agriculture news in Marathi agri produce auction in lasalgaon from today Maharashtra | Agrowon

लासलगाव बाजार समितीत आजपासून शेतमालाचे लिलाव

टीम अॅग्रोवन
सोमवार, 13 जुलै 2020

लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात काम करणाऱ्या काही जणांना कोरोनाची संसर्ग झाल्याने सोमवार (ता. ६) पासून रविवार (ता. १२) पर्यंत शेतमालाचे लिलाव बंद ठेवण्यात आले होते.

नाशिक : लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात काम करणाऱ्या काही जणांना कोरोनाची संसर्ग झाल्याने सोमवार (ता. ६) पासून रविवार (ता. १२) पर्यंत शेतमालाचे लिलाव बंद ठेवण्यात आले होते. त्यामुळे बाजार समितीचे कामकाज कधी सुरू होईल, अशी विचारणा होत होती. अखेर कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक व व्यापारी यांनी निर्णय घेऊन बाजार समितीचे कामकाज सुरू करण्याबाबत एकमत झाले. त्यानुसार मंगळवार (ता. १३) पासून कामकाज सुरू झाले आहे. 

खरिपाच्या हंगामात भांडवलाची उपलब्धता करण्यासाठी शेतमाल विक्रीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे. मात्र, कोरोना संसर्गग्रस्त रुग्ण आढळून आल्याने संसर्गाची साखळी रोखण्यासाठी गत सप्ताहात बाजार समितीचे कामकाज बंद होते. परिणामी शेतकऱ्यांची मोठी गैरसोय झाली होती. आर्थिक व्यवहार व कामकाज ठप्प झाले होते.

अखेर शेतमालाचे लिलाव पूर्ववत सुरू झाले आहे. त्यामध्ये कांदा, भुसार माल, भाजीपालासह डाळिंब लिलाव सुरू होणार आहेत. शेतकरी बांधवांनी शेतमाल योग्य प्रतवारी करून विक्रीस आणावा. तसेच शेतमाल विक्रीस आणताना मास्कचा वापर करावा व सामाजिक अंतराचे पालन करावे, असे आवाहन सभापती सुवर्णा जगताप, उपसभापती प्रीती बोरगुडे, सचिव नरेंद्र वाढवणे यांसह सदस्य मंडळाने केले आहे. 

डाळिंबाचे लिलाव सोमवार (ता. १३) बाजार समिती मुख्य आवार सेल हाँल येथे सकाळी १० वाजता सुरू होणार आहेत.भाजीपाला खरेदी विक्रीचे व्यवहार संबंधित आडतदाराच्या आडत दुकानावर वेळ दुपारी एक वाजेपासून सुरू होतील, असे कळविण्यात आले आहे.


इतर ताज्या घडामोडी
नांदेड, परभणी, हिंगोलीत जून, जुलैमध्ये...नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील ६९...
औरंगाबाद, जालन्यातील दोन मंडळांत...औरंगाबाद : औरंगाबाद व जालना जिल्ह्यातील दोन...
नांदेडमधील आठ केंद्रांत अडीच लाख...नांदेड : जिल्ह्यातील सात केंद्रांवरील शेतकऱ्यांची...
सोयाबीनमध्ये एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा...अंबड, जि. जालना  ः ‘‘सर्व शेतकऱ्यांनी...
नगर जिल्ह्यात १३२ टक्के पेरणीनगर ः नगर जिल्ह्यात यंदा चांगला पाऊस झाला....
खानदेशात ‘किसान सन्मान’चे अर्ज प्रलंबित...जळगाव  ः खानदेशात सुमारे सव्वालाख शेतकरी...
शेतकऱ्यांची कृषिमंत्र्यांना दोन हजार...जळगाव : केंद्र सरकारच्या हवामानावर आधारित फळ...
खानदेशात हलक्या जमिनीतील पिके संकटातजळगाव  ः खानदेशात मागील आठ ते १० दिवसांपासून...
जळगाव जिल्ह्यातील मका, ज्वारीची खरेदी...जळगाव : शासकीय मका, ज्वारी खरेदी पुन्हा सुरू...
माळेगाव कारखान्याचे अकरा लाख टन ऊस...माळेगाव, जि. पुणे ः माळेगाव सहकारी साखर...
अकोला कृषी विद्यापीठातील क्वारंटाइन...अकोला ः डाॅ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील...
नाशिक जिल्ह्यात चार हजारांवर शेतकरी मका...नाशिक : बाजारात व्यापाऱ्यांकडे खरेदी होणाऱ्या...
वीज बिल माफीसाठी सोमवारी राज्यभर धरणेकोल्हापूर : दरमहा ३०० युनिटसच्या आत वीज वापर...
कोल्हापूर जिल्ह्यात पुरेशा पावसाअभावी...कोल्हापूर : जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यांपासून...
पीकविमा भरण्यासाठी मुदतवाढीची मागणीअकोला ः पीकविमा पोर्टल व्यवस्थित न चालल्याने अनेक...
पशुवैद्यकीय दवाखान्यांमध्ये कृत्रिम...रत्नागिरी : उच्च प्रतीची वंशावळ तयार करण्यासाठी...
कपाशीवरील फुलकिडे, पांढऱ्या माशीचे...फुलकिडे : ही कीड फिकट पिवळसर रंगाची असून अत्यंत...
सेंद्रिय शेतीबाबत शरद पवार घेणार बैठकपुणे ः राज्यातील सेंद्रिय व रासायनिक अवशेषमुक्त...
यवतमाळ जिल्ह्यात चार लाख शेतकऱ्यांनी...यवतमाळ : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पीक विमा...
कपाशीवरील किडींचे कामगंध सापळ्याद्वारे...पिकातील किडीच्या नियंत्रणासाठी एकात्मिक कीड...