कृषी विभागाच्या आॅनलाइन अर्जात सर्व्हर डाउनचा खोडा

ऑनलाइन अर्ज भरण्याबबत अडचणी आहेत, की नाही याची खात्री करावी लागेल. या अर्जांना मुदतवाढ मिळण्याची मागणी अजून आलेली नाही. खात्री करून योग्य तो निर्णय घेऊ. - सुहास दिवसे, कृषी आयुक्त
कृषी विभाग
कृषी विभाग

जळगाव ः सातबारा उताऱ्यांना जसा सर्व्हर डाउनचा फटका बसत आहे, अगदी तशीच स्थिती कृषी विभागातील ऑनलाइन अर्ज सादर करण्याच्या प्रक्रियेबाबत मागील सात-आठ दिवसांपासून आहे. शेडनेट, पॉलिहाउस आदीसंबंधीचे ऑनलाइन अर्ज सादर करण्याची मुदत फक्त ५ एप्रिलपर्यंत आहे. ही मुदत वाढविली जावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी प्रशासन, लोकप्रतिनिधी यांच्याकडे घालत आहेत.  पॉलिहाउस, शेडनेट, फळबाग लागवड, पॅकपाऊस आदी योजनांसाठी अर्ज सादर करण्यासंबंधीची कार्यवाही, वेळापत्रक कृषी विभागाने जाहीर केले.  पण संकेसस्थळ सुरू होत नाही. ऑफलाइन अर्ज स्वीकारले जात नाहीत. ऑनलाइन अर्ज असले, तर पुढे संबंधित योजनेत शेतकऱ्याचा सहभाग करून घेण्यासंबंधीची कार्यवाही पात्रता, निकष यानुसार होईल, असे कृषी विभाग म्हणतो. ऑनलाइन अर्ज सादर करण्यासाठी शेतकरी शहरात येतात. ग्रामीण भागात सायबर कॅफे किंवा ऑनलाइन अर्ज सादर करण्यासंबंधी काम करणारी तंत्रस्नेही मंडळी फारशी नाही, शिवाय कनेक्‍टिव्हिटीच्या अडचणीदेखील आहेत. शेतकरी या ऑनलाइन अर्जांसाठी धावपळ करीत आहेत. रब्बी हंगाम काढणी, मळणीची कामे सोडून सकाळीच शहरात येतात. परंतु हे अर्जच ऑनलाइन सादर होत नसल्याने त्यांचा वेळ, पैसा वाया जात असून, हकनाक मनःस्तापही त्यांना सहन करावा लागतो.  मार्चएंडमुळे ३०, ३१ तारखेला संगणकांवर ऑनलाइन कामकाजाचा धडाका सर्वत्र सुरू होता. शासकीय कार्यालये, बॅंका अगदी रात्री उशिरापर्यंत सुरू होत्या. यामुळे सर्व्हरसंबंधीच्या अडचणी आल्या असतील, असा अंदाज कृषी विभागातील मंडळी व्यक्त करीत आहेत. मुदत वाढविण्याची मागणी ५ एप्रिलपर्यंत अर्ज भरण्यास मुदत आहे. मात्र, ऑनलाइन अर्ज प्रक्रियेला सर्व्हर डाउनमुळे अडथळा येत आहे. अर्ज सबमिट होत नाहीत. ग्रामीण भागात सायबर कॅफे किंवा ऑनलाइन अर्ज भरणे तसेच कनेक्‍टिव्हिटीच्या अडचणीदेखील आहेत. शेतकरी अर्ज भरण्यासाठी धावपळ करत आहेत. परंतु सर्व्हर डाउनमुळे अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे कृषी विभागाच्या योजनांचे आॅनलाइन अर्ज भरण्याची मुदत वाढवावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत. प्रतिक्रिया मी मागील तीन दिवस पॉलिहाउससंबंधी ऑनलाइन अर्ज सादर करण्यासाठी जळगाव शहरात चकरा मारत आहे. परंतु, सर्व्हर डाउनची समस्या भेडसावत असल्याने माझा वेळ वाया गेला. - एक शेतकरी पॉलिहाउस, फळबाग लागवड योजना व इतर योजनांसंबंधीचे ऑनलाइन अर्ज सादर करण्याची मुदत ५ एप्रिलपर्यंत आहे. सर्व्हर डाउनची समस्या ३१ मार्च रोजी होती; परंतु याच दिवशी सर्वत्र संगणकांवर ऑनलाइन कामकाज सुरू होते. यामुळे ही समस्या आली असेल.  - संभाजी ठाकूर,  जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, जळगाव

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com