Agriculture news in Marathi, Agri-pump bill for farmers from 'MahaVitaran' | Agrowon

‘महावितरण’कडून शेतकऱ्यांना अंदाजपंचे कृषिपंपाचे बिल

टीम अॅग्रोवन
सोमवार, 23 सप्टेंबर 2019

नाशिक : अंबड परिसरात महावितरणकडून कृषी पंपाचे मीटर रीडिंग न घेता ऐन पावसाळ्यात वापर नसताना अंदाजपंचे २५००० ते ५०००० रुपयांचे बिलांची मनाप्रमाणे आकारणी करून बिले पाठविण्यात आल्याच्या तक्रारी संतप्त शेतकऱ्यांनी केल्या आहे. 

नाशिक : अंबड परिसरात महावितरणकडून कृषी पंपाचे मीटर रीडिंग न घेता ऐन पावसाळ्यात वापर नसताना अंदाजपंचे २५००० ते ५०००० रुपयांचे बिलांची मनाप्रमाणे आकारणी करून बिले पाठविण्यात आल्याच्या तक्रारी संतप्त शेतकऱ्यांनी केल्या आहे. 

याप्रश्‍नी शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत महावितरणला निवेदन दिले आहे. महावितरणचे कामटवाडा विभागाचे कार्यकारी अभियंता संतोष जगताप हे उपस्थित नसल्यामुळे त्यांचे असिस्टंट मोहन महाले यांच्याकडे निवेदन दिले. शेतकऱ्यांना कृषिपंपाचे वीजबिल मीटर रीडिंग प्रमाणेच आकारणी करून पाठवावे, ज्या पंपांचे मीटर खराब झालेले असतील ते मीटर बदलून द्यावे, जोपर्यंत शेतकऱ्यांच्या कृषिपंपाचे वीजबिल मीटर रीडिंग प्रमाणे आकारणी करून देण्यात येईल, तेव्हाच वीज बिल भरण्यात येईल. अन्यथा बिल भरणार नाही व शेतकऱ्यांची पिळवणूक थांबवावी, अशी अंबड परिसरातील शेतकऱ्यांनी या निवेदना केली आहे. 

याप्रसंगी शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख मंदाताई दातीर, शरद दातीर, सीताराम दातीर, सुवर्णाताई मटाले, रंजनाताई सायखिंडीकर, अनिता पाटील, भरत दातीर, गोपाळा शिरसाठ, धनंजय दातीर, नामदेव शिरसाठ, रामचंद्र दातीर, वाळु दातीर, अनिल शिरसाठ, शिवाजी दातीर, गोरख दातीर, ओमकार दातीर, विष्णू दातीर, बाळासाहेब दातीर, नवनाथ दातीर, भाऊसाहेब दातीर, सोमनाथ दातीर, उत्तम दातीर, पोपट दातीर, काशीनाथ दातीर, बनाजी दातीर, उत्तम फडोळ व मोठ्या प्रमाणावर शेतकरी उपस्थित होते.


इतर ताज्या घडामोडी
पुणे बाजार समितीत व्यवहार सुरळीत...पुणे ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार...
बुलडाण्यात २८२ शेतकऱ्यांनी राबवला रेशीम...बुलडाणा : जिल्ह्यात सन २०१५-१६ पासून सहकार व...
पुणे विभागात खरीप पेरणीत अडीच लाख...पुणे ः यंदा जूनच्या सुरुवातीला पावसाने चांगली...
बिबट्याच्या पिंजऱ्यांशेजारीच बसून करणार...मंचर : वनखात्यानेही बिबट्याचे हल्ले रोखण्यासाठी...
खरीप पीक कर्जासाठी भाजपचा आज ठिय्याअमरावती : खरीप हंगाम अर्ध्यावर आला असतानासुद्धा...
औरंगाबादेत ग्राहकांचा रानभाज्या खरेदीला...औरंगाबाद ः आरोग्यदायी व अनेक औषधी गुणधर्म...
नगर जिल्ह्यात तुरीचा ५४ हजार हेक्टरवर...नगर ः नगर जिल्ह्यात यंदा चांगला पाऊस झाला...
रत्नागिरी जिल्ह्यातील ६५ पैकी ४८ धरणे...रत्नागिरी ः अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी...
सांगलीत अडीच हजार क्विंटल मक्याची खरेदीसांगली ः जिल्ह्यातील तीन हमीभाव केंद्रांच्या...
निकृष्ट बियाणे पुरवठादार कंपन्यांवर...अमरावती: निकृष्ट दर्जाच्या बियाणे पुरवठा प्रकरणात...
मराठवाडा विभागातील हवामानानुसार पीक...मराठवाडा विभागातील एकूण हवामान, पर्जन्यमान या...
औरंगाबादमध्ये आज रानभाज्या महोत्सवऔरंगाबाद  ः ‘‘वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...
सांगलीत ६८ हजार शेतकऱ्यांनी उतरवला...सांगली  ः जिल्ह्यातील ६८ हजार ०१८...
रिसोडमध्ये पावसाची उघडीपवाशीम  ः राज्यात बऱ्याच भागात पाऊस धुमाकूळ...
वाशीम जिल्ह्यात एक लाख ४२ हजार हेक्टर...वाशीम ः पंतप्रधान पीकविमा योजनेत जिल्ह्यातील...
खानदेशात ताग लागवडीला पसंतीजळगाव  ः कमी पाण्यात व उशिरा लागवड करूनही...
पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत घटकोल्हापूर : पश्चिम भागात पावसाचा जोर घटल्याने...
परभणी विभागात बिजोत्पादन होणार २७ हजार...परभणी : यंदा महाबीजच्या परभणी विभागातील परभणी,...
अकोल्यात पाऊस सुरुचनगर  ः अकोले तालुक्याच्या पश्चिम आदिवासी...
विदर्भातील पोल्ट्री व्यावसायिकांचे...अमरावती : विदर्भातील पोल्ट्री व्यावसायिकांना...