agriculture news in Marathi, agri commissioner says, gave 100 percent pre permission to farmers subsidy demand, Maharashtra | Agrowon

अनुदान अर्जांना १०० टक्के पूर्वसंमती द्याः कृषी आयुक्तांचे आदेश
टीम अॅग्रोवन
रविवार, 15 सप्टेंबर 2019

पुणे : कृषी विभागाच्या विविध योजनांमधील अनुदानाचा लाभ शेतकऱ्यांना मिळवून देण्यात काही अधिकारी कामचुकारपणा करीत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अर्जांना १०० टक्के पूर्वसंमती देण्याचे आदेश कृषी आयुक्तांनी जारी केले आहेत.  

केंद्र व राज्याच्या विविध योजनांसाठी २०१९-२० च्या चालू आर्थिक वर्षासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध झालेला आहे. योजना आहेत, निधी आहेत, हजारो कर्मचाऱ्यांची यंत्रणा आहे. मात्र, शेतकऱ्यांपर्यंत निधी पोचत नसल्याचे चित्र काही भागांमध्ये असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

पुणे : कृषी विभागाच्या विविध योजनांमधील अनुदानाचा लाभ शेतकऱ्यांना मिळवून देण्यात काही अधिकारी कामचुकारपणा करीत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अर्जांना १०० टक्के पूर्वसंमती देण्याचे आदेश कृषी आयुक्तांनी जारी केले आहेत.  

केंद्र व राज्याच्या विविध योजनांसाठी २०१९-२० च्या चालू आर्थिक वर्षासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध झालेला आहे. योजना आहेत, निधी आहेत, हजारो कर्मचाऱ्यांची यंत्रणा आहे. मात्र, शेतकऱ्यांपर्यंत निधी पोचत नसल्याचे चित्र काही भागांमध्ये असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

कृषी आयुक्त सुहास दिवसे यांनी कृषी विभागातील सर्व योजनांचा अलीकडेच आढावा घेतला असता अधिकाऱ्यांचा गाफिलपणा निदर्शनास आला. विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांकडून अर्ज आलेले असताना क्षेत्रिय स्तरावर पूर्वसंमतीच दिली जात नसल्याचे आढळले आहे.

“पूर्वसंमतीचे काम संथ गतीने सुरू ठेवल्यामुळे आचारसंहिता लागू झाल्यानंतर शेतकऱ्यांना अकारण लाभापासून अजून काही महिने वंचित रहावे लागू शकते. त्यामुळे सर्व योजनांचा आढावा घेण्याचे आदेश आयुक्तालयाने दिले आहेत,’’ असे सूत्रांनी स्पष्ट केले. विभागीय कृषी सहसंचालक व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अधिकाऱ्यांना याच आठवड्यात कृषी आयुक्तालयाकडे अहवाल पाठविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे राज्यभर कर्मचाऱ्यांची धावपळ सुरू आहे.  “सर्व योजनांचा भौतिक व आर्थिक लक्षांक तपासून १०० टक्के पूर्व संमती द्यावी व तसे अहवाल आयुक्तालयाला पाठवावेत,” अशा सूचना देण्यात आल्या आहेत. 

शेतकरीहितासाठी सुटी रद्द 
शेतकऱ्यांचे अर्ज दाखल होऊनदेखील क्षेत्रीय पातळीवर अर्ज पडून राहणे व पूर्वसंमतीसाठी थेट आयुक्तालयाला पाठपुरावा करावा लागणे, ही लाजिरवाणी बाब असल्याचे काही अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हितासाठी कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांची गेल्या आठ सप्टेंबरला रविवारची सुटीदेखील रद्द करण्यात आली. सात ते नऊ सप्टेंबरच्या दरम्यान शेतकऱ्यांच्या सर्व अर्जांना पूर्वसंमती देणे, असे एकमेव काम कर्मचाऱ्यांना देण्यात आले होते.

आचारसंहितेमुळे आढावा घेण्याचे आदेश
पूर्वसंमतीचे काम संथ गतीने सुरू ठेवल्यामुळे आचारसंहिता लागू झाल्यानंतर शेतकऱ्यांना अकारण लाभापासून अजून काही महिने वंचित रहावे लागू शकते. त्यामुळे सर्व योजनांचा आढावा घेण्याचे आदेश आयुक्तालयाने दिले आहेत. त्यामुळे कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांची धावपळ सुरू झाली आहे.

आयुक्तालयाकडून दखल

  • विविध योजनांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध  
  • काही भागांत शेतकऱ्यांपर्यंत निधी पोचत नसल्याचे चित्र  
  • क्षेत्रीय स्तरावर पूर्वसंमतीचे काम संथ गतीने  
  • सर्व योजनांचा आढावा घेण्याचे आयुक्तालयाचे आदेश  
  • विभागीय कृषी सहसंचालक व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अधिकाऱ्यांना आठवडाभरात अहवाल पाठविण्याचे आदेश  
  • सात ते नऊ सप्टेंबरदरम्यान शेतकऱ्यांच्या सर्व अर्जांना पूर्वसंमती देण्याचे काम कर्मचाऱ्यांना देण्यात आले

इतर अॅग्रो विशेष
पशुधनवाढीचे विश्लेषण कधी? आपल्या देशात पशुधन किती याची आकडेवारी वारंवार...
आरे कारशेड प्रकल्प ः पर्यावरण आणि...सुमारे आठ वर्षांपूर्वी मेट्रो-३ प्रकल्प हाती...
तळेगाव ढमढेरे, शेतकऱ्यांसाठी मुगाची...पुणे जिल्ह्यात शिरूर कृषी उत्पन्न बाजार...
जिद्द, चिकाटीतून यशस्वी केला...हिंगोली जिल्ह्यातील जडगाव (ता. औंढानागनाथ) येथील...
वादळी पावसाचा अंदाज कायमपुणे  : अरबी समुद्रात तयार झालेले कमी दाबाचे...
पावसाचा पुन्हा दणकापुणे  : मॉन्सूनोत्तर पावसाचा दणका सुरूच आहे...
सर्वसामान्यांची पद्धतशीर दिशाभूलजनतेच्या मूळ समस्या, अडीअडचणी, दुःख यांवरून लक्ष...
बहर तुडवत आला पाऊसराज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर...
शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावलापुणे  : राज्यात मॉन्सूनोत्तर पावसाने मुसळधार...
यंत्राद्वारे तयार करा हातसडीच्या...पुणे जिल्ह्यातील पाबळ (ता. शिरूर) येथील प्रसिद्ध...
वादळी पावसाचा इशारा कायमपुणे : अरबी समुद्रात तयार झालेले कमी दाबाचे...
‘महाराष्ट्रा’साठी आज मतदान ! तयारी पूर्णमुंबई : चौदाव्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी...
केंद्राने कांद्यावरील निर्यातबंदी...नाशिक : कांदा बाजारभावात होत असलेली घसरण...
आज, उद्या पावसाचा अंदाज कायमपुणे : अरबी समुद्रात कमी दाबाच्या क्षेत्राचे...
थंडीचे आगमन लांबणारपुणे   : राज्यात मॉन्सूनोत्तर पाऊस पडत...
राज्यात सुगीची वेळ, अन्‌ पावसाचा खेळपुणे  : अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र...
मराठवाड्यातील ३३५ मंडळांत पाऊस; खरीप...औरंगाबाद, परभणी : परतीच्या पावसाने मराठवाड्यातील...
फळबागांनी बहरलेला कॅलिफोर्नियाकोकणात जशा समुद्राच्या खाड्या आहेत तशाच पद्धतीने...
कांदळवन पर्यटन, संवर्धनातून ‘स्वामिनी’...वेंगुर्ला (जि. सिंधुदुर्ग) येथील स्वामिनी महिला...
दुष्काळग्रस्तांना सावरणारे धोरण हवेगेल्या दशकात सातत्याने दुष्काळाचे संकट ओढवताना...