agriculture news in marathi, Agri Department remonstrance crop insurance companies | Agrowon

पीकविम्यातील हलगर्जीपणा; कृषी विभागाकडून बॅंकांची कानउघाडणी
टीम अॅग्रोवन
सोमवार, 24 जून 2019

पुणे : प्रधानमंत्री पीकविमा योजनेची कामे करताना बॅंकांकडून होत असलेल्या हलगर्जीपणाबद्दल कृषी विभागाने राज्यातील बॅंकांची चांगलीच कानउघाडणी केली आहे.

राज्यस्तरीय बॅंकर्स समितीच्या एका सदस्याने दिलेल्या माहितीनुसार, “पीकविम्याच्या कामाबाबत काही बॅंका अतिशय बेफिकिरीने काम करतात. मात्र रिझर्व्ह बॅंकेच्या आदेशाशिवाय कोणालाही जुमानायचेच नाही, असे धोरण काही बॅंकांचे आहे. आम्ही सूचना देऊनही उपयोग होत नव्हता; पण आता कृषी विभागानेच कानउघाडणी केल्याने बॅंकांना दखल घ्यावीच लागेल.”

पुणे : प्रधानमंत्री पीकविमा योजनेची कामे करताना बॅंकांकडून होत असलेल्या हलगर्जीपणाबद्दल कृषी विभागाने राज्यातील बॅंकांची चांगलीच कानउघाडणी केली आहे.

राज्यस्तरीय बॅंकर्स समितीच्या एका सदस्याने दिलेल्या माहितीनुसार, “पीकविम्याच्या कामाबाबत काही बॅंका अतिशय बेफिकिरीने काम करतात. मात्र रिझर्व्ह बॅंकेच्या आदेशाशिवाय कोणालाही जुमानायचेच नाही, असे धोरण काही बॅंकांचे आहे. आम्ही सूचना देऊनही उपयोग होत नव्हता; पण आता कृषी विभागानेच कानउघाडणी केल्याने बॅंकांना दखल घ्यावीच लागेल.”

राज्यात निवडक पिकांसाठीच विमा योजना राबविली जाते. अधिसूचित पिकांसाठी कर्ज देतानाच शेतकऱ्याचा विमा हप्ता बॅंकांकडून सक्तीने कापला जातो. केवळ बिगर कर्जदाराला इच्छेनुसार विमा हप्ता स्वतः भरावा लागतो. मात्र, बॅंकांकडून या दोन्ही प्रक्रियांमध्ये हलगर्जीपणा दाखविला जात असल्याचे कृषी विभागाचे म्हणणे आहे. काही जिल्ह्यांमध्ये विमा हप्ता कपात न करता नुकसानभरपाईपासून शेतकऱ्याला वंचित ठेवल्याच्या तक्रारी होत आहेत. ‘भरपाई देण्याची सर्व जबाबदारी बॅंकांचीच आहे,’ असे कृषी विभागाचे म्हणणे आहे. 

हलगर्जीपणा निदर्शनास आल्यास संबंधित शेतकऱ्याला नुकसानभरपाई मिळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने जबाबदारी निश्चित करावी. अशा प्रकरणाची चौकशी करण्याबाबत बॅंकेला आदेश द्यावेत, अशा सूचनादेखील देण्यात आलेल्या आहेत.

विमा हप्ता भरून घेताना विशेषतः बिगर कर्जदार शेतकऱ्यांबाबत बॅंका पडताळणीत कामचुकारपणा करतात, असे कृषी विभागाला वाटते. ‘हप्ता हा बॅंकेच्या स्तरावर भरला जातो. मात्र, शेतकऱ्याने नोंदणी अर्जात नमूद केलेली माहिती व कागदपत्रांची पडताळणी करूनच विमा पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक असते. तथापि, बॅंका काटेकोर पडताळणी करीत नाहीत,’ अशी तक्रार कृषी विभागाने बॅंकांकडे केली आहे.

या गोंधळाचा परिणाम म्हणजे बॅंकांच्या अशा चुकांमुळे कंपन्यांकडून भरपाईची रक्कम निश्चित केली जात नाही. त्यामुळे भरपाईपासून शेतकरी वंचित राहतो, असा निष्कर्ष कृषी विभागाने काढला आहे.

बॅंकांकडून अशा चुका केल्या जातात

  •  नोंदणी अर्जातील माहिती व कागदपत्रांवरील नोंदी यातील तफावत शोधली जात नाही
  •  कागदपत्रांची पडताळणी करता विमा पोर्टलवर माहितीचे अपलोडिंग
  •  शेतकऱ्याचा खाते क्रमांक, मोबाईल नंबर, आधार क्रमांकाचा तपशील चुकीचा नोंदविला जातो

इतर अॅग्रो विशेष
महाबळेश्वरात स्ट्रॉबेरी लागवडीस वेगसातारा  ः जिल्ह्यातील महाबळेश्वर, जावळी, वाई...
संत्र्याच्या आंबिया बहराला गळती; भाव...अकोला : संत्र्याच्या आंबिया बहाराला गळती...
तुरळक ठिकाणी पावसाची शक्यतापुणे ः परतीचा मॉन्सून देशातून परतल्यानंतर...
दुधाचे थकीत अनुदान देण्याच्या हालचालीपुणे: राज्यातील डेअरी उद्योगांचे अडकलेले...
अमरावती विभागात सोयाबीन उत्पादकता घटलीअमरावती  ः गेल्या काही वर्षांत कापसाला...
‘महाॲग्री ते महाॲग्रीटेक’ एक स्वप्नरंजन राज्यात शेतकऱ्यांची सर्व कामे ऑनलाईन होतील असे एक...
शेण पावडरपासून कलात्मक वस्तूंची...सुमारे ३८ देशी गायींचे संगोपन करीत नागपूर येथील...
शेततळ्यातील पाण्यावर फुलले शेडनेटमधील...पावसाचे कायम दुर्भिक्ष, त्यामुळे शेती अर्थकारणाला...
राज्यात गाजर ११०० ते ८००० रुपये...जळगावात ११०० ते १८०० रुपये दर जळगाव कृषी...
ऋतुचक्र बदलया वर्षीचा मॉन्सून अनेक बाबींनी वैशिष्ट्यपूर्ण...
प्रतिष्ठेचं वलय होतंय द्राक्ष...द्राक्ष शेतीने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय...
उडीद, मूग, सोयाबीन ऑनलाइन नोंदणीला...औरंगाबाद: हमीदराने उडीद, मूग, सोयाबीन...
सांगली जिल्ह्यात डाळिंबावर रसशोषक...सांगली : मृग हंगाम धरलेल्या बहाराच्या डाळिंबाच्या...
कडधान्य आयातीला मुदतवाढीचा प्रस्तावनवी दिल्लीः देशात यंदा खरिप काडधान्य पिकांची...
राज्यात हलक्या पावसाचा अंदाजपुणे: वाढलेल्या उन्हामुळे राज्यात चटका वाढला आहे...
परतीचा मॉन्सून आठ दिवसात माघारीपुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून)...
आदर्श वनसंवर्धनातून ग्रामविकास साधलेले...वनसंपत्तीचे संवर्धन, वनविकासासह शेतीतही दिशादर्शक...
येतो मी... मॉन्सूनने घेतला देशाचा निरोप...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) बुधवारी...
शेतकऱ्यांच्याच कपाळावर पुन्हा ‘मिऱ्या’दिनांक ३ जुलै २०१९ रोजी केरळचे खासदार डीन...
आश्वासनांचा पाऊसराज्यात विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता अंतिम...