कृषी सचिव एकनाथ डवले रमले शिवारात 

राज्याचे कृषी सचिव तथा नांदेड जिल्ह्याचे पालक सचिव एकनाथ डवले यांनी शुक्रवारी (ता. ११) कंधार तालुक्यास भेट देऊन कृषी विभागाच्या विविध उपक्रमांची पाहणी केली.
agri secretary
agri secretary

नांदेड : राज्याचे कृषी सचिव तथा नांदेड जिल्ह्याचे पालक सचिव एकनाथ डवले यांनी शुक्रवारी (ता. ११) कंधार तालुक्यास भेट देऊन कृषी विभागाच्या विविध उपक्रमांची पाहणी केली. या वेळी खरीप हंगामाच्या अनुषंगाने विविध योजनांचा प्रारंभ करण्यात आला. 

उस्माननगर येथे राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानांतर्गत गळीतधान्य विकास कार्यक्रम या बाबीखाली लाभार्थी शेतकऱ्यांना सोयाबीन (एमएयूएस १६२) वाणाचे प्रात्यक्षिकाचे बियाणे वितरित करण्यात आले. सोयाबीन पेरणीपूर्वी उगवणशक्ती चाचणी व बीजप्रक्रिया करण्याचे प्रात्यक्षिक कृषी सहायक सोपान उबाळे, सतीश गोगदरे, परमेश्‍वर मोरे, गोविंद तोटावाड यांनी करून दाखवले. या संपूर्ण प्रक्रियेमध्ये कृषी सचिव एकनाथ डवले यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. घरचे बियाणे वापरण्याबाबत मार्गदर्शन केले. एक गाव एक वाण या उपक्रमांतर्गत तालुक्यात सहा गावांची निवड करण्यात आली. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग लागवडीची पाहणी करून त्यांनी लाभार्थी शेतकऱ्यांना याबाबत माहिती दिली. रुंद वरंबा सरी पद्धतीने लागवड करण्याबाबत माहिती उपस्थित शेतकऱ्यांना देण्यात आली.  या वेळी आमदार श्यामसुंदर शिंदे, आशाताई शिंदे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे, उपविभागीय कृषी अधिकारी रविकुमार सुखदेव, माधव सोनटक्के, तहसीलदार व्यंकटेश मुंढे, मंडळ कृषी अधिकारी रमाकांत भुरे, कृषी सहायक राठोड, काकडे, कदम, कृषी सेविका पल्लवी कचरे, उज्ज्वला देशमुख उपस्थित होते.  विविध ठिकाणी भेटी  उस्माननगर परिसरात भाजीपाला बीजोत्पादन शेडनेटला एकनाथ डवले यांनी भेट दिली. भाजीपाला बीजोत्पादक शेतकरी विष्णुदास इंगोले, संतोष गवारे, दत्तात्रय घोरबांड, संजय ताटे यांच्याशी चर्चा केली. दाताळा येथे नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेअंतर्गत शेतकरी उत्पादक कंपनीचे अवजारे बँकेची पाहणी केली. हळदा येथे नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेअंतर्गत राबविलेल्या विविध योजनांची माहिती घेतली.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com