रति लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी.  संपर्कः ०२४२६ -२४३२३९ (कृषी विद्या विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com