agriculture news in Marathi agri commissioner visit to farm Maharashtra | Page 2 ||| Agrowon

कृषी सचिव एकनाथ डवले रमले शिवारात 

टीम अॅग्रोवन
रविवार, 13 जून 2021

राज्याचे कृषी सचिव तथा नांदेड जिल्ह्याचे पालक सचिव एकनाथ डवले यांनी शुक्रवारी (ता. ११) कंधार तालुक्यास भेट देऊन कृषी विभागाच्या विविध उपक्रमांची पाहणी केली.

नांदेड : राज्याचे कृषी सचिव तथा नांदेड जिल्ह्याचे पालक सचिव एकनाथ डवले यांनी शुक्रवारी (ता. ११) कंधार तालुक्यास भेट देऊन कृषी विभागाच्या विविध उपक्रमांची पाहणी केली. या वेळी खरीप हंगामाच्या अनुषंगाने विविध योजनांचा प्रारंभ करण्यात आला. 

उस्माननगर येथे राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानांतर्गत गळीतधान्य विकास कार्यक्रम या बाबीखाली लाभार्थी शेतकऱ्यांना सोयाबीन (एमएयूएस १६२) वाणाचे प्रात्यक्षिकाचे बियाणे वितरित करण्यात आले. सोयाबीन पेरणीपूर्वी उगवणशक्ती चाचणी व बीजप्रक्रिया करण्याचे प्रात्यक्षिक कृषी सहायक सोपान उबाळे, सतीश गोगदरे, परमेश्‍वर मोरे, गोविंद तोटावाड यांनी करून दाखवले. या संपूर्ण प्रक्रियेमध्ये कृषी सचिव एकनाथ डवले यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला.

घरचे बियाणे वापरण्याबाबत मार्गदर्शन केले. एक गाव एक वाण या उपक्रमांतर्गत तालुक्यात सहा गावांची निवड करण्यात आली. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग लागवडीची पाहणी करून त्यांनी लाभार्थी शेतकऱ्यांना याबाबत माहिती दिली. रुंद वरंबा सरी पद्धतीने लागवड करण्याबाबत माहिती उपस्थित शेतकऱ्यांना देण्यात आली. 

या वेळी आमदार श्यामसुंदर शिंदे, आशाताई शिंदे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे, उपविभागीय कृषी अधिकारी रविकुमार सुखदेव, माधव सोनटक्के, तहसीलदार व्यंकटेश मुंढे, मंडळ कृषी अधिकारी रमाकांत भुरे, कृषी सहायक राठोड, काकडे, कदम, कृषी सेविका पल्लवी कचरे, उज्ज्वला देशमुख उपस्थित होते. 

विविध ठिकाणी भेटी 
उस्माननगर परिसरात भाजीपाला बीजोत्पादन शेडनेटला एकनाथ डवले यांनी भेट दिली. भाजीपाला बीजोत्पादक शेतकरी विष्णुदास इंगोले, संतोष गवारे, दत्तात्रय घोरबांड, संजय ताटे यांच्याशी चर्चा केली. दाताळा येथे नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेअंतर्गत शेतकरी उत्पादक कंपनीचे अवजारे बँकेची पाहणी केली. हळदा येथे नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेअंतर्गत राबविलेल्या विविध योजनांची माहिती घेतली. 
 


इतर अॅग्रो विशेष
राज्यात आज हलक्या सरींची शक्यता पुणे : राज्याच्या अनेक भागांत पावसाने उघडीप दिली...
पशुचिकित्सा व्यवसायींचा राज्यभर बेमुदत...नगर : पशुचिकित्सा व्यवसायी (डिप्लोमा, पदविकाधारक...
ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये सर्वसाधारण पावसाची...पुणे : हवामान विभागाने ऑगस्ट व सप्टेंबर महिन्याचा...
पीकविमाधारकांना मिळणार २५ टक्के तात्काळ...पुणेः राज्यात प्रतिकूल परिस्थितीमुळे खरीप...
खोटे बोलण्यासाठी नाही, प्रामाणिक...भिलवडी, जि. सांगली : ‘‘मी तत्काळ मदतीबाबत विचार...
'रेडग्लोब’ द्राक्षवाणात मिळवली ओळखपुणे जिल्ह्यातील खोडद येथील सुहास थोरात यांनी...
उत्पन्नाच्या विविध स्त्रोतांमधून मिळवली...बोरगाव खुर्द (ता.. जि.. अकोला) येथील महेश वानखडे...
शेतकऱ्यांनी वापरले ६५० कोटींचे घरचे...पुणेः राज्यात यंदा सोयाबीनच्या पेऱ्यात मोठी वाढ...
कोकणात हलक्या पावसाची शक्यता पुणे : बंगालच्या उपसागरातील कमी दाब क्षेत्र...
अडीच लाख शेतकऱ्यांच्या जमिनी सावकाराकडे...अमरावती : राष्ट्रीय व खासगी बँकांनी हात आखडता...
धरणक्षेत्रात पावसाची हजेरी पुणे : पावसासाठी पोषक वातावरण नसल्याने पावसाचा...
सर्वदूर हलक्या पावसाची शक्यता पुणे : बंगालच्या उपसागरातील कमी दाब क्षेत्राच्या...
पीक विम्यात कुचराई केल्यास नोटिसा काढा...नाशिक: पीकविमा योजनांची संबंधित कंपन्यांच्या...
मत्स्यबीज केंद्रामुळे महिला झाल्या...भिगवण (जि. पुणे) येथील पाच उपक्रमशील महिलांनी...
गणपतराव देशमुख यांच्या पार्थिवावर...सोलापूर ः शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि...
चीनची खत निर्यातीवर बंदी बीजिंग ः चीनमध्ये खतांचे घटलेले उत्पादन, विजेच्या...
राज्याची पीकपेरा नोंद आता शेतकरीच करणार पुणेः सातबारा उतारावरील पीकपेऱ्याची नोंद आता...
निसर्गदूतांच्या सहयोगाने ‘झाडांची भिशी...सोलापुरातील उपक्रमशील डॅाक्टर, इंजिनिअर्स,...
खानदेशात मका पिकात अमेरिकन लष्करी अळीचा...जळगाव : खानदेशात मका पिकाची लागवड यंदा बऱ्यापैकी...
पंधरा दिवस पावसाचा जोर कमी राहणार पुणे : गेल्या पंधरा दिवस कोकण आणि घाटमाथ्यावर...