agriculture news in Marathi agri department pulled crop insurance responsibility on farmers Maharashtra | Agrowon

तुम्हीच अभ्यास करा, अन् विम्याचे ठरवा : कृषी विभाग

टीम अॅग्रोवन
रविवार, 20 जून 2021

पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विम्यासाठी गतवर्षी कंपन्यांनी केलेले करार रद्द करण्याची नामुष्की कृषी विभागावर ओढावल्याचा प्रकार नुकताच घडला. 

सोलापूर ः पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विम्यासाठी गतवर्षी कंपन्यांनी केलेले करार रद्द करण्याची नामुष्की कृषी विभागावर ओढावल्याचा प्रकार नुकताच घडला. त्यानंतर नव्याने पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विम्यासाठी नवा आदेश कृषी विभागाने काढला. पण त्याचबरोबर एक पत्रक काढत शेतकऱ्यांनीच हवामानाच्या धोक्याचा अभ्यास करावा आणि विमा भरायचा की नाही तो ठरवावा, असे म्हटले आहे. 

गेल्या काही वर्षांपासून पीकविमा हा विषय चर्चेचा झाला आहे. विविध शेतकरी संघटना आणि संस्थांसह व्यक्तिगत पातळीवरही विमा योजनेच्या आदेशातील त्रुटींवर सातत्याने बोट ठेवले जात असल्याने कृषी विभाग विम्याच्या बाबतीत सावधतेने पावले उचलत आहे. या सावधेतूनच हे पत्रक कृषी विभागाला काढावे लागल्याचे समजते. पूर्वी विम्याची सक्ती होती. पण आता ही सक्ती नसून, ही योजना ऐच्छिक ठेवली आहे. विशेषतः कर्जदारांना सुद्धा शेतकऱ्यांच्या लेखी संमतीशिवाय बँका विमा हप्ता कपात करू शकत नाहीत. याबाबतही दक्षता घ्या, अशी सूचनाही या पत्रात करण्यात आली आहे. 

या सर्व पार्श्‍वभूमीवर गोंधळ-गडबड होऊ नये, यासाठी सर्वस्वी जबाबदारी शेतकऱ्यांवर टाकताना कृषी विभागाने या विमा योजनेतील अंतर्भूत धोके, भरावी लागणारी विमा हप्त्याची रक्कम आणि या योजनेच्या अटी, शर्ती याबाबतचा अभ्यास करूनच या योजनेत सहभाग घ्यावा, असाही स्पष्ट उल्लेख या पत्रात करण्यात आला आहे. 


इतर अॅग्रो विशेष
मराठवाड्यात एक लाख हेक्टरवर पीकनुकसानऔरंगाबाद : मराठवाड्यातील आठपैकी सहा जिल्ह्यांत...
पावसाची उसंत, सावरण्याची धडपड सुरु पुणे : पावसासाठी पोषक वातावरण नसल्याने पावसाचा...
विमा कंपन्यांचा राज्यभर सावळागोंधळ पुणे ः पंतप्रधान पीकविमा योजनेतील खासगी विमा...
कोकणात मुसळधारेची शक्यता पुणे : कोकणसह संपूर्ण राज्यात पावसाचा जोर कमी...
सोयाबीनने गाठला दहा हजारांचा ऐतिहासिक...अकोला/लातूर ः गेले काही महिने सोयाबीनला चांगला दर...
विदर्भात कृषी अधिकाऱ्यांनीच घेतले विमा...नागपूर ः जिल्हास्तरावर आमचे कार्यालय आहे, हे...
मराठवाड्यात पीकविम्याबाबत शेतकऱ्यांसमोर...औरंगाबाद : पीकविमा उतरविण्याची सोय त्यासाठी जागर...
खानदेशात पीकविमा कंपनीचे कार्यालयच नाही जळगाव : खानदेशात पंतप्रधान पीकविमा योजनेंतर्गत...
केव्हीकेने दाखवली ‘वीडर’ची पॉवर, छोट्या...मजूरटंचाई व वाढलेले मजूरदर लक्षात घेऊन ममुराबाद (...
दिशा कार्यक्षम पूर व्यवस्थापनाची!महाराष्ट्र देशी सध्या अतिवृष्टी आणि ...
लातूरला सोयाबीन ९१४१ रुपये !लातूर ः येथील लातूर उच्चत्तम कृषी उत्पन्न  ...
कोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा...पुणे : बंगालच्या उपसागराच्या उत्तर भागात चक्रिय...
पीक विम्यात चुकीचे प्रकार खपवून घेणार ...नाशिक: पीकविमा कंपन्यांकडून पाच पाच जिल्ह्यांसाठी...
केंद्राच्या काळ्या कायद्यांची आम्हाला...नवी दिल्ली ः कायद्याच्या प्रक्रियेतून न आलेल्या...
धरण क्षेत्रात पावसाची हजेरी पुणे : तीन दिवसांपासून राज्यातील धरणक्षेत्रात...
राज्यात दीड महिन्यांत धरणांत ३७३ टीएमसी...पुणे : राज्यातील बहुतांश भागात जुलैमध्ये पावसाने...
हजारो नुकसानग्रस्त दाव्यापासून वंचित नांदेड : अतिवृष्टी तसेच संततधार पावसामुळे...
कोल्हापुरात पुराचे पाणी ओसरू लागले कोल्हापूर : जिल्ह्यात पावसाने पूर्णपणे उघडीप दिली...
राज्याची फळबाग लागवड योजना बंद नगर ः फळबागेचे क्षेत्र वाढीसाठी राज्यात सध्या...
विना नांगरणी तंत्राने कपाशी, तुरीची शेतीदेवगाव (ता. पैठण, जि. औरंगाबाद) येथील प्रयोगशील,...