कृषी सल्ला : कापूस, मका, गहू, उन्हाळी भुईमूग, डाळिंब, भेंडी

मध्य महाराष्ट्रामध्ये पुढील पाच दिवसात तुरळक ठिकाणी हलकासा पाऊस पडण्याची शक्यता आहे. काढणी केलेल्या रब्बी पिके सुरक्षित ठिकाणी ठेवण्याची व्यवस्था करावी.
Drip irrigation planning should be done keeping in view the soil type and crop requirement.
Drip irrigation planning should be done keeping in view the soil type and crop requirement.

मध्य महाराष्ट्रामध्ये पुढील पाच दिवसात तुरळक ठिकाणी हलकासा पाऊस पडण्याची शक्यता आहे. काढणी केलेल्या रब्बी पिके सुरक्षित ठिकाणी ठेवण्याची व्यवस्था करावी. कापूस

  • मागील हंगामातील कपाशीची धसकटे, पालापाचोळा जमा करून कंपोस्ट खड्ड्यात टाकावा, त्यामुळे त्यावर असलेल्या किडींच्या अवस्था नष्ट होतील.
  • एप्रिलमध्ये जमिनीची खोल नांगरट करावी, त्यामुळे जमिनीत असणाऱ्या गुलाबी बोंड अळीच्या सुप्त अवस्था वर येऊन उन्हाने मरतील किंवा पक्षी त्यांना टिपून खातील.
  • मका शेतामधील कापणी आणि इतर कामांसाठी शक्यतो यंत्राचा वापर करावा. जास्त गर्दी किंवा एकत्रित काम करणे टाळावे. गहू उशीरा पेरणी केलेला गहू काढणीस आलेला असल्यास काढणी शक्यतो सकाळचे वेळेतच करावी. शक्यतो पिकाची कापणी, मळणी आणि धान्य पोत्यात भरण्याचे काम एकाचवेळी कम्बाईन हार्वेस्टरच्या सहाय्याने करता येते. उन्हाळी भुईमूग पाने खाणाऱ्या अळीच्या किंवा पाने गुंडाळणाऱ्या अळीच्या नियंत्रणासाठी प्रती लीटर पाण्यात क्विनॉलफॉस (२५ ई.सी.) २ मिली. किंवा क्लोरपायरीफॉस (२०% प्रवाही) २.५ मिली मिसळून फवारणी करावी. डाळिंब फळ पोखरणाऱ्या अळीच्या (सुरसा) व्यवस्थापनासाठी ५% निंबोळी अर्क किंवा निंबोळीयुक्त कीटकनाशक (ॲझाडिरेक्टीन १० हजार पीपीएम ) २ मिली प्रति लीटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी. भेंडी पानाच्या शिरा पिवळ्या पडणे किंवा हळदू (येलोव्हेन मोझॅक व्हायरस) या रोगाचा प्रसार पांढरी माशी व तुडतुडे या किडींद्वारे होतो. उपाय

  • फुले उत्कर्षा, परभणी क्रांती या रोगप्रतिकारक जातींचा वापर करावा.
  • ५ टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी. किंवा व्हर्टीसिलीयम लेकॅनी ( बगीसाईड ) हे जैविक कीडनाशक २ ग्रॅम प्रती लीटर पाणी या प्रमाणे ८ दिवसांच्या अंतराने गरजेप्रमाणे फवारावे.
  • आधुनिक सिंचन पद्धतीचा वापर

  • प्रवाही सिंचन पद्धतीत शेतचारीतून ३० ते ४०% पर्यंत होणारा पाण्याचा अपव्यय टाळता येतो. ज्या जमिनीचा पाणी झिरपण्याचा वेग जास्त आहे, अशा जमिनीत आधुनिक सिंचन पद्धतीचा अवलंब फायदेशीर ठरतो. सरी, वरंबे व चारी खालील जमीन वाया जात नसल्यामुळे जवळपास १६% जास्तीचे क्षेत्र वापरता येते. आधुनिक सिंचन पद्धतीचा अवलंब करून नेमकेच पाणी दिल्याने पाण्याचा निचरा खोलवर होत नाही. जमिनीची धूप होत नाही. या पद्धतीद्वारे रासायनिक खते देणे शक्य असते.
  • पाणी वापरातील बचत ५०% पर्यंत व उत्पादनातही लक्षणीय वाढ होते. तणांचे प्रमाण, कीड व रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो. तुषार सिंचनात क्षारयुक्त पाण्याचा वापर करणे शक्य असते. तुषार सिंचनानंतर पाऊस पडला तरी पिकांवर अनिष्ठ परिणाम होत नाही. कमी वेळेमध्ये जास्त क्षेत्रावर सिंचन करता येते. पाण्याच्या कमतरतेनुसार पाण्याचा कार्यक्षम वापर होण्यासाठी आधुनिक सिंचन पद्धतींचा वापर ( ठिबक सिंचन व तुषार सिंचन) पीकनिहाय वेगवेगळ्या स्वरूपांत करावा. त्यामुळे पाण्याची बचत होऊन जमिनीचा पोत सुधारतो . आधुनिक सिंचन पद्धतीचा वापर न केलेल्या पिकांच्या तुलनेत १००% उत्पादनात वाढ दिसून येते. उत्पादित होणाऱ्या मालाची गुणवत्ता व प्रत देखील उल्लेखनीय असते.
  • संपर्क- ०२४२६-२४३२३९ (कृषी विद्या विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com