कृषी सचिवांकडून नाशिकमध्ये खरीप पिकांचा आढावा

कृषी सचिवांकडून नाशिकमध्ये खरीप पिकांचा आढावा
कृषी सचिवांकडून नाशिकमध्ये खरीप पिकांचा आढावा

नाशिक : चालू हंगामातील खरीप पिकांचा आढावा घेण्यासाठी राज्याचे कृषी आयुक्त एकनाथ डवले यांनी नाशिक जिल्ह्यात निफाड व येवला तालुक्यात शुक्रवार (ता. २६) थेट प्रक्षेत्रावर भेट देऊन आढावा घेतला. या वेळी प्रामुख्याने मका पिकावर असलेला लष्करी अळीचा प्रादुर्भाव व सोयाबीन पिकाच्या प्रात्यक्षिक क्षेत्राला भेटी देऊन पाहणी केली. निफाड तालुक्यातील मौजे दहेगाव येथे तर येवला तालुक्यातील सातारे, एरंडगाव सोयाबीन, मका पिक पाहणी केली. या आढावा भेटीदरम्यान श्री. डवले यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. कृषी विभागाने राबविलेल्या योजना, कृषी निविष्ठांची उपलब्धता व पुरवठा, यासह लष्करी अळीचा प्रादुर्भाव व उपाययोजना, शेतीशाळा याबद्दल माहिती जाणून घेतली. या वेळी शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या उपाययोजनांचा अवलंब करून मक्यावरील लष्करी अळी नियंत्रणात आणावी, असे आवाहन श्री. डवले यांनी केले. या वेळी शेतकऱ्यांनी मका पिकांवर फवारण्या करून पीक येईल की नाही किंवा उत्पादनात घट होईल, असे सांगताना शासन स्तरावर मदतीसाठी उपाययोजना करण्याची मागणी केली. या आढावा भेटीदरम्यान जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजीव पडवळ, जिल्हा परिषद विकास अधिकारी रमेश शिंदे, जिल्हा निफाड उपविभागीय कृषी अधिकारी गोकुळ वाघ, येवला तालुका कृषी अधिकारी कारभारी नवले, निफाड तालुका कृषी अधिकारी श्री. पाटील तसेच कृषी विभागाचे क्षेत्रीय अधिकारी, कर्मचारी व शेतकरी बांधव उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com