agriculture news in Marathi, Agri commissioner meeting , Maharashtra | Agrowon

कृषी आयुक्तांनी केली अधिकाऱ्यांची कानउघाडणी

टीम अॅग्रोवन
रविवार, 5 ऑगस्ट 2018

पुणे: कृषी खात्यात वर्षानुवर्षे खुर्च्यांना वेटोळे घालून बसलेल्या निगरगट्ट अधिकाऱ्यांचे पगार कापण्याचे आदेश दिल्यानंतर विनाकारण फाईल पेंडिग ठेवलेल्या अधिकाऱ्यांना कृषी आयुक्त सच्चिंद्र प्रताप सिंह यांनी चांगलेच फैलावर घेतले. आयुक्तांनी बैठक घेऊन अतिशय तिखट भाषेत काही अधिकाऱ्यांना झापल्याने कामचुकार कर्मचारी चांगलेच हादरले आहेत.

पुणे: कृषी खात्यात वर्षानुवर्षे खुर्च्यांना वेटोळे घालून बसलेल्या निगरगट्ट अधिकाऱ्यांचे पगार कापण्याचे आदेश दिल्यानंतर विनाकारण फाईल पेंडिग ठेवलेल्या अधिकाऱ्यांना कृषी आयुक्त सच्चिंद्र प्रताप सिंह यांनी चांगलेच फैलावर घेतले. आयुक्तांनी बैठक घेऊन अतिशय तिखट भाषेत काही अधिकाऱ्यांना झापल्याने कामचुकार कर्मचारी चांगलेच हादरले आहेत.

कृषी आयुक्तालयातील निगरगट्ट कारभार हा राज्यभर सतत चर्चेचा विषय झाला आहे. अधिकारी कोणालाही जुमानत नसल्याचा पुरावा म्हणून तत्कालीन कृषी आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या बदलीचा आजही उल्लेख केला जातो. काही अधिकाऱ्यांनीच ही बदली घडवून आणली होती. मधल्या काळात नवे आयुक्त श्री. सिंह यांनी समुपदेशन बदल्यांमध्ये आयुक्तांनी मोक्याची व मलईदार पदे ब्लॉक केली होती.

मात्र, अधिकाऱ्यांनी मंत्रालयात जॅक लावून हव्या तशा बदल्या करून घेतल्या होत्या. तसेच, बदल्या झाल्यानंतरदेखील शेकडो अधिकारी आपल्या पदाला चिकटून राहिले होते. त्यामुळेच श्री. सिंह यांनी अधिकाऱ्यांचे पगार कापण्याचे आदेश दिल्यानंतर पळापळ झाली होती.

कृषी आयुक्तालयात शासकीय योजना तसेच शेतकरी संबंधित कोणत्याही फाईल पेंडिंग ठेवू नका, अशा लेखी सूचना यापूर्वीच श्री. सिंह यांनी दिल्या होत्या. तरीही काही महाभागांनी आयुक्तांच्या सूचनांकडे दुर्लक्ष केले होते. त्यामुळे सतत दोन बैठका घेऊन आयुक्तांनी प्रलंबित फाईल्सचा आढावा घेतला. ‘‘आयुक्त आढावा घेत असताना एक कर्मचारी बेधडक फोनवर बोलत होता. आयुक्तांनी या कर्मचाऱ्याला एक तास बैठकीत उभे राहण्याची शिक्षा दिली. काही कामचुकार कर्मचाऱ्यांना अतिशय तिखट भाषेत आयुक्त बोलल्यामुळे अधिकाऱ्यांची भंबेरी उडाली’’ अशी माहिती उच्चपदस्थ सूत्रांनी दिली.

‘‘आपण शेतकऱ्यांचे नोकर आहोत. शेतकऱ्यांसाठी आपण किती काम करतो. मिळणाऱ्या पगाराची जाणीव ठेवून आपण काम केले पाहिजे. केवळ दिवस काढण्यात काहीही उपयोग नाही. तुमच्या काही अडचणी असल्यास मला सांगा पण कामे प्रलंबित राहता कामा नये,’’ अशी भावना आयुक्तांनी व्यक्त केली आहे.

