agriculture news in Marathi agri inputs shops shut on Sunday in state Maharashtra | Agrowon

कृषी निविष्ठा विक्रेत्यांचा बंद मागे; कृषिमंत्र्यांचे आश्वासन

टीम अॅग्रोवन
सोमवार, 13 जुलै 2020

 कृषी निविष्ठा विक्रेत्यांचा मागण्यांसंदर्भात पुकारलेला बंद अखेर मागे घेण्यात आला आहे. कृषी मंत्री दादा भुसे, कृषी आयुक्त सुहास दिवसे, कृषी संचालक घावटे यांच्याशी भ्रमणध्वनीवरून बंदच्या तिसऱ्या दिवशी अखेरच्या क्षणी माफदाच्या पदाधिकाऱ्यांचा  संवाद झाला.

औरंगाबाद :  कृषी निविष्ठा विक्रेत्यांचा मागण्यांसंदर्भात पुकारलेला बंद अखेर मागे घेण्यात आला आहे. कृषी मंत्री दादा भुसे, कृषी आयुक्त सुहास दिवसे, कृषी संचालक घावटे यांच्याशी भ्रमणध्वनीवरून बंदच्या तिसऱ्या दिवशी अखेरच्या क्षणी माफदाच्या पदाधिकाऱ्यांचा  संवाद झाला. त्यामध्ये कृषी मंत्र्यांसह अधिकाऱ्यांनी माफदाच्या मागण्यांसंदर्भात कोरणा संकट निवारल्यानंतर बैठक घेऊन ज्या जास्तीत जास्त ज्या मागण्या मान्य करणे शक्य आहे त्या मान्य  करू असे आश्वासन  दिल्याने शेतकरी हित लक्षात घेऊन  हा बंद मागे घेण्यात आल्याची माहिती माफदाचे अध्यक्ष जगन्नाथ काळे यांनी दिली

दरम्यान, मागण्यांबाबत प्रशासन स्तरावरून कार्यवाही होत नसल्याने कृषी निविष्ठा विक्रेत्यांचा तीन दिवसीय बंद पाळण्यात आला. रविवारी (ता. ११) तिसऱ्या दिवशीही बंद कायम होता. राज्यभरातून या बंदला प्रतिसाद मिळाल्याचा दावा महाराष्ट्र फर्टिलायझर्स पेस्टिसाइड सीड्स डीलर्स असोसिएशननकडून (माफदा) करण्यात आला. 

कृषी निविष्ठा विक्रेत्यांच्या विविध मागण्या कृषी विभागाकडे गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. परंतु त्यावर कोणतीही पावले उचलली जात नसल्याने बंद पुकारण्यात आल्याचे ‘माफदा’कडून सांगण्यात आले. 

सुरुवातीला तीन दिवसांच्या बंदमध्ये शासन, प्रशासन स्तरावरून हालचाल न झाल्यास पुढे बेमुदत बंद करण्याचा इशारा ‘माफदा’ने दिला होता. दुसरीकडे शासन किंवा प्रशासनाकडून मात्र मागण्याविषयी वा बंद मागे घेण्याविषयी कोणताही संवाद गत तीन दिवसात केला नसल्याचे ‘माफदा’चे अध्यक्ष जगन्नाथ काळे यांनी सांगितले. 

मागण्यांचे महत्त्व त्यासंदर्भात शासन, प्रशासनाची भूमिका व यापुढे मागण्यांच्या रेट्याविषयी घ्यावयाचा निर्णय या अनुषंगाने ‘माफदा’ने रविवारी(ता १२) सायंकाळी ऑनलाइन बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत विविध जिल्ह्याचे पदाधिकारी, विभागाचे पदाधिकारी, राज्यस्तरावरील पदाधिकारी सहभागी होणार होते. मात्र कृषिमंत्री, कृषी आयुक्त यांनी आश्वासन दिल्यानंतर तीन दिवसीय बंद नंतर पुकारण्या आलेल्या बेमुदत बंद मागे घेण्यात आला. 


इतर अॅग्रो विशेष
अभियान नको, योजना हवीकेंद्र सरकारने आत्मनिर्भर योजनेंतर्गत शेतमाल...
इर्व्हिनिया रॉट रोगाची केळी पिकात समस्या जळगाव ः जिल्ह्यात केळी पिकात...
`पोकरा`मधून शेतमजुरांना प्रशिक्षण द्याऔरंगाबाद: नानाजी देशमुख कृषी संजीवनी...
ऑगस्टमध्ये प्रथमच भरले सीना धरण नगर: दुष्काळी कर्जत, श्रीगोंदा आणि आष्टी...
कोल्हापूर : जनावरे बाजारातील...कोल्हापूर: `कोरोना’च्या पार्श्वभूमीवर लॉकडाउनमुळे...
साखर निर्यातवाढीसाठी केंद्राची ‘रॅपिड अ...कोल्हापूर: देशातून जास्तीत जास्त साखर निर्यात...
परभणीत सोळा हजार शेतकऱ्यांचे आधार...परभणी ः महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
सोयाबीन बियाणेप्रकरणात शेतकऱ्यांना एक...अमरावती : विभागातील पाच जिल्ह्यांत सोयाबीन बियाणे...
‘ई-नाम’, शीतसाखळी बळकट करण्याची गरज;...पुणे: चीनशी व्यापारी संबंध डळमळीत झाल्यानंतर...
‘सिट्रस नेट’वर केवळ दोनशे शेतकऱ्यांची...नागपूर : प्रशासकीय यंत्रणांच्या उदासीनतेमुळे ‘...
मका खरेदी केंद्रांवर शेतकरी ठाण मांडून औरंगाबाद: हमीभावाने खरेदीसाठी ३१ जुलैपर्यंत...
पावसाचा जोर वाढण्याची शक्यता  पुणे ः  बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे...
भाजीपाला शेतीतून अर्थकारणाला गतीडोंगरगाव (ता.जि.अकोला) शिवारातील योगेश नागापुरे...
राज्यात धरणांमध्ये ३८ टक्के साठापुणे : मॉन्सूनचा पाऊस सुरू झाल्यानंतर जून...
जुलैअखेर पावसाने सरासरी गाठलीपुणे : नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) हंगामाची...
सांगली जिल्ह्यात २६ हजार हेक्टरने ऊस...सांगली : जिल्ह्यातील दुष्काळी पट्ट्यासह अन्य...
मुगावर काय फवारायचे?अकोला ः कडधान्य वर्गीय पिकांपैकी एक प्रमुख...
कीडनाशकांवरील बंदी- शेतकऱ्यांसाठी तारक...केंद्रीय कृषी मंत्रालयाने २७ कीडनाशकांवर बंदी...
दूध दर आंदोलनाचा राज्यभर एल्गारपुणे: दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती व...
पीकविमा नोंदणीत महाराष्ट्राची आघाडीपुणे: डिजिटल तंत्राचा वापर करून पंतप्रधान पीकविमा...