सोलापुरात ११ मार्चपासून कृषी महोत्सव

सोलापुरात ११ मार्चपासून कृषी महोत्सव

सोलापूर : राज्य शासनाच्या कृषी विभागाच्या वतीने ११ ते १५ मार्च दरम्यान सोलापुरात जिल्हास्तरीय कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाला जिल्ह्यातील शेती आणि शेतकऱ्यांच्यादृष्टीने महत्त्व आले आहे. जिल्हा कृषी महोत्सवातून सोलापूरचे मार्केटिंग व आध्यात्मिक पर्यटनाला चालना मिळेल, अशा पद्धतीने नियोजन करा, अशी सूचना सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी या संदर्भातील नियोजन बैठकीत दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयातील बहुद्देशीय सभागृहात शनिवारी (ता. २४) सहकार व पणनमंत्री देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली कृषी महोत्सवाच्या तयारीची आढावा बैठक झाली. त्या वेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज बिराजदार, आत्माचे प्रकल्प संचालक विजयकुमार बरबडे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, अग्रणी बॅंक व्यवस्थापक सुरेश श्रीराम, प्रकल्प संचालक रवींद्र माने, जिल्हा माहिती अधिकारी रवींद्र राऊत उपस्थित होते.

सोलापुरातील होम मैदानावर हा कृषी महोत्सव होणार आहे. महोत्सवात तीनशे स्टॉल उभारावेत, यात जिल्ह्यातील सर्व विभागांच्या कल्याणकारी योजनांची माहिती नागरिकांना मिळेल, या दृष्टीने नियोजन करावे, अशा सूचना देशमुख यांनी दिल्या. महोत्सवाच्या यशस्वी संयोजनासाठी सर्व विभाग त्याचबरोबर शेतकरी कंपनी, कॉर्पोरेट कंपन्यांना सहभागी करून घ्यावे.

सोलापुरातील कृषी महोत्सव राज्यात सर्वाधिक भव्य प्रमाणात होईल, यासाठी सर्व संबंधित यंत्रणा आणि विभागांनी सक्रिय सहभागी व्हावे, संयोजनासाठी कसलीही मदत आवश्‍यक असल्यास जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधावा. कृषी महोत्सवातील स्टॉलवर सोलापुरातील खाद्य संस्कृती, चादर, टॉवेल, बेडशीट यांचेही स्टॉल उभारण्याच्या सूचना श्री. देशमुख यांनी केल्या.

बैठकीस सहकार, कृषी, पणन, शिक्षण, जिल्हा परिषदेचे अधिकारी उपस्थित होते. कृषी महोत्सवातील स्टॉलची आखणी आणि मांडणी अतिशय नियोजनबद्ध केली जाणार आहे. महोत्सवातून शेतकऱ्यांना नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती, शेतीतील आधुनिक प्रवाह समजावेत, यासाठी तज्ज्ञ आणि संशोधकांची व्याख्याने आयोजित करण्याचे नियोजन आहे, असे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com