कृषी आयुक्तांनी अशा दिल्या सूचना

  • कामावर वेळेत या आणि वेळेच्या आधी कार्यालय सोडू नका
  • शेतकऱ्यांची कोणतेही कामे मुदतीत झालीच पाहिजे
  • कामचुकार कर्मचारी शोधण्यासाठी सर्व ठिकाणी थंब पंचिंग मशीन लावा
  • काय काम करतात, काय पेंडिंग ठेवले आणि का पेंडिंग ठेवले याचा अहवाल सादर करा
  • क्षेत्रिय पातळीवरदेखील पेंडन्सी नको. आयुक्त स्वतः तपासणी करणार
  • आढावा बैठकीला गैरहजर राहिलेल्या कर्मचाऱ्यांचे अहवाल मागविले

इतर अॅग्रो विशेष
पंतप्रधान किसान ट्रॅक्टर योजना... पुणे : ‘पंतप्रधान किसान ट्रॅक्टर योजना...
द्राक्ष पीककर्ज कर्जमाफीत बसेना आणि...नाशिक : द्राक्षासाठी घेतलेले पीककर्ज  ...
कर्जमाफीसाठी दीड हजार कोटीमुंबई: महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
जैविक खतांचा वापर सक्तीचा होणार पुणे: युरिया विकत घेताना जैविक खते देखील विकत...
राज्यातील पंधरा जिल्हा बँकांना ...लातूर ः राज्यातील अनेक जिल्हा मध्यवर्ती सहकारी...
राज्यात पावसाची रिपरिप सुरुच पुणे ः कोकण व मध्य महाराष्ट्रात रिमझिम असून...
निकृष्ट बियाणेप्रकरणी ४० न्यायालयीन खटलेवाशीम ः यंदाच्या हंगामात निकृष्ट बियाण्यामुळे...
चांदोली धरणग्रस्त विस्थापीतांनी केली २५...मांगले, जि. सांगली ः  चांदोली धरणग्रस्तामधील...
लोकसहभागातून शेती अन् ग्रामविकासाला...उंबरीवाडी (ता.जावली,जि.सातारा) हे लहानसे गाव....
जलसंधारण मोहिमेतून पाणी टंचाईवर मातआजही माण, खटाव हे  दुष्काळी तालुका म्हणून...
पावसाचा जोर कायम राहणार पुणे: गुजरातच्या दक्षिण भागात चक्राकार...
कृषी अधीक्षक, उपसंचालकांच्या बदल्यापुणे : कोविड १९ रोगाच्या पार्श्वभूमीवर कार्यरत...
मका विक्रीचे चुकारे ४० दिवसांनंतरही थकितजळगाव ः जिल्ह्यातील सुमारे साडेतीन हजार मका...
कोकणात मुसळधारेचा अंदाजपुणे ः  उत्तर प्रदेशचा नैऋत्य भाग ते...
राज्यात सर्वदूर हलका पाऊसपुणे ः राज्यातील बहुतांशी भागात हलका ते मध्यम...
सोयाबीनचे एकरी ५१.७७ क्विंटल उच्चांकी...जॉर्जिया येथील व्होलदोस्ता प्रांतामधील रॅंडी...
शेतकऱ्यांचे वनौषधी अनुदान पुन्हा रखडलेपुणे: राज्यात वनौषधी उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांचे...
दुर्गम शेतकऱ्यांसाठी जलकुंडे ठरली वरदानठाणे जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यातील दुर्गम...
बाजार समिती कर्मचाऱ्यांना शासन सेवेत...यावल, जि. जळगाव: केंद्राने ‘एक देश एक बाजार समिती...
‘एचटीबीटी’मुळे कपाशीतील आंतरपिके...पुणे : काळ्याबाजारातून आलेल्या तणनाशक सहनशील (...