मित्राच्या मृत्यूनंतर कुटुंबाला मदतीचा हात 

हसता खेळता चेहरा अचानक निघून गेल्याने सगळे मित्रमंडळ स्तब्ध होते. आता झाले ते झाले, पण त्याच्या कुटुंबाचे काय, असा प्रश्‍न निर्माण होतो, आणि अचानक ३७ वर्षांपूर्वी सुरू झालेला मैत्रीचा झरा वाहू लागतो. अवघ्या चोवीस तासांत तब्बल सव्वापाच लाख रुपये जमतात.
corona
corona

कोल्हापूर : एकेकाळी महाविद्यालयात एकत्र धमाल केलेल्या मित्राचा मृत्यू कोरोनाच्या लाटेत होतो. हसता खेळता चेहरा अचानक निघून गेल्याने सगळे मित्रमंडळ स्तब्ध होते. आता झाले ते झाले, पण त्याच्या कुटुंबाचे काय, असा प्रश्‍न निर्माण होतो, आणि अचानक ३७ वर्षांपूर्वी सुरू झालेला मैत्रीचा झरा वाहू लागतो. अवघ्या चोवीस तासांत तब्बल सव्वापाच लाख रुपये जमतात. ती मदत त्या मित्राच्या कुटुंबाला दिली जाते.  कोरोनाने माणुसकी दुरावत असली, तरी कोल्हापूर कृषी महाविद्यालयाच्या १९८४-८५ च्या बॅचने मात्र मैत्री जिवंत ठेवली आहे. राहुरