कृषी सल्ला : कापूस, तूर, सोयाबीन, भुईमूग, भुईमूग, सूर्यफूल, मूग, उडीद

हुमणीच्या नियंत्रणासाठी, निंब, बाभूळ व बोर या झाडावरील हुमणीचे भुंगेरे प्रकाश कंदील, दिव्यांच्या साह्याने गोळा करून नष्ट करावेत. हे काम रात्रीच्या वेळी सामुदायिकरीत्या केल्यास अधिक फायदेशीर ठरते.
vaibhav variety of green gram
vaibhav variety of green gram

हुमणीच्या नियंत्रणासाठी, निंब, बाभूळ व बोर या झाडावरील हुमणीचे भुंगेरे प्रकाश कंदील, दिव्यांच्या साह्याने गोळा करून नष्ट करावेत. हे काम रात्रीच्या वेळी सामुदायिकरीत्या केल्यास अधिक फायदेशीर ठरते. कृषी सल्ला (राहूरी विद्यापीठ)

  • शेतीचे कामे करताना मजूरांना ४ ते ५ फुटाचा पट्टा वाटून द्यावा. यामुळे काम योग्य होण्यासोबतच योग्य सामाजिक अंतरही ठेवले जाईल. शेती यंत्रे निर्जंतुकीकरण करावीत. तोंडाला मास्क अथवा कापड गुंडाळावे.
  • पावसाचा अंदाज घेऊनच पिकावर कीटकनाशकाची, बुरशीनाशकाची फवारणी करावी.
  • पावसाळ्यात फवारणी करताना स्टिकरचा वापर करावा.
  • पिकांची निवड जमिनीनुसार

  • भारी : कापूस, तूर, सोयाबीन
  • मध्यम : सूर्यफूल, तूर, बाजरी, सोयाबीन
  • हलकी : बाजरी, कुळीथ, तीळ, कारळा, एरंडी
  • ऊस हुमणीच्या नियंत्रणासाठी, निंब, बाभूळ व बोर या झाडावरील हुमणीचे भुंगेरे प्रकाश कंदील, दिव्यांच्या साह्याने गोळा करून नष्ट करावेत. हे काम रात्रीच्या वेळी सामुदायिकरीत्या केल्यास अधिक फायदेशीर ठरते. कापूस पेरणीची तयारी बी.टी. कपाशीची लागवड केली नसल्यास योग्य ओल मिळताच त्वरित करून घ्यावी. जमिनीच्या प्रकारानुसार योग्य बियाण्याची निवड करावी. लागवड ९०×९० सें.मी. किंवा १२०×६० सें.मी. अंतरावर करावी. लागवडीपूर्वी जमीन ओलावून घ्यावी. तसेच हेक्टरी १० टन शेणखत द्यावे. बी.टी. कपाशीला १२५ किलो नत्र, ६५ किलो स्फुरद आणि ६५ किलो पालाश या प्रमाणात खताची मात्रा द्यावी. सोयाबीन सुधारित वाण जेएस-३३५, एमएसीएस-११८८, फुले कल्याणी (डीएस-२२८), जेएस-९३०५, केएस-१०३, फुले अग्रणी, (केडीएस ३४४) आणि फुले संगम (केडीएस ७२६) बीजप्रक्रिया बुरशीजन्य रोगांपासून संरक्षण करण्यासाठी प्रतिकिलो बियाण्यास ५ ग्रॅम ट्रायकोडर्मा चोळावे. तसेच नत्र स्थिरीकरणासाठी सोयाबीन गटाचे रायझोबिअम २५० ग्रॅम अधिक स्फुरद विरघळविणारे जिवाणू २५० ग्रॅम प्रति १० किलो बियाणास चोळावे. तूर वाणांची निवड  विपुला, फुले राजेश्वरी, आयसीपीएल-८७, एकेटी-८८११, बीएसएमआर-८५३, बीएसएमआर-७३६, बीडीएन-७११, बीडीएन-७१६ बीजप्रक्रिया पेरणीपूर्वी प्रतिकिलो बियाणास ५ ग्रॅम ट्रायकोडर्माची बीजप्रक्रिया करावी. यानंतर रायझोबियम २५० ग्रॅम प्रती १० किलो बियाणे या प्रमाणे गुळाच्या थंड द्रावणातून चोळावे. भुईमूग सुधारित वाण एसबी-११, जेएल-२४ (फुले प्रगती), टीअेजी-२४, जेएल-२२० (फुले व्यास), जेएल-२८६ (फुले उनप), टीपीजी-४१, टीजी-२६, जेएल-५०१, फुले आरएचआरजी-६०२१, फुले उन्नती, जेएल-७७६ (फुले भारती) बीजप्रक्रिया बियाण्यापासून प्रादुर्भाव होणाऱ्या व रोपावस्थेत येणाऱ्या रोगांपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी पेरणीपूर्व प्रति किलो बियाण्यास ५ ग्रॅम थायरम किंवा कार्बेन्डाझिम २ ग्रॅम किंवा मॅन्कोझेब ३ ग्रॅम किंवा ट्रायकोडर्मा ५ ग्रॅम यापैकी एक बीज प्रक्रिया करावी. नंतर एक किलो बियाण्यास रायझोबियम २५ ग्रॅम आणि स्फुरद विरघळणारे जिवाणू संवर्धक २५ ग्रॅम या प्रमाणात चोळावे. बीजप्रक्रिया केलेले बियाणे सावलीत सुकवून पेरावे. सूर्यफूल वाणांची निवड 

