agriculture news in marathi agri advisory on fruit crops | Agrowon

फळझाडांचे आच्छादन, ठिंबक सिंचन महत्वाचे

डॉ. हनुमान गरुड, डॉ. भैय्यासाहेब गायकवाड
शुक्रवार, 17 एप्रिल 2020

उन्हाळ्यात फळबागांना पाण्याची टंचाई जाणवते. अशा वेळी पुढील उपाययोजना शेतकऱ्यांना उपयुक्त ठरू शकतात.

उन्हाळ्यात फळबागांना पाण्याची टंचाई जाणवते. अशा वेळी पुढील उपाययोजना शेतकऱ्यांना उपयुक्त ठरू शकतात.

बाग स्वच्छ ठेवणे 
हलकीशी मशागत करावी. कारण तणापासून होणारे बाष्पीभवन टाळता येईल.

बाष्प रोधकाचा वापर
पोटॅशिअम नायट्रेट (१ ते १.५ टक्के म्हणजेच ) १० ते १५ ग्रॅम प्रति लीटर पाणी किंवा केओलीन (८ टक्के म्हणजेच) ८० ग्रॅम प्रति लीटर पाणी या द्रावणाची फवारणी १५ दिवसाच्या अंतराने फळबागाच्या पानावर करावी. यामुळे पानांद्वारे होणारे पाण्याचे उत्सर्जन किंवा बाष्पीभवनाचा वेग कमी होतो.

जमिनीवर आच्छादन
बाष्पीभवनाद्वारे जमिनीतील पाणी सुमारे ७० टक्के नाश पावते. शेतातील काडी कचरा, धसकटे, गवत, भुसा, तुरीच्या काड्या इ. सेंद्रिय घटकांचा ७ ते ८ सें.मी. जाडीचा थर आच्छादनासाठी वापरावा, त्यामुळे बाष्पीभवनाचा वेग कमी होतो.

ठिबक सिंचनाचा वापर
टंचाई सदृश परिस्थितीमध्ये ठिबक सिंचन अतिशय फायदेशीर आहे. झाडांना मोजून पाणी दिल्यामुळे वाढ चांगली होते.

मडका सिंचन
ज्यांना ठिबक सिंचन काही कारणांनी शक्य नाही, त्यांनी झाडाच्या आकाराप्रमाणे आळ्यात ४ ते ५ मडके बसवावीत. मडक्याच्या तळाशी लहान छिद्र पाडून त्यात कापडाची वात बसवून झाडाच्या मुळांना पाणी द्यावे. सर्वसाधारण एका मडक्यात ३ ते ४ लिटर पाणी ओतावे. मडक्यातील पाणी झिरपत राहून झाडाच्या तंतुमय मुळाना उपलब्ध होते. झाडे जिवंत राहतात.

मातीचा थर
झाडांच्या खोडाभोवती मातीचा थर दिल्यास बाष्पीभवनामुळे होणारे नुकसान टाळता येते. मातीचा थर आच्छादनाप्रमाणे काम करतो.

बहार धरू नये
टंचाई सदृश परिस्थितीमध्ये फुले लागल्यास ती काढून टाकावीत. कोणताही बहार धरू नये.

झाडाचा आकार मर्यादित ठेवणे
झाडाची छाटणी करून झाडाचा आकार मर्यादित ठेवावा, त्यामुळे पर्णभार कमी होऊन बाष्पीभवनाचा वेग मंदावतो. झाडे जगण्यास मदत होते.

झाडाच्या खोडास बोर्डोपेस्ट लावणे
झाडाच्या खोडास बोर्डोपेस्ट लावल्यामुळे सूर्य किरणे परावर्तीत होतात. बुरशीजन्य रोगास प्रतिबंध होतो.
१०. शक्यतो बागांना सायंकाळच्या वेळेस पाणी द्यावे.

संपर्क- डॉ. हनुमान गरुड, ७५८८६७७५८३
(विषय विशेषज्ञ -कृषि विद्या, कृषि विज्ञान केंद्र, खामगाव, ता. गेवराई, जि.बीड.)


इतर फळबाग
उन्हाळ्यातील केळी बागेचे व्यवस्थापनउष्णलाटांमुळे बागेतील तापमान वाढते, आर्द्रता कमी...
नियोजन संत्रा बाग लागवडीचे..हलक्‍या जमिनीत निचरा चांगला होतो. मात्र या...
असे करा द्राक्षबागेतील स्ट्रोमॅशिअम...खोडकिडीचे प्रौढ भुंगेरे साधारणतः मान्सूनपूर्व,...
दर्जेदार पेरू, सीताफळाच्या उत्पादनावर भरमाझ्याकडे पेरू आणि सीताफळाची लागवड आहे. पेरूच्या...
गावोगावी फिरून विकली पंधरा टन द्राक्ष कोरोनामुळे बाजार समित्या बंद झाल्या, व्यापारीही...
जास्तीच्या ओलाव्यामुळे येणाऱ्या ...गेल्या आठवड्यात बऱ्याच भागात पाऊस झाला व काही...
केळी पीलबागेचे व्यवस्थापन, खर्च कमी... माझी काळी कसदार दहा एकर शेती आहे. दोन...
आरोग्यदायी कलिंगडकलिंगडात जीवनसत्त्व अ आणि क भरपूर प्रमाणात असून...
थेट ग्राहकांना विकली २० टन द्राक्ष   बागेत द्राक्ष घड काढणीला आले आणि कोरोनाचे...
‘हापूस'च्या नऊ हजार पेट्यांची ...हंगाम तोंडावर आला असतानाच कोरोनाने देशभरात पाय...
सीताफळातून लाभले आर्थिक स्थैर्यपांगारे (ता.पुरंदर,जि.पुणे) येथील प्रयोगशील...
लिंबूवर्गीय फळपीक सल्लाशेतीमध्ये काम करण्याची परवानगी असली तरी ते काम...
डाळिंब सल्लामृग बहार / अर्ली मृग बहार (जून - जुलै...
फळझाडांचे आच्छादन, ठिंबक सिंचन महत्वाचेउन्हाळ्यात फळबागांना पाण्याची टंचाई जाणवते. अशा...
संत्रा पिकाची पाने पिवळी पडण्याची कारणे...संत्रा बागेत पाने पिवळी पडण्याची समस्या अनेक...
द्राक्षबागेतील अवस्थांनुसार व्यवस्थापनसध्याच्या काळात बागेतील घडांच्या स्थितीनुसार...
असे करा दर्जेदार चिकू उत्पादनाचे नियोजनचिकू फळांना योग्य दर मिळण्यासाठी योग्य आकार व...
द्राक्षबागेतील वेगवेगळ्या अवस्थांनुसार...सध्याच्या परिस्थितीमध्ये द्राक्ष बागेत वेगवेगळ्या...
अवकाळी पावसानंतर लिंबूवर्गीय फळबागेचे...स ध्या अनेक जिल्ह्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह...
बागेमध्येच उपलब्ध मण्यांपासून बेदाणे...सध्या वेलीवरील द्राक्ष मण्यांचे बेदाणे करण्याची...