agriculture news in Marathi, agri commissioner says, farmer turn in to traders, Maharashtra | Agrowon

शेतकऱ्यांना व्यापारी करण्यावर भर: कृषी आयुक्त
टीम अॅग्रोवन
सोमवार, 27 मे 2019

बारामती, जि. पुणे ः आपल्याकडे पिकणाऱ्या प्रत्येक पिकाला जागतिक बाजारभाव अधिक कसा मिळेल याचा विचार कृषी विभाग करीत असून १२ ते १५ पिकांसाठी तब्बल २२०० कोटींचा प्रकल्प सध्या राज्यात राबविला जात आहे, शेतकऱ्यांना व्यापारी बनविण्यावर आमचा भर असल्याचे कृषी आयुक्त सुहास दिवसे यांनी शारदानगर येथे सांगितले.

बारामती, जि. पुणे ः आपल्याकडे पिकणाऱ्या प्रत्येक पिकाला जागतिक बाजारभाव अधिक कसा मिळेल याचा विचार कृषी विभाग करीत असून १२ ते १५ पिकांसाठी तब्बल २२०० कोटींचा प्रकल्प सध्या राज्यात राबविला जात आहे, शेतकऱ्यांना व्यापारी बनविण्यावर आमचा भर असल्याचे कृषी आयुक्त सुहास दिवसे यांनी शारदानगर येथे सांगितले.

अॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या कृषी विज्ञान केंद्राने आयोजित केलेल्या चैत्रपालवी परीषदेचे रविवारी (ता.२६) शारदानगर येथील अप्पासाहेब पवार सभागृहात उदघाटन झाले. यावेळी कृषी आयुक्त दिवसे बोलत होते. या वेळी माजी कृषी सचिव डॉ. सुधीरकुमार गोयल, सहसंचालक दिलीप झेंडे, मराठवाडा शेती साह्य मंडळाचे विश्वस्त विजय बोराडे, अॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे प्रमुख राजेंद्र पवार, विश्वस्त विष्णुपंत हिंगणे, डॉ. शंकरराव मगर, राजीव देशपांडे, डॉ. सुधीर भोंगळे, केव्हीकेचे प्रमुख डॉ. सय्यद शाकीरअली आदी उपस्थित होते.

दिवसे म्हणाले, की आपला देश मध्यमवर्गाकडे निघाला आहे. याचा अर्थ देशात देखील बाजारपेठ आहे, मागणी आहे म्हणूनच शेतकऱ्याला उत्तम व्यापारी बनवायचे असेल तर उत्पादनापासून ते निर्यातीपर्यंतची व विक्रीपर्यंतची साखळी मजबूत करावी लागेल. शेतकऱ्यांनी फक्त निर्यातीचा दुराग्रह सोडला तर देशातही खूप चांगली बाजारपेठ आहे, ग्राहक पैसे मोजायला तयार आहेत. मात्र त्यासाठीच्या सुविधा आपल्याकडे आहे काय? याचा विचार करावा लागेल. बापजाद्यांच्या पारंपरिक शेतीला सोडून आपल्याला नव्या काळाचा विचार करून शेती करावी लागेल. व्यवस्थापनही त्याच अंगाने करावे लागेल. कम्युनिकेशन कोलॅब्रेशन आणि कॉन्स्ट्रेशन या त्रिसूत्रीवर भर  द्यावा लागेल. 

डॉ. सुधीरकुमार गोयल म्हणाले, की शेतीत समृद्धी आणण्याचा संकल्प आता शेतकऱ्यांना करावा लागेल, त्यासाठी चैत्रपालवीसारख्या कार्यशाळा उपयोगी पडतील. ज्या शेतकऱ्यांनी शेती चांगली केली, त्यांनी उत्पन्न कसे चांगल्या प्रकारे मिळवले याचा अभ्यास करावा.
राजेंद्र पवार म्हणाले, की चैत्रपालवी एक नव्या वाटांचा धांड़ोळा आहे म्हणून तिच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी फक्त स्वतःपुरते मर्यादित न राहता आपल्याला माहिती असलेले कृषी तंत्र व ज्ञान आपल्या भागातील शेतकऱ्यांना देऊन प्रशिक्षित करावे. नोकरी करणारा, उच्चशिक्षित शेतीबाहेर राहुन चालणार नाही, शेतीचे नवे तंत्रज्ञान आत्मसात करणारी उच्चशिक्षितांचीही पिढी लागेल.

इतर बातम्या
बीड, उस्मानाबादमध्ये चारा छावण्यांत ३९...उस्मानाबाद, बीड : पावसाची अवकृपा कायम...
खानदेशात शेतीकामात मजूरटंचाईजळगाव : खानदेशात जुलैमधील अखेरचे १० दिवस व...
पोल्ट्रीधारकांना सवलतीच्या दरात धान्यविटा, जि. सांगली : पोल्ट्रीधारकांना...
वनस्पतीतील कडवटपणांमागील रहस्यांचा...कडूनिंबासह अन्य अनेक वनस्पतीमधील कडवट, तीव्र...
नाशिक जिल्ह्यात पावसामुळे पूर्वहंगामी...नाशिक : संततधार सुरू असलेल्या पावसामुळे...
नांदेड जिल्ह्यात पीककर्जाचे ७३ हजारांवर...नांदेड : चालू आर्थिक वर्षाच्या (२०१९-२०) पहिल्या...
कर्जमाफीबाबत धोरण सुस्पष्ट नाही : एकनाथ...जळगाव  : शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली....
पुणे विभागात खरिपाची नऊ लाख ८० हजार...पुणे  ः पावसाअभावी खरीप पेरण्या उशिराने...
कुठे गेला कृत्रिम पाऊस ; सरकारने...बदनापूर / भोकरदन, जि. जालना ः अर्धे राज्य...
रासप ५७ जागांची मागणी करणार : महादेव...हिंगोली  : आगामी विधानसभा निवडणुकीत...
मुंबई बाजार समितीच्या निवडणुकीची ‘...पुणे  ः चटई निर्देशाकांसह कोट्यवधी...
अकोला जिल्ह्यात ‘आत्मा’चा कारभार...अकोला  ः राज्याच्या कृषी विभागात कधीकाळी...
कऱ्हाडमधील ९९ शाळांना बसला महापुराचा...कऱ्हाड, जि. सातारा  : महापुरामुळे...
गडचिरोली जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे १७९७...गडचिरोली  ः या वर्षी अतिवृष्टीमुळे...
शेततळ्याच्या प्लॅस्टिकला तूर्त अनुदान...पुणे  : शेततळ्याच्या अस्तरीकरणाकरिता...
वारणा-कृष्णा नदीकाठच्या शेतजमिनी कोसळू...सांगली ः सांगली जिल्ह्यातील कृष्णा आणि वारणा...
जालना जिल्ह्यात वीस हजार शेतकऱ्यांच्या...जालना : जिल्ह्यातील १२० गावांत हवामान अनुकूल...
दर्जाहीन शिक्षण संस्थांवर कारवाई होणार...पुणे: राज्यात दर्जाहीन कृषी महाविद्यालये...
अवर्षणप्रवण, आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांत...अकोला ः राज्यातील अवर्षणप्रवण क्षेत्र,...
महिनाअखेरीस पावसाला पोषक हवामानपुणे : ऑगस्ट महिन्याच्या सुरवातीला राज्यात दमदार...