  • सुधारित जाती -फुले भास्कर, एस एस-५६, मॉर्डेन, ई सी-६८४१४, भानू
  • संकरित वाण : के बी एस एच-१, एल एस एफ एच-१७१, एल एस एफ एच-३५, एल एस एफ एच -४४, फुले रविराज, एम एस एफ एच-१७
  • बीजप्रक्रिया केवडा रोग टाळण्यासाठी मेटॅलॅक्झील (३५ डब्लु.एस.)६ ग्रॅम प्रति किलो बियाणे या प्रमाणे चोळावे. तसेच विषाणूजन्य (नॅक्रॉसिस) रोगाच्या प्रतिबंधासाठी इमिडॅक्लोप्रिड (७० डब्ल्यू.पी. ५ ग्रॅम प्रति किलो बियाणे लावावे. त्यानंतर अॅझोटोबॅक्टर हे जिवाणू खत २५ ग्रॅम प्रति किलो बियाण्यास पेरणीपूर्वी लावावे. भुईमूग वाणांची निवड

  • संकरित : फुले आदिशक्ती, फुले महाशक्ती
  • सुधारित : धनशक्ती
  • बीज प्रक्रिया

  • २० टक्के मिठाच्या द्रावणाची बीजप्रक्रिया: बीजप्रक्रिया केलेले प्रमाणित बियाणे उपलब्ध नसल्यास पेरणीपूर्वी बियाण्यास २० टक्के मिठाच्या द्रावणाची प्रक्रिया करावी. त्यासाठी १० लीटर पाण्यात २ किलो मीठ विरघळावे. पाण्यावर तरंगणारे बुरशीयुक्त हलके बियाणे बाजूला काढून त्यांचा नाश करावा. तळाला असलेले निरोगी आणि वजनाने जड असलेले बियाणे वेगळे करून पाण्याने २ ते ३ वेळा धुवावे. त्यानंतर सावलीत वाळवून पेरणीसाठी वापरावे.
  • पेरणीपूर्वी बियाण्यास मेटॅलॅक्झील (३५ डब्ल्यू.एस.) ६ ग्रॅम प्रति किलो बियाण्यास चोळून नंतर पेरणी करावी.
  • अॅझोस्पिरीलम २५ ग्रॅम प्रती किलो बियाण्यास चोळून पेरणी करावी. त्यामुळे नत्र खताची २० ते २५ टक्के बचत होऊन उत्पादनात १० टक्के वाढ होते. तसेच स्फुरद विरघळविणारे जिवाणूची २५ ग्रॅम प्रति किलो बियाणे या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी.
  • मूग व उडीद वाणांची निवड   मुगामध्ये अनेक वाण उपलब्ध आहेत. यातील वैभव हा वाण खरिपासाठी उपयुक्त आहे. मुगामध्ये वैभव व बीपीएमआर-१४५ हे दोन वाण भुरी रोगप्रतिकारक व अधिक उत्पादन देणारे चांगले वाण आहेत.

    उडीद वाण : टीपीयू-४ व टीएयू-१.

    बीजप्रक्रिया  पेरणीपूर्वी प्रति किलो बियाणास ट्रायकोडर्मा ५ ग्रॅम चोळावे. त्यानंतर रायझोबियम जिवाणू २५ ग्रॅम प्रती किलो बियाणे या प्रमाणे गुळाच्या थंड पाण्यामध्ये मिसळून लावावे.

    मका बीजप्रक्रिया  २ ते २.५ ग्रॅम थायरम/ किलो बियाण्यास पेरणीपूर्वी लावावे. तसेच पेरणीपूर्वी अॅझोटोबॅक्टर वापरावे.

    कांदा सुधारित वाण  फुले समर्थ, बसवंत ७८०, अॅग्री फाऊंड डार्क रेड या सुधारित वाणांची निवड करावी.

    रोपवाटिका  १ ते १.५ मी रुंद, ३ मी. लांब, २० सें.मी. उंच असे गादीवाफे तयार करावेत.

    बीजप्रक्रिया अॅझोस्पिरीलम व स्फुरद विरघळणारे जिवाणू २५ ग्रॅम/किलो बियाण्यास पेरणीपूर्वी चोळावे.

    संपर्क - ०२४२६ -२४३२३९ (कृषी विद्या विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com