agriculture news in Marathi agri department call for advice to commissioner for action on seed seller Maharashtra | Agrowon

सोयाबीन बियाणे विक्रेत्यांविरुध्द कारवाईबाबत मार्गदर्शन करा

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 30 ऑक्टोबर 2020

यंदाच्या खरिपात सोयाबीन बियाणे उगवले नसल्याच्या तक्रारींची दखल घेत कृषी खात्याने संबंधित बियाणे कंपन्यांविरुद्ध न्यायालयीन कारवाई प्रस्तावित करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. 

अकोला ः यंदाच्या खरिपात सोयाबीन बियाणे उगवले नसल्याच्या तक्रारींची दखल घेत कृषी खात्याने संबंधित बियाणे कंपन्यांविरुद्ध न्यायालयीन कारवाई प्रस्तावित करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. यामध्ये बियाणे विक्रेत्यांचाही समावेश करण्यात आल्याने  याला विक्रेत्यांच्या संघटनेने आक्षेप घेत निषेध नोंदविला. शिवाय बियाणे विक्री परवाने शासनाला परत देण्याचा इशाराही दिला होता. याप्रकरणी तोडगा काढण्यासाठी आता कृषी विभागाने आयुक्तालयाचे मार्गदर्शन मागवले असून, तूर्त हे आंदोलन थांबवण्याची विनंती विक्रेत्यांना केली. संघटनेनेही याला सहमती दिल्याने रब्बीच्या तोंडावर निर्माण होणारा संभाव्य पेच सध्या टळला आहे.

संघटनेचे पदाधिकारी गेले काही दिवस जिल्हाधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, लोकप्रतिनिधींकडे आपली भूमिका मांडत होते. शिवाय या कारवाईचा निषेध म्हणून गुरुवारी (ता. २९) बियाणे विक्री परवाने परत करण्याचा इशाराही दिला होता. रब्बी हंगामाच्या तोंडावर हे आंदोलन चिघळू नये यासाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी आयुक्तालयातून मार्गदर्शन मागविण्याचा मध्यममार्ग काढला. आता हे मार्गदर्शन येईपर्यंत तूर्त कुठलीही कारवाई होणार नाही. या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व तालुकास्तरीय गुणवत्ता नियंत्रण निरीक्षकांना न्यायालयीन केस दाखल न करण्याबाबत सूचित करण्यात येणार असल्याचे श्री. नलवडे यांनी संघटनेला लेखी कळविले आहे.

प्रतिक्रिया
आयुक्तालयाचा नवीन आदेश येईपर्यंत कृषी खात्याने न्यायालयीन कारवाई थांबविण्याचे आश्‍वासन दिले आहे. त्यामुळे आम्ही दिलेला इशारा सध्या मागे घेतला आहे.
- मोहन सोनोने, कार्याध्यक्ष, अकोला जिल्हा कृषी व्यावसायिक संघ


इतर ताज्या घडामोडी
...तर महावितरणचे कार्यालय जाळणार :  आ....अमरावती :  वरुड, मोर्शी तालुक्यांत...
मक्यावर अमेरिकन लष्करी अळीनगर  : नगर तालुक्यातील पिंपळगाव वाघा परिसरात...
पुण्यात भात काढणी अंतिम टप्प्यातपुणे  : दिवाळी सणामुळे भात पट्यात अनेक...
टेंभूचे आवर्तन सुरू करण्याची मागणीकडेगाव, जि. सांगली  : रब्बी हंगामासाठी टेंभू...
सांगलीत एफआरपीची प्रतीक्षासांगली : जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी ऊस...
शेतकऱ्यांच्या अनुदानाबाबत ठाकरे सरकार...नांदेड : निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरे यांनी...
बच्चू कडूंनी फुंकले रणशिंग; शेतकऱ्यांसह...अमरावती : तीन कृषी कायद्यांविरोधात देशातील...
डिसेंबरमधील पालवीवरच आंबा हंगाम अवलंबूनरत्नागिरी  : नोव्हेंबर महिन्यात थंडीऐवजी...
सुट्ट्यांमुळे कापूस खरेदीत खोडायवतमाळ : बहूप्रतिक्षेनंतर २७ नोव्हेंबरला...
कीड व्यवस्थापनासाठी करा जैविक पद्धतीचा...एकात्मिक कीड व्यवस्थापनामध्ये जैविक कीड...
कळमना बाजारात मोसंबी दरात सुधारणानागपूर : मागणीअभावी संत्रा दरात घसरण झाली आहे....
कोल्हापुरात टोमॅटोला दहा किलोस १५० रुपयेकोल्हापूर : येथील बाजार समितीत या सप्ताहात...
परभणीत दीड लाख क्विंटल कापसाची खरेदीपरभणी :  भारतीय कापूस महामंडळाच्या वतीने (...
जळगाव जामोदमध्ये कापूस खरेदी सुरूबुलडाणा : कापूस पणन महासंघाच्या वतीने हमी भाव...
सटाणा तालुक्यात चार कोटींची नुकसानभरपाई...नाशिक  : सटाणा तालुक्यात ऑक्टोबर आणि...
भंडाऱ्यात ३४ कोटींची धान खरेदीभंडारा  : जिल्ह्यात आधारभूत दराने धान...
निम्न दुधानाचे बुधवारपासून आवर्तनपरभणी  : जिल्ह्यातील ब्रम्हवाकडी (ता. सेलू)...
भातपिकासह ट्रॅक्टर जळून खाकअस्वली स्टेशन, जि. नाशिक : इगतपुरी...
नगर जिल्ह्यात कांदा बियाण्याची टंचाईनगर (प्रतिनिधी) : नगर जिल्ह्यात यंदा खरीप व रब्बी...
ढगाळ वातावरणामुळे उसावर तांबेरासोमेश्वरनगर, जि. पुणे ः अतिवृष्टीपाठोपाठ आलेल्या...