कृषी सल्ला (कापूस, तूर, सोयाबीन, भुईमूग, सूर्यफूल, बाजरी, मूग व उडीद)

पेरणीयोग्य पाऊस झालेल्या ठिकाणी वाफसा आल्यानंतर, जमिनीतील ओलावा पाहून व पुढील पावसाचा अंदाज लक्षात घेऊन पेरणी करावी. पेरणीपूर्वी बियाण्यास बीजप्रक्रिया करणे आवश्यक आहे.
agri advisory by rahuri university
agri advisory by rahuri university

पेरणीयोग्य पाऊस झालेल्या ठिकाणी वाफसा आल्यानंतर, जमिनीतील ओलावा पाहून व पुढील पावसाचा अंदाज लक्षात घेऊन पेरणी करावी. पेरणीपूर्वी बियाण्यास बीजप्रक्रिया करणे आवश्यक आहे.

पिकांची निवड जमिनीनुसार

  • भारी : कापूस, तूर, सोयाबीन
  • मध्यम : सूर्यफूल, तूर, बाजरी, सोयाबीन
  • हलकी : बाजरी, कुळीथ, तीळ, कारळा, एरंडी
  • कापूस पेरणी अवस्था पेरणीनंतर कापसाची सर्वसाधारणपणे १० दिवसांत उगवण होते. ज्या ठिकाणी उगवण झालेली नसेल, त्या ठिकाणी राखून ठेवलेल्या त्याच वाणाचे बियाणे नांग्या भरण्यासाठी वापरावे. लगेच पाणी द्यावे. १५ दिवसांनंतर प्रत्येक फुलीवर दोनच जोमदार रोपे ठेवून बाकीची उपटून टाकावीत.

    सोयाबीन पेरणी अवस्था सुधारित वाण जेएस-३३५, एमएसीएस-११८८, फुले कल्याणी (डीएस-२२८), जेएस-९३०५, केएस-१०३, फुले अग्रणी, (केडीएस ३४४) आणि फुले संगम (केडीएस ७२६) बीजप्रक्रिया बुरशीजन्य रोगांपासून संरक्षण करण्यासाठी ट्रायकोडर्मा ५ ग्रॅम प्रतिकिलो याप्रमाणे चोळावे. तसेच, नत्र स्थिरीकरणासाठी सोयाबीन गटाचे रायझोबियम २५ ग्रॅम अधिक स्फुरद विरघळवणारे जिवाणू २५ ग्रॅम प्रतिकिलो बियाण्यास चोळावे.

    तूर पेरणी वाणांची निवड विपुला, फुले राजेश्वरी, आयसीपीएल-८७, एकेटी-८८११, बीएसएमआर-८५३, बीएसएमआर-७३६, बीडीएन-७११, बीडीएन-७१६ बीजप्रक्रिया पेरणीपूर्वी बियाण्यास ट्रायकोडर्मा ५ ग्रॅम प्रतिकिलो याप्रमाणे बीजप्रक्रिया करावी. यानंतर रायझोबियम २५ ग्रॅम प्रतिकिलो बियाण्यास गुळाच्या थंड द्रावणातून चोळावे.

    भुईमूग पेरणी सुधारित वाण एसबी-११, जेएल-२४ (फुले प्रगती), टीएजी-२४, जेएल-२२० (फुले व्यास), जेएल-२८६ (फुले उनप), टीपीजी-४१, टीजी-२६, जेएल-५०१, फुले आरएचआरजी-६०२१, फुले उन्नती, जेएल-७७६ (फुले भारती) बीजप्रक्रिया बियाण्यापासून प्रादुर्भाव होणाऱ्या व रोपावस्थेत येणाऱ्या रोगांपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी पेरणीपूर्व प्रतिकिलो बियाण्यास थायरम ५ ग्रॅम किंवा कार्बेन्डाझिम २ ग्रॅम किंवा मॅन्कोझेब ३ ग्रॅम किंवा ट्रायकोडर्मा हे जैविक बुरशीनाशक ५ ग्रॅम चोळावे. नंतर एक किलो बियाण्यास २५ ग्रॅम रायझोबियम आणि २५ ग्रॅम स्फुरद विरघळणारे जिवाणुसंवर्धक चोळावे. बीजप्रक्रिया केलेले बियाणे सावलीत सुकवून पेरावे.

    सूर्यफूल पेरणी वाणांची निवड

  • सुधारित जाती-  फुले भास्कर, एसएस-५६, मॉर्डेन, ई सी-६८४१४, भानू
  • संकरित वाण-  केबीएसएच-१, एलएसएफएच-१७१, एलएसएफएच-३५, एलएसएफएच -४४, फुले रविराज, एमएसएफएच-१७
  • बीजप्रक्रिया केवडा रोग टाळण्यासाठी मेटॅलॅक्झील (३५ डब्लू.एस.) ६ ग्रॅम प्रतिकिलो बियाण्यास चोळावे. तसेच, सुरुवातीच्या टप्प्यातील किडींच्या प्रतिबंधासाठी इमिडॅक्लोप्रिड (७० डब्ल्यू.एस.) ५ ग्रॅम प्रतिकिलो बियाण्यास लावावे. त्यानंतर ॲझोटोबॅक्टर हे जिवाणू खत २५ ग्रॅम प्रतिकिलो बियाण्यास पेरणीपूर्वी लावावे.

    बाजरी पेरणी वाणांची निवड

  • संकरित- ले आदिशक्ती, फुले महाशक्ती
  • सुधारित- धनशक्ती
  • बीजप्रक्रिया

  • २० टक्के मिठाच्या द्रावणाची बीजप्रक्रिया-  बीजप्रक्रिया केलेले प्रमाणित बियाणे उपलब्ध नसल्यास पेरणीपूर्वी बियाण्यास २० टक्के मिठाच्या द्रावणाची प्रक्रिया करावी, त्यासाठी १० लिटर पाण्यात २ किलो मीठ विरघळावे. पाण्यावर तरंगणारे बुरशीयुक्त हलके बियाणे बाजूला काढून त्यांचा नाश करावा. तळाला असलेले निरोगी आणि वजनाने जड असलेले बियाणे वेगळे करून पाण्याने २ ते ३ वेळा धुवावे. त्यानंतर सावलीत वाळवून पेरणीसाठी वापरावे.
  • रासायनिक बीजप्रक्रिया-  पेरणीपूर्वी बियाण्यास मेटॅलॅक्झील (३५ डब्लू.एस.) ६ ग्रॅम प्रतिकिलो बियाण्यास चोळून नंतर पेरणी करावी.
  • जैविक बीजप्रक्रिया-  ॲझोस्पिरीलम २५ ग्रॅम प्रतिकिलो बियाण्यास चोळून पेरणी करावी, त्यामुळे २० ते २५ टक्के नत्र खताची बचत होऊन उत्पादनात १० टक्के वाढ होते. तसेच, स्फुरद विरघळवणाऱ्या जिवाणूची २५ ग्रॅम प्रतिकिलो बियाणे या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी.
  • मूग व उडीद

    पेरणी वाणांची निवड 

  • मुगामध्ये अनेक वाण उपलब्ध आहेत. यातील वैभव हा वाण खरिपासाठी उपयुक्त आहे. मुगामध्ये वैभव व बीपीएमआर-१४५ हे दोन वाण रोगप्रतिकारक व अधिक उत्पादन देणारे चांगले वाण आहेत. हे दोन्ही भुरी रोगाला प्रतिकारक आहेत.
  • उडीद - टीपीयू-४ व टीएयू-१.
  • बीजप्रक्रिया पेरणीपूर्वी प्रतिकिलो बियाणास ५ ग्रॅम ट्रायकोडर्मा पावडर लावावी. त्यानंतर २५ ग्रॅम रायझोबियम जिवाणूची पावडर गुळाच्या थंड पाण्यामध्ये मिसळून लावावी.

    संपर्क - ०२४२६- २४३२३९ (प्रमुख, कृषी विद्या विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com