कृषी सल्ला (सोयाबीन, ऊस, खरीप ज्‍वारी, संत्रा /मोसंबी, डाळिंब )

संत्रा / मोसंबी फळबागेत रसशोषक पतंगांच्‍या व्‍यवस्‍थापनासाठी खाली पडलेली फळे गोळा करून नष्‍ट करावीत. सायंकाळी बागेत कडुनिंबाचा पाला व शेणाच्‍या गवऱ्यांचा धूर करावा.
सोयाबीनवरील करपा रोग आणि डाळींब फळावरील तेल्या रोग
सोयाबीनवरील करपा रोग आणि डाळींब फळावरील तेल्या रोग

संत्रा / मोसंबी फळबागेत रसशोषक पतंगांच्‍या व्‍यवस्‍थापनासाठी खाली पडलेली फळे गोळा करून नष्‍ट करावीत. सायंकाळी बागेत कडुनिंबाचा पाला व शेणाच्‍या गवऱ्यांचा धूर करावा. प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्‍त झालेल्‍या अंदाजानुसार मराठवाड्यात पुढील पाच दिवसात आकाश ढगाळ राहील. मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलका ते मध्‍यम स्‍वरूपाच्‍या पावसाची शक्‍यता आहे. १५ सप्‍टेंबर रोजी औरंगाबाद, जालना, बीड, लातूर, उस्‍मानाबाद व परभणी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्‍यता आहे. विस्तारित अंदाजानुसार (ईआरएफएस), मराठवाड्यात १६ ते २२ सप्‍टेंबर दरम्‍यान सरासरी पेक्षा जास्‍त पावसाची शक्‍यता आहे. सोयाबीन शेंगा भरणे अवस्‍था

  • मराठवाड्यात ढगाळ वातावरण, आर्द्रता व पावसामुळे उशिरा पेरणी केलेल्‍या सोयाबीन पिकावर शेंगा करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. याच्‍या नियंत्रणासाठी टेब्‍युकोनॅझोल (१० टक्के) अधिक सल्‍फर (६५ टक्के) (संयुक्‍त बुरशीनाशक) ५०० ग्रॅम किंवा टेब्‍युकोनॅझोल (२५.९ टक्के) २५० मिली प्रती एकर या प्रमाणे पावसाने उघडीप दिल्‍यास फवारणी करावी. आवश्‍यकता वाटल्‍यास दहा दिवसांनी परत एकदा फवारणी करावी. 
  • उशिरा पेरणी केलेल्‍या सोयाबीन पिकावरील तंबाखूवरील पाने खाणारी अळी व उंट अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यांच्या नियंत्रणासाठी फवारणी प्रति लिटर पाणी इंडोक्‍झाकार्ब (१५.८ टक्के) ०.७ मिली किंवा फ्ल्‍युबेंडिअमाईड (३९.३५ टक्के) ०.३ मिली किंवा इमामेक्‍टीन बेन्‍झोएट (१.९ टक्के)  ०.९ मिली.
  • खरीप ज्‍वारी

  • दाणे भरणे अवस्‍था 
  • खरीप ज्‍वारी पिकावरील कणसातील अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. अळीच्या नियंत्रणासाठी फवारणी प्रति लिटर पाणी ५ निंबोळी अर्क किंवा ॲझाडिरेक्टिन (१० हजार पीपीएम) २ ते ३ मिली.
  • ऊस 

  • वाढीची अवस्‍था
  • ऊस पिकावर रसशोषण करणाऱ्या किडींचा (पांढरी माशी, पाकोळी) प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यांच्या व्‍यवस्‍थापनासाठी क्‍लोरपायरीफॉस (२० टक्के) ३ मिली प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी. 
  • हळद

  • कंद वाढीची अवस्‍था
  • हळद पिकात कंदमाशीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. याच्‍या व्‍यवस्‍थापनासाठी, फवारणी प्रति लिटर पाणी, क्विनॉलफॉस (२५ टक्के) २ मिली किंवा डायमिथोएट (३० टक्के) १ मिली (ॲग्रेस्को शिफारस) १५ दिवसांच्या अंतराने चांगल्या दर्जाच्या स्टिकरसह आलटून-पालटून फवारणी करावी. 
  • उघडे पडलेले कंद मातीने झाकून घ्यावेत. 
  • अनेक ठिकाणी हळद पिकात मॅग्‍नेशिअम सल्‍फेटची कमतरता दिसून येत आहे. याच्‍या  व्‍यवस्‍थापनासाठी मॅग्‍नेशिअम सल्‍फेट २ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी.
  • संत्रा /मोसंबी फळवाढीची अवस्‍था 

  • लिंबुवर्गीय पिकांत कोळी किडींचा प्रादुर्भाव वाढत आहे. व्‍यवस्‍थापनासाठी, फवारणी प्रति लिटर पाणी, डायकोफॉल (१८.५ टक्के) २ मिली किंवा प्रोपरगाईट (२० टक्के) १ मिली किंवा इथिऑन (२० टक्के) २ मिली किंवा विद्राव्‍य गंधक ३ ग्रॅम.  पावसाने उघडीप दिल्यावर फवारणी करावी. आवश्‍यकता असल्‍यास दुसरी फवारणी १५ दिवसांच्‍या अंतराने करावी. 
  • संत्रा / मोसंबी फळबागेत रसशोषक पतंगांच्‍या व्‍यवस्‍थापनासाठी खाली पडलेली फळे गोळा करून नष्‍ट करावीत. सायंकाळी बागेत कडुनिंबाचा पाला व शेणाच्‍या गवऱ्यांचा धूर करावा.  १०० मिली फळाचा रस अधिक १०० ग्रॅम गूळ अधिक १०० मिली  मेलॅथीऑन व ९०० मिली पाणी मिसळून विषारी आमिष तयार करावे. हे द्रावण पसरट तोंडाच्‍या डब्यामध्ये घेऊन बागेमध्‍ये लटकून ठेवावेत. 
  • मृगबहार संत्रा मोसंबी फळबागेत फळवाढीसाठी सल्फेट ऑफ पोटॅश (००:००:५०) १५ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे पावसाने उघडीप  दिल्‍यास फवारणी करावी. 
  • डाळिंब

  • फळ वाढीची अवस्‍था 
  • ढगाळ व पावसाळी वातावरणामुळे तेलकट डाग (तेल्या) रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो. हे टाळण्यासाठी डाळिंब बागेत १ टक्के बोर्डो मिश्रणाची फवारणी करावी. 
  • बागेतील फुटवे काढावे.      
  • फूल शेती 

  • वाढीची / काढणी अवस्‍था 
  • फुलपिकात तणांचे व्‍यवस्‍थापन करावे.
  • काढणीस तयार असलेल्‍या फुलांची काढणी टप्प्‍याटप्प्‍याने करावी. प्रतवारी करून बाजारपेठेत पाठवावी. 
  • भाजीपाला

  • भेंडी पिकावरील फळ पोखरणारी अळीचा प्रादुर्भाव दिसून आल्‍यास, व्‍यवस्‍थापनासाठी फवारणी प्रति लिटर पाणी,
  • क्‍लोरॲण्ट्रानिलिप्रोल (१८.५ टक्के) ०.२५ मिली किंवा फेनप्रोपॅथ्रीन (१५ टक्के) अधिक पायरीप्रॉक्‍झीफेन ( ५ टक्के) (संयुक्त कीटकनाशक) १ मिली किंवा क्विनॉलफॉस (२५ टक्के) २ मिली.भाजीपाला पिकातील तणांचे व्‍यवस्‍थापन करावे. 
  • काढणीस तयार असलेल्‍या भाजीपाला पिकांची काढणी टप्प्‍याटप्प्‍याने करावी. प्रतवारी करून बाजारपेठेत पाठवावी.
  • तुती रेशीम उद्योग तुती लागवड केल्‍यानंतर तीन महिन्‍याने रेशीम कीटक संगोपन करता येते. पहिल्‍या वर्षात २ पिके तर दुसऱ्या वर्षापासून ५ ते ६ पिके प्रती वर्षी निघतात. एक एकर तुती बागेपासून वर्षात प्रति पीक २५० अंडीपुंज ते ३०० अंडीपुंज प्रमाणे २ क्विंटल प्रति पीक रेशीम कोषाचे उत्‍पादन मिळते. संपर्क- डॉ. कैलास डाखोरे, ७५८८९९३१०५ (मुख्‍य प्रकल्‍प समन्‍वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी. 

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com