agriculture news in marathi, agri culture event in pune from 1st October, Maharashtra | Agrowon

पुण्यात एक ऑक्टोबरला ‘कृषी कल्चर’ ज्ञान सोहळा
टीम अॅग्रोवन
बुधवार, 19 सप्टेंबर 2018

पुणे ः शेतीमधील बदलत्या तंत्रावर प्रकाश टाकणारा तसेच स्मार्ट व शाश्वत शेतीबाबत जागर घडवून आणणारा ‘कृषी कल्चर’ हा एकदिवसीय ज्ञान सोहळा ‘एपी ग्लोबाल समूहा'तर्फे येत्या एक ऑक्टोबरला पुण्यात आयोजित करण्यात आला आहे. 

पुणे ः शेतीमधील बदलत्या तंत्रावर प्रकाश टाकणारा तसेच स्मार्ट व शाश्वत शेतीबाबत जागर घडवून आणणारा ‘कृषी कल्चर’ हा एकदिवसीय ज्ञान सोहळा ‘एपी ग्लोबाल समूहा'तर्फे येत्या एक ऑक्टोबरला पुण्यात आयोजित करण्यात आला आहे. 

शेतीतून विकास साधण्यासाठी पारंपरिक पद्धतीने विचार न करता स्मार्ट दृष्टीकोन ठेवण्याची गरज आहे. जग सतत बदलत असून त्याप्रमाणे शेतीतही अनेक नवे बदल घडत आहेत. हा बदल जाणून घेत आदर्श शेतीसाठी लागणारे कौशल्य, समूह विकास, समूह शेती, गटशेतीचं तंत्र तसेच अद्ययावत कृषी तंत्रज्ञानाची सांगड घालणे अत्यावश्यक ठरले आहे. ही सांगड घालण्याचा प्रयत्न ‘कृषी कल्चर’ ज्ञान सोहळ्यातून होणार आहे. या सोहळ्यात शेतकऱ्यांना मोफत प्रवेश आहे.

या सोहळ्याचे उद्‌घाटन राज्याचे कौशल्य विकासमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या हस्ते होईल. महाराष्ट्र व्हिलेज सोशल ट्रान्स्फॉर्मेशन फाउंडेशनच्या कार्यकारी संचालक श्वेता शालिनी, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. व्यंकट मायंदे, राज्याचे माजी अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. सुधीरकुमार गोयल, सह्याद्री फार्मर्स प्रोड्यूसर कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विलास शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर ‘कृषी कल्चर’मध्ये मार्गदर्शन करणार आहेत. 
तज्ज्ञांच्या मार्गदर्शनासोबतच कृषी क्षेत्रातील नवउद्योजक व महिला शेतकऱ्यांच्या यशोगाथा ऐकण्याची संधी ‘कृषी कल्चर’मध्ये मिळणार आहे. राष्ट्रीय नवप्रवर्तन प्रतिष्ठानशी संबंधित संशोधकांचे नावीन्यपूर्ण संशोधनही या वेळी पाहता येणार आहे. 

एमएसीसीआयए, चतूर आयडीयास, एक्सक्यूबेटर, नॅशनल इनोव्हेशन फाऊंडेशन, बोलेरो मॅक्सीट्रक प्लस, बोलेरो पीक अप, गोदरेज ॲग्रोवेट, इंडोफील इंडस्ट्रीज लिमिटेड आणि कृषिकिंग हे या ज्ञान सोहळ्याचे प्रायोजक आहेत. ‘कृषी कल्चर'साठी शेतकऱ्यांना मोफत प्रवेश असून त्यात प्रशिक्षण साहित्य व जेवणाचाही समावेश आहे. नावनोंदणी सुरू असून इच्छुकांनी ०८६६९६८९०१७ व ९७७३७७७३७२ या क्रमांकावर संपर्क साधावा याशिवाय info@krishiculture.in. तसेच www.krishiculture.in या संकेतस्थळांवर देखील कृषी कल्चरची माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे.

‘कृषी कल्चर’मध्ये या या विषयांवर होणार जागर

  • स्मार्ट व्हिलेजसाठीची कौशल्ये  
  • शाश्वत शेतीसाठीचे उत्तम उपाय 
  • समूह शेती पद्धतीने ग्रामीण विकास 
  • पारंपरिकतेकडून आधुनिक शेतीकडे वाटचाल. 
  • समूह शेतीमुळे शेतकरी जीवनात घडलेला बदल  
  • गटशेतीतून खेड्यांचा विकास
  • ग्रामीण विकासात मार्केटिंगचे महत्त्व
  • शेतीतील समान समस्यांवर सामूहिक उपाय

इतर अॅग्रो विशेष
अनुदान नव्हे; योगदानच वाचवेल शेतीलावातावरण बदल आणि कोसळणाऱ्या पाऊस धारा अथवा कडक...
साखर निर्यातीची सुवर्णसंधीपावसाळी स्थितीमुळे निर्यात न होऊ शकलेल्या साखर...
कापूस लोकायची लाज राखते; पण आमचं काय? यवतमाळ : ‘‘आमच्या कापसापासून तयार कपड्यानं आमी...
कंपोस्ट खते बनविण्याच्या पद्धतीजमिनीचा कस टिकविण्यासाठी सेंद्रिय पदार्थांचा...
एकदम बाजार समित्या बरखास्त करू नका:...पुणे ः केंद्रीय अर्थमंत्र्यांनी बाजार समित्या...
पावसाने मोसंबीच्या उत्पादनातही संकटाची...औरंगाबाद : लिंबूवर्गीय फळपिकात 'राजा' पीक म्हणून...
आंतरराष्ट्रीय द्राक्ष चर्चासत्र आजपासूनपुणे: राष्ट्रीय द्राक्ष संशोधन (एनआरसीजी)...
राज्यात पीकहानी ७० लाख हेक्टरच्याही...पुणे : केंद्र शासनाला पाठविल्या जाणाऱ्या अहवालात...
राज्यात गारठा वाढला; नगर १२.१ अंशावरपुणे : किमान तापमानात घट होत असल्याने राज्यात...
साखर कारखान्यांसाठी कर्ज परतफेडीचा...नवी दिल्ली ः केंद्र सरकारने साखर कारखान्यांसाठी...
दोडका पिकाने उंचावले अर्थकारणधामणखेल (ता. जुन्नर, जि. पुणे) येथील चंद्रकांत...
पेरू विक्रीसाठी प्रसिद्ध पेरणे फाटापुणे जिल्ह्यातील हवेली आणि शिरूर तालुक्यांच्या...
जळगावचे उडीद मार्केट यंदा पोचले...उडीद उत्पादनात खानदेश अग्रेसर आहे. जळगावच्या...
पर्यायाविना निर्णय घातकच! ऑ नलाइन राष्ट्रीय कृषी बाजार (ई-नाम) अधिक...
नैसर्गिक आपत्तीपासूनचा धडा काही वेदनांमधून सुखद आनंदप्राप्ती होते, तर काही...
किमान तापमानात किंचित वाढपुणे  : राज्यात थंडीची चाहूल लागल्यानंतर...
बाजार समित्यांना सक्षम पर्याय द्याः...पुणे ः केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी...
पावसाने संत्र्यात ४० टक्के फळगळ; ४००...नागपूर : राज्याचे मुख्य फळपिकांत महत्त्वाचे स्थान...
हमीभावाने कापूस खरेदी २० नोव्हेंबरपासून...जळगाव : भारतीय कापूस महामंडळ (सीसीआय) व...
बारा लाख टन साखर निर्यातीचा मार्ग मोकळापुणे : केंद्र शासनाने मुदतवाढ दिल्यामुळे देशातील...