agriculture news in marathi agri advisory for kokan region | Agrowon

कृषी सल्ला (भात, आंबा, काजू, नारळ, सुपारी, नागली, हळद, कलिंगड)

डॉ. विजय मोरे
सोमवार, 19 ऑक्टोबर 2020

नुकत्याच झालेल्या मेघगर्जना आणि विजेच्या कडकडाटासह झालेल्या पावसामुळे शेतातील उभे तयार भात पडले असतील, तर अशा भाताच्या लोंब्या पारंपारिक पद्धतीप्रमाणे वेचून सुरक्षित ठिकाणी आणून ठेवाव्यात.

नुकत्याच झालेल्या मेघगर्जना आणि विजेच्या कडकडाटासह झालेल्या पावसामुळे शेतातील उभे तयार भात पडले असतील, तर अशा भाताच्या लोंब्या पारंपारिक पद्धतीप्रमाणे वेचून सुरक्षित ठिकाणी आणून ठेवाव्यात.

खरीप भात 

 • दाणे भरणे (गरव्या जाती), पक्वता  (निमगरव्या आणि हळव्या जाती)
 • नुकत्याच झालेल्या मेघगर्जना आणि विजेच्या कडकडाटासह झालेल्या पावसामुळे शेतातील उभे तयार भात पडले असतील, तर अशा भाताच्या लोंब्या पारंपारिक पद्धतीप्रमाणे वेचून सुरक्षित ठिकाणी आणून ठेवाव्यात. उन्हे पडल्यास वाळविण्यासाठी पसरून ठेवाव्यात. पडलेले भात भिजल्यामुळे कोंब फुटण्याची शक्यता असते. तातडीने अशा लोंब्या वेचून सुरक्षित ठिकाणी आणल्यास काही प्रमाणात नुकसान कमी होण्यास मदत होईल.
 • भात खाचरातील पाण्याचा निचरा होण्याची व्यवस्था करावी आणि गरवे भात दाणे भरण्याच्या अवस्थेत असल्याने खाचरात पाण्याची पातळी ५ सें.मी. पर्यंत नियंत्रित करावी.  
 • हवामान अंदाजानुसार हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. तयार भात पिकाची कापणी पावसाची उघडीप असताना करावी. कापणी केलेले भात शेतात न ठेवता लगेचच सुरक्षित ठिकाणी न्यावे. लगेच मळणी करावी. उत्पादित पीक कोरड्या आणि सुरक्षित ठिकाणी वाळविण्यासाठी पसरून ठेवावे.

नागली/ वरई 

 • पक्वता 
 • पावसामुळे शेतातील उभे तयार झालेले नागली, वरईचे पीक पडले असल्यास भाताप्रमाणेच त्यांच्याही लोंब्या वेचून सुरक्षित ठिकाणी आणाव्यात. उन्हे पडताच वाळविण्यासाठी पसरून ठेवाव्यात. 
 • नाचणी, वरई पीक क्षेत्रातील अतिरिक्त पाण्याचा निचरा करण्याची व्यवस्था करावी.
 • हवामान अंदाजानुसार हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवली आहे. तयार नागली/ वरई पिकाची कणसे विळ्याने कापून कोरड्या आणि सुरक्षित ठिकाणी वाळविण्यासाठी पसरून ठेवावे. वाळल्यानंतर मळणी करावी.

आंबा /काजू /नारळ/ सुपारी

 • नुकत्याच झालेल्या पावसामुळे नवीन लागवड केलेल्या बागेतील साचलेल्या अतिरिक्त पाण्याचा निचरा करण्याची व्यवस्था करावी.
 • ढगाळ आणि पावसाळी वातावरणामुळे आंबा व काजू बागेत कोवळ्या पालवीवर करपा आणि नारळ व सुपारीवर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो. त्यासाठी पावसाची उघडीप असताना १ टक्के बोर्डो मिश्रणाची फवारणी करावी. 

