agriculture news in Marathi, agri department says, no direction of insurance of poly house and shed-net, Maharashtra | Agrowon

कृषी विभाग म्हणते, पॉलिहाउस, शेडनेट नुकसान भरपाईच्या सूचनाच नाहीत
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 20 जून 2019

माझ्या ४४ गुंठ्यांतील पॉलिहाउसला ४८ लाखांवर खर्च लागला होता. त्यासंबंधीचे ६० टक्के अनुदान अजूनही एनएचबीमधून मिळालेले नाही. अशातच ११ जून रोजीच्या वादळात पॉलिहाउस भुईसपाट झाले. त्यात ढोबळी मिरचीची लागवड केली होती. कृषी विभागाने पंचनामे केले; पण मला किती नुकसानभरपाई शासनाकडून मिळेल हे कृषी यंत्रणांनी स्पष्ट केलेले नाही. मी व इतर नुकसानग्रस्त पॉलिहाउसधारकांनी नुकसानभरपाई मिळण्यासंबंधी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आहे. त्याची दखल शासनाने घ्यावी. 
- नितीन कोतेकर, नुकसानग्रस्त पॉलिहाउसधारक, शिरूड, (जि. धुळे)

जळगाव ः खानदेशात १ ते ११ जून यादरम्यान झालेल्या वादळी पावसात धुळे जिल्ह्यातील धुळे, साक्री, जळगावमधील चोपडा, यावल, जळगाव, भुसावळ, मुक्ताईनगर आदी भागांतील अनेक शेतकऱ्यांच्या पॉलिहाउस, शेडनेटचे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. परंतु या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून भरपाईसंबंधी कृषी विभागाकडे स्पष्ट सूचनाच नसल्याची माहिती समोर आली आहे. 

शेडनेट किंवा पॉलिहाउसमध्ये जी पिके असतात, त्यांच्या नुकसानीची भरपाई नुकसानग्रस्तांना देण्याचे प्रस्ताव कृषी विभाग तयार करीत आहे. परंतु पॉलिहाउसच्या नुकसानीसंबंधी कुठलीही भरपाई देण्यासंबंधीच्या स्पष्ट सूचना कृषी विभागाला नसल्याने पंचनामे करताना पॉलिहाउस, शेडनेटचे नुकसान वगळले जात आहे. पॉलिहाउसमध्ये लागवड केलेली ढोबळी मिरची, फूलपीक किंवा इतर पिकांना तुटपुंजी भरपाई मिळणार आहे. कारण अनेक शेतकऱ्यांचे पॉलिहाउस हे १० ते २० गुंठ्यांचे आहेत आणि १० ते २० गुंठ्यांतील भाजीपाला किंवा फुलांच्या पिकासाठी तोकडी रक्कम १० गुंठ्यांसंबंधी चार ते पाच हजार रुपयेच शासनाकडून भरपाईपोटी नुकसानग्रस्तांना मिळतील, अशी स्थिती आहे. 

शासनाकडून संरक्षित शेती म्हणून पॉलिहाउस, शेडनेटची योजना राबविली जात आहे. परंतु शेडनेट किंवा पॉलिहाउसचे नुकसान झाल्यास त्यासंबंधीची भरपाई का मिळत नाही असा मुद्दा धुळे, जळगाव जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. 

या वर्षी धुळे जिल्ह्यातील धुळे, साक्री, शिरपूर भागांतील सुमारे २० शेतकऱ्यांचे पॉलिहाउस, शेडनेटचे वादळात कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. तर जळगाव जिल्ह्यात चोपडा, यावल, रावेर, जळगाव, जामनेर, मुक्ताईनगर, पाचोरा, भडगाव भागांत मिळून सुमारे २० शेतकऱ्यांच्या शेडनेट, पॉलिहाउसचे वादळात नुकसान झाले. एक गुंठ्यातील पॉलिहाउस उभारण्यासंबंधी शेतकऱ्याला एकूण १० ते ११ लाख रुपये खर्च लागतो. 

कृषी विभाग ः भरपाईबाबत सांगू शकत नाही
पॉलिहाउस व शेडनेटच्या नुकसान भरपाईसंबंधी धुळे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयातील संबंधितांशी संपर्क साधला असता सूत्रांनी सांगितले, की आम्ही नुकसानग्रस्त पॉलिहाउसचे तिखी, शिरूड भागांत पंचनामे केले आहेत. परंतु भरपाई किती मिळेल, शेतकऱ्यांना किती पैसे मिळतील, हे आम्ही सांगू शकत नाही. कारण पॉलिहाउसच्या वादळात नुकसानीसंबंधीच्या भरपाईबाबत शासनाच्या किंवा वरिष्ठ कार्यालयाच्या स्पष्ट सूचनाच नाहीत.

इतर ताज्या घडामोडी
राज्यात गवार प्रतिक्विंटल १२०० ते ६०००...जळगावात प्रतिक्विंटल ५६०० रुपये जळगाव ः कृषी...
पीकविम्याला मुदतवाढ देण्याची ‘...अकोला ः या हंगामात पीकविमा भरण्यासाठी २४ जुलै ही...
परडा येथे मक्यावर लष्करी अळीचा...अकोला ः या हंगामात लागवड झालेल्या मक्यावर मोताळा...
अमरावती जिल्ह्यात पीककर्जाचा टक्का...अमरावती  : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी...
अकोल्यात सोयाबीन सरासरी ३६१० रुपये...अकोला ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी (...
सातारा जिल्हा परिषदेचा १०० कोटींचा...सातारा : जिल्हा परिषदेच्या इतिहासात प्रथमच मूळ...
पुण्यात पीकविम्यासाठी शिवसेना रस्त्यावरपुणे ः ‘कोण म्हणतो देणार नाय विमा घेतल्याशिवाय...
पुणे विभागातील कोरडवाहू पट्ट्यात टंचाई...पुणे : विभागातील पुणे, सातारा, कोल्हापूर...
नांदेड जिल्ह्यात शेतकऱ्यांनी उतरविला १...नांदेड : पंतप्रधान पीकविमा योजनेंतर्गंत खरिपासाठी...
मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांत १५ चारा...औरंगाबाद : मराठवाड्यातील घटलेली चारा छावण्यांची...
अचूक पीक पेरणी अहवाल देणे शक्य नाही ः...बुलडाणा  ः जिल्ह्यातील पीक पेरणीचा...
आडसाली ऊस लागवडीला कोल्हापूर जिल्ह्यात...कोल्हापूर  : जिल्ह्यात गेल्या पंधरवड्यात...
परभणी कृषी विद्यापीठ उत्पादित अडीच हजार...परभणी : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या...
‘शेतकरी सन्मान’साठी ९१.३३ टक्के ...अकोला  ः पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी (पीएम...
एचटी कापूस बियाण्यांबाबतचा अहवाल १५...मुंबई  : प्रतिबंधित एचटी (हर्बीसाइड टॉलरंट)...
शिवसेना शेतकऱ्यांची दिशाभूल करतेय ः...मुंबई  ः पीकविम्यासंदर्भात विमा कंपन्यांवर...
पीकविम्याचे पैसे पंधरा दिवसांत न...मुंबई  : कर्जमाफी दिलेल्या शेतकऱ्यांची...
फळपीक विमा योजनेला मुदतवाढ देण्याची...पुणे  : राज्यातील दुष्काळी स्थिती आणि...
सोलापूर जिल्ह्यात `सन्मान`ची पाच लाख...सोलापूर : जिल्ह्यात ‘आठ अ’नुसार असलेल्या ११...
सोलापुरात यंदाही खरीप कोरडाचसोलापूर : खरीप हंगाम सुरू होऊन दीड महिना उलटला....