agriculture news in Marathi agri produce transport license on whattsapp in Kolhapur Maharashtra | Agrowon

कोल्हापुरात व्हाट्सॲपवरून शेतमाल वाहतुकीचा परवाना 

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 31 मार्च 2020

शेतमाल वाहतुकीत अडथळे येऊ नयेत यासाठी आम्ही ऑनलाईन अर्ज स्वीकारून तातडीने परवाना देण्याचा उपक्रम सुरू केला. त्याला शेतकरी व वाहनधारकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करत आहोत. तालुकास्तरावरील अधिकाऱ्यांनाही याबाबतचे अधिकार मी दिले आहेत. यामुळे जिल्ह्याचा ताण ही कमी होईल. माझ्या व्हाट्सॲप वरही अर्ज केल्यास तातडीने परवाना मिळेल. 
- ज्ञानदेव वाकुरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, कोल्हापूर 
व्हाट्सअॅप क्रमांकः ९८८१०५३४०० 

कोल्हापूर: कोरोनाच्या संचारबंदीमुळे निर्माण झालेली शेतकऱ्यांची अडचण दूर करण्यासाठी आता जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांचा व्हाट्सअप नंबर बिझी राहणार आहे. कोल्हापूरचे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी ज्ञानदेव वाकुरे यांच्या व्हाट्सअप वर शेतमाल वाहतूक किंवा अन्य कृषी विषयक कामाबाबत परवाना मिळवण्यासाठी अर्ज केल्यास तातडीने त्यांना परवाना देण्यात येत आहे. शेतकऱ्याला किंवा शेतमाल वाहतूक करणाऱ्या वाहनधारकाला थेट त्याच्या व्हाट्सॲप नंबर वरच परवाना पाठवून दिला जातो. गेल्या दोन दिवसात सुमारे ७० परवाने ऑनलाईन देण्यात आले आहेत. 

जिल्हा प्रशासनाने विभागवार समित्या करून संबंधित अधिकाऱ्यांना परवान्याचे अधिकार दिले आहेत. भाजीपाला फळे खते बियाणे, कृषिजन्य वस्तू, जीवनावश्यक वस्तू आदींची वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी श्री. वाकुरे यांना याबाबतचे परवाने देण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. सध्या जिल्ह्यामध्ये शेतमाल वाहतुकीची अडचण येत आहे. परवाना नसल्याने त्यांना अनेक ठिकाणी अडवणूक होत आहे. यावर मार्ग काढण्यासाठी श्री. वाकुरे यांनी ऑनलाइन परवाने तातडीने देण्याचा उपक्रम सुरू केला. याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. 

ज्या शेतकऱ्यांना अथवा वाहनधारकांना शेतमालाची वाहतूक करायचे आहे. त्याने एका कागदावर अर्ज लिहून त्याचा फोटो वाकुरे यांच्या व्हाट्सॲप क्रमांकावर पाठवून द्यावा दिला जातो. सायंकाळी सहा वाजेपर्यंत येणारे अर्ज एकत्र करून परवाने तयार केले जातात, व संबंधित शेतकरी व वाहनधारकांना ते व्हाट्सअप वर पाठवले जातात. ज्यांना कार्यालयात येऊन प्रत्यक्ष परवाने शक्य नाहीत, त्यांनी प्रिंट काढून सोबत बाळगल्यास या वाहतुकीला कोणतेही अडथळे येणार नाहीत, अशी व्यवस्था प्रशासनाने केली आहे. 


इतर ताज्या घडामोडी
सोलापूर जिल्ह्यात मराठा आरक्षणासाठी...सोलापूर  : मराठा समाजाला आरक्षण...
मुक्त विद्यापीठात कृषीविषयक अभ्यासक्रम...नाशिक : ‘‘यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त...
सोलापूर जिल्ह्यात दहा हजार हेक्‍टरवर...सोलापूर : जिल्ह्यात गेल्या तीन-चार दिवसांपासून...
सोलापूर जिल्हा बॅंक देणार अल्प मुदतीचे...सोलापूर : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी...
परभणी, हिंगोलीत ओल्या दुष्काळाचे सावटपरभणी : परभणी, हिंगोली जिल्ह्यातील अनेक मंडळांत...
जळगाव जिल्ह्यात उडीद, मूग खरेदीची...जळगाव : शासकीय उदीद, मूग खरेदीसंबंधीची प्राथमिक...
परभणीत भरपाईसाठी ‘स्वाभिमानी’ची पिकांसह...परभणी : अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे अतोनात नुकसान...
नाशिक जिल्ह्यात खरिपासह भाजीपाला पिके...नाशिक : जिल्ह्याच्या सर्वदूर भागात शनिवारी (...
`औरंगाबाद जिल्ह्यातील नुकासानग्रस्त...औरंगाबाद : सतत सुरू असलेल्या पावसाने कोणत्या...
ऊसतोडणी दर ठरविताना उत्पादकांवरील बोजा...पुणे : दहा लाख ऊसतोडणी कामगारांच्या वतीने विविध...
मराठा आरक्षणावरील अंतरिम स्थगिती उठवावीमुंबई : मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च...
‘मुळा’तून विसर्ग बारा हजार क्युसेकवर...नगर ः नगर जिल्ह्यातील मुळा धरणाच्या पाणलोटात पाऊस...
शेतकऱ्यांना कॉर्पोरेट कंपन्यांच्या...कोल्हापूर : पाशवी बहुमताच्या बळावर भलेही तुम्ही...
मोताळा तालुक्यात वादळी पावसाने नुकसानबुलडाणा ः जिल्ह्यात शनिवारी (ता. १९) वादळी...
नाशिकमध्ये वाटाण्याची आवक कमीच; दरात...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
नागपूर जिल्ह्यात पुराचा २९ हजार...नागपूर : पुरामुळे जिल्ह्यात २९ हजार २६२...
सोलापुरात पितृपंधरवड्यामुळे गवार,...सोलापूर ः पितृपंधरवड्यामुळे सोलापूर कृषि उत्पन्न...
डाळिंब फळपिकातील तेलकट डाग व्यवस्थापनसोलापूर, सांगली, नाशिक आणि नगर यासारख्या...
औरंगाबादमध्ये मूग, उडीद, ज्वारी,...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...
बार्शी बाजार समितीत उडीद, मूग हमीभाव...सोलापूर : बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...