कलिंगड / भेंडी 

 • पेरणी  
 • मागील तीन दिवसात झालेल्या पावसामुळे जमिनीतील ओलावा निर्माण झाल्याने बी कुजण्याची शक्यता आहे. तसेच हवामान अंदाजानुसार हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवली असल्याने कलिंगड व भेंडी या पिकाच्या पेरणीची कामे पुढे ढकलावीत.

हळद 

 • कंद अवस्था 
 • नुकत्याच झालेल्या पावसामुळे हळद बागेतील साचलेल्या अतिरिक्त पाण्याचा निचरा करण्याची व्यवस्था करावी.

भाजीपाला रोपवाटिका व नवीन फळबाग लागवड

 • वाढीची अवस्था 
 • पावसामुळे नवीन लागवड केलेल्या फळबागा तसेच भाजीपाला रोपवाटीकेतील साचलेल्या अतिरिक्त पाण्याचा निचरा करण्याची व्यवस्था करावी.

संपर्क- ०२३५८- २८२३८७
डॉ. विजय मोरे, ९४२२३७४००१
(कृषी विद्या विभाग, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली).


इतर ताज्या घडामोडी
चढ्या दराने कांदा बियाणे विक्री पडली...नाशिक : सध्या कांद्याच्या बियाण्यांचा मोठ्या...
केंद्राकडून सरकारी कर्मचाऱ्यांना ‘बोनस’...नवी दिल्ली : कोरोनासंकटामुळे महागाई भत्ता...
कृषी क्षेत्रात ‘पंदेकृवि’ची भरीव...अकोला ः कृषी विद्यापीठाने कृषी क्रांतीचे प्रणेते...
शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी ः मुख्यमंत्री...उस्मानाबाद : खचून जाऊ नका, धीर धरा, शासन पूर्ण...
सरकारची शेतकऱ्यांना कोरडी आश्‍वासने :...जिंतूर, जि. परभणी, हिंगोली ः अतिवृष्टीमुळे...
एकनाथ खडसे उद्या ‘राष्ट्रवादी’तमुंबई : भाजपचे नाराज नेते एकनाथ खडसे यांच्या...
नगर जिल्ह्यात पिकांचे ६३ हजार हेक्टरवर...नगरः सप्टेंबर महिन्यातील सलगच्या २० दिवसांच्या...
शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनाची पुर्तता...नांदेड : ‘‘शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार रुपये...
सातारा जिल्ह्यात साडेपाच हजार हेक्टर...सातारा : अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील...
वर्धा जिल्ह्यात यंदा ६४ टक्के पीक...वर्धा  :  कर्जमाफी आणि शासनाच्या...
कासोळा फाट्यावर ‘स्वाभिमानी’चा रास्ता...यवतमाळ :  शेतकऱ्यांच्या विविध...
सांगली जिल्ह्यात द्राक्ष बागांची छाटणी...सांगली : जिल्ह्यात गेल्या आठवड्यात अतिवृष्टीमुळे...
रत्नागिरीत सप्टेंबरमध्ये ३४ हेक्टर...रत्नागिरी ः मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात...
जळगाव जिल्ह्यात मुबलक पाणीजळगाव :  जळगाव जिल्ह्यातील मोठ्या व...
इगतपुरी तालुक्यात पावसामुळे २८५२...नाशिक : जिल्ह्यात झालेल्या परतीच्या...
चिखलीतील रस्त्याच्या दुरुस्तीसाठी ‘रयत’...बुलडाणा : चिखली तालुक्यातील पळसखेडा जयंती फाटा ते...
नांदेड जिल्ह्यात ओल्या दुष्काळासाठी...नांदेड : जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे खरिपासह बागायती...
कांदा बीजोत्पादनाच्या शास्त्रीय पद्धती बिजोत्पादन करताना जातीची शुद्धता, मानक प्रमाण आणि...
सरकारने नाकर्तेपणा दाखवू नये : दरकेर सोलापूर ः राज्य सरकार पंचनाम्याशिवाय मदत...
द्राक्ष पीक : पावसामुळे उद्भवलेल्या...सध्याच्या परिस्थितीचा विचार करता, सर्व द्राक्ष...