कृषी सल्ला (ऊस, भात, मूग/उडीद, तूर, सोयाबीन, भूईमूग, भाजीपाला पिके)

बऱ्याच ठिकाणी नदी, नाले किंवा ओढे यांच्यामुळे पुरामध्ये ऊस बुडतो.अशा ठिकाणी पाणी ओसरून गेल्यानंतर शेतात साचलेले पाणी लहान लहान चरांद्वारे त्वरित निचरा करून घ्यावे.ऊस पडला, लोळला असल्यास तो एकमेकास बांधून उभा करावा. ​
agri advisory by rahuri university
agri advisory by rahuri university

बऱ्याच ठिकाणी नदी, नाले किंवा ओढे यांच्यामुळे पुरामध्ये ऊस बुडतो. अशा ठिकाणी पाणी ओसरून गेल्यानंतर शेतात साचलेले पाणी  लहान लहान चरांद्वारे त्वरित निचरा करून घ्यावे. ऊस पडला, लोळला असल्यास तो एकमेकास बांधून उभा करावा. ऊस

  • तांबडे ठिपके (ब्राऊन स्पॉट)-  सध्याच्या ढगाळ हवामानामुळे पिकावर या रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. नियंत्रणासाठी (फवारणी प्रति लिटर पाणी) कार्बेन्डाझीम* १ ग्रॅम किंवा मॅन्कोझेब* २.५ ग्रॅम. ऊस मोठा असल्यास बांबूला गन जोडून व्यवस्थित फवारणी करावी. 
  • तांबेरा रोग-  प्रादुर्भाव दिसून आल्यावर, नियंत्रणासाठी (फवारणी प्रति लिटर पाणी) टेब्युकोनॅझोल* १ मिली. १०-१५ दिवसांच्या अंतराने स्टिकरचा वापर करुन २-३ फवारण्या कराव्यात. 
  • पांढऱ्या माशी  - प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात असल्यास, नियंत्रणासाठी (फवारणी प्रति लिटर पाणी) डायमेथोएट (३०% प्रवाही)* २.६ मिली. 
  • बऱ्याच ठिकाणी नदी, नाले किंवा ओढे यांच्यामुळे पुरामध्ये ऊस बुडतो. 
  • अशा ठिकाणी पाणी ओसरून गेल्यानंतर शेतात साचलेले पाणी  लहान लहान चरांद्वारे त्वरित निचरा करून घ्यावे. 
  • ऊस पडला, लोळला असल्यास तो एकमेकास बांधून उभा करावा. ऊस कांड्यांचा जमिनीशी संपर्क येऊ देऊ नये, अन्यथा त्याला कांडीवर मुळ्या अथवा पांगशा फुटतात. शक्य असल्यास २-३ वेळा हलकी भरणी करून उसाला मातीचा आधार द्यावा.
  • अशा बाधित क्षेत्रात वाफशावरती शिफारशीच्या २५ % नत्र, स्फुरद व पालाशयुक्त खते आणि एकरी ८-१० किलो झिंक सल्फेट शेणखतात मिसळून द्यावीत. उसाची पुन्हा जोमाने वाढ होण्यास मदत होईल. 
  • उसाचे वाढे/ शेंडे संपूर्ण पाण्यात राहून ऊस पूर्ण कुजून वाळला असल्यास तो धारदार कोयत्याने जमिनीलगत तोडून घ्यावा. कंम्पोस्ट खत तयार करण्यासाठी वापरावा. शक्य असल्यास अशा ४-६ महिने वयाच्या उभ्या उसाचा खोडवा राखावा. मात्र तोडलेल्या बुंध्यावरती कार्बेन्डाझीम* १ ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणात फवारणी करावी.
  • भात हवामानाच्या अंदाजानुसार किमान तापमानामध्ये वाढ व दुपारच्या आर्द्रतेमध्ये घट होण्याची शक्यता आहे. अशा वातारणात तपकिरी तुडतुड्यांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असते. तपकिरी तुडतुडे नियंत्रण  (फवारणी प्रति लिटर पाणी)

  • इमिडाक्लोप्रीड (१७.८ एस.एल.)* ०.२५ मिली किंवा 
  • फिप्रोनील (५ % एस.सी.)* ३ मिली. 
  • (प्रति हेक्टरी फवारणीसाठी ५०० लिटर पाणी वापरावे.) 
  • अधिक फुटवे फुटण्याच्या अवस्थेत भात खाचरामध्ये पाण्याची पातळी ३ ते ५ से.मी. ठेवावी. भात पोटरीच्या अवस्थेत असताना ५ ते १० सें.मी. ठेवावी.
  • पाने गुंडाळणारी अळी जैविक नियंत्रणासाठी “ट्रायकोग्रामा चिलोनीस” या प्रजातीचे एक लाख प्रौढ प्रति हेक्टरी आठवड्याच्या अंतराने चार वेळा प्रसारीत करावेत. निळे भुंगेरे आणि पाने गुंडाळणारी अळी  (फवारणी प्रति लिटर पाणी)  

  • क्विनॉंलफॉस (२५ टक्के प्रवाही) ४ मिली किंवा 
  • लॅम्बडा सायहॅलोथ्रीन (५ टक्के प्रवाही) ०.५ मिली. (हेक्टरी फवारणीसाठी ५०० लिटर द्रावण वापरावे.)
  • मुग/उडीद सध्या बहुतांश पिके काढणीच्या अवस्थेत आहेत. त्यांची काढणी करून व्यवस्थित सुर्यप्रकाशात वाळवून कोरड्या जागी साठवणूक करावी.  भुरी रोग सध्याच्या ढगाळ हवामानात उशीरा पेरलेल्या पिकांत या रोगाचा प्रादुर्भाव येऊ शकतो.  नियंत्रण (फवारणी प्रति लिटर पाणी)

  • सल्फर (८०% डब्लू.पी.) ३ ग्रॅम किंवा 
  • कार्बेन्डान्झीम (५०% डब्लू.पी.) १ ग्रॅम.
  • तूर पाने गुंडाळणारी अळी तूर पिकात या अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. नियंत्रण (फवारणी प्रति लिटर पाणी)

  • ॲझाडीरेक्टीन (१५०० पी.पी.एम.) ५ मिली.
  • किडीचे प्रमाण जास्त असल्यास, क्विनॉलफॉस (२५ टक्के प्रवाही) १.६ मिली.
  • सोयाबीन

  • पाने खाणारी व केसाळ अळीः सापळा पिकावर आकर्षित झालेल्या अळ्यासहित प्रादुर्भावग्रस्त पाने व अंडी गोळा करुन नष्ट करावीत. 
  • कमाल तापमान २६ ते २७ अंश सेल्सिअस तर किमान तापमान २१ ते २२ अंश सेल्सिअस आणि सकाळची आर्द्रता ९० पेक्षा जास्त असल्यास, सोयाबीन पिकामध्ये पाने खाणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे.
  • प्रतिबंधात्मक उपाय म्हणून हेक्टरी ५ याप्रमाणे स्पोडोल्युरयुक्त फेरोमोन सापळे लावावेत.
  • नियंत्रण (फवारणी प्रति लिटर पाणी)

  • एन्डोक्झाकार्ब (१५.८% ई.सी.) ०.६६ मिली.
  • भुईमुग टिक्का आणि तांबेरा तापमान २६ ते ३१ अंश सेल्सिअस, हवेतील आर्द्रता ८५ टक्क्यापेक्षा जास्त, वाऱ्याचा वेग आणि पाऊस असल्यास या रोगांचा प्रादुर्भाव जास्त होतो. हवामान अंदाजानुसार तापमान, हवेतील आर्द्रता, वाऱ्याचा वेग या दरम्यान राहण्याची शक्यता अशून, भुईमुग पिकावर टिक्का व तांबेरा रोगांचा प्रादुर्भाव वाढू शकतो. नियंत्रण (फवारणी प्रति लिटर पाणी)

  • मॅन्कोझेब २.५ ग्रॅम अधिक कार्बेन्डाझीम २.५ ग्रॅम. (टॅंक मिक्स)
  • भाजीपाला सल्ला

  • रांगडा कांदा पिकाची लागवड सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून सुरु करावी. 
  • रब्बी हंगामात कोबी, फुलकोबी या पिकाच्या ऑक्टोबर लागवडीसाठी योग्य असणाऱ्या या जातीची लागवड करावी. 
  • लसूण पिकाच्या लागवडीसाठी १५ ऑक्टोबर पर्यंत जमिनीची मशागत व अन्य तयारी करावी.
  • महाराष्ट्रामध्ये सध्याच्या ढगाळ व पावसाळी वातावरणामुळे भाजीपाला पिकांवर किडींचा व बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. 
  • सध्या वेलवर्गीय भाजीपाला (काकडी, दुधी भोपळा, कारली, घोसाळी इ.) पिकांवर रस शोषणाऱ्या किडी, नाग अळी, फळ माशी व केवडा, भुरी रोग दिसून येत आहे. ​
  • फुलकिडे, मावा व पांढरी माशी या किडी पानातील रस शोषून घेतात. तसेच त्यांच्यामुळे विविध विषाणूजन्य रोगांचा प्रसार होतो.   नियंत्रण (फवारणी प्रति लिटर पाणी)

  • थायामेथोक्झाम (२५ डब्ल्यू.जी.) ०.४ ग्रॅम किंवा 
  • कार्बोसल्फान (२५ ई.सी.) १.५ मिली
  • नाग अळी ही पानांच्या आत राहून आतील हरितद्रव्याचा भाग खाते. पानांवर नागमोडी रेषा तयार होतात.  नियंत्रण (फवारणी प्रति लिटर पाणी)

  • इथिऑन अधिक सायपरमेथ्रीन (संयुक्त किटकनाशक) २ मिली.
  • फळमाशी   ही फळांच्या वरील पापुद्र्यात अंडी घालते. त्यातून बाहेर पडलेल्या अळ्या फळात राहून गर खातात. त्यामुळे फळे सडतात, वेडीवाकडी होतात आणि अकाली पक्व होतात.  नियंत्रण (फवारणी प्रति लिटर पाणी) 

  • क्यु-ल्युरचे एकरी ५ सापळे लावावेत. 
  • मेलॅथिऑन (५० ई.सी.) २ मिली अधिक १० ग्रॅम गूळ.
  • केवडा (डाऊनी मिल्ड्यू)  काकडी, कारली, दोडका, घोसाळी, दुधी भोपळा, तांबडा भोपळा या वेलवर्गीय पिकांवर सुडोपेरोनोस्पोरा कुबेन्सीस नावाच्या बुरशीमुळे केवडा रोग होतो. सुरुवातीला पानाच्या वरच्या बाजूला फिक्कट हिरवे पिवळसर रंगाचे ठिपके दिसतात. ढगाळ हवामानात या ठिपक्यांच्या खालच्या बाजूला जांभळट रंगाची बुरशीची वाढ झालेली दिसते. नंतर हेच जांभळट डाग पांढरे काळे किंवा राखाडी झालेली दिसतात.  नियंत्रण (फवारणी प्रति लिटर पाणी)

  • रोगाची लक्षणे दिसताच रोगग्रस्त पाने काढून नष्ट करावीत. 
  • प्रतिबंधक उपाय-  बियाण्यांची उगवण झाल्यानंतर २० दिवसांपासून ८ ते १० दिवसाच्या अंतराने क्लोरोथॅलोनील किंवा मॅन्कोझेब किंवा कॉपर ऑक्झिक्लोराईड प्रत्येक २.५ ग्रॅम. 
  • प्रार्दुभाव जास्त दिसताच, मेटॅलॅक्झिल एम. अधिक मॅन्कोझेब(संयुक्त बुरशीनाशक) २.५ ग्रॅम.
  • भुरी (पावडरी मिल्ड्यू) बहुतांश सर्वच वेलवर्गीय पिकांमध्ये ईरीसीफी सीकोरेसीआरम नावाच्या बुरशीमुळे भुरी रोग येतो. रोगाची सुरुवात प्रथम जुन्या पानांपासून होते. पानाच्या दोन्ही पृष्ठभागावर पिठासारखी पांढरी बुरशी वाढते.  नियंत्रण (फवारणी प्रति लिटर पाणी)

  • डिनोकॅप १ मिली किंवा 
  • पेनकोनॅझोल १ मिली किंवा 
  • कार्बेन्डाझिम १ ग्रॅम. 
  • आवश्यकतेनुसार पुढील फवारणी बुरशीनाशक बदलून करावी.
  • (* लेबल क्लेम नाही, मात्र ॲग्रेस्को शिफारस आहे.) संपर्क- डॉ. पंडित खर्डे (प्रसारण केंद्र प्रमुख), ८२७५०३३८२२, डॉ. अशोक वाळूंज (कीटकशास्त्रज्ञ), ७५८८६९५४३२  (महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी जि.नगर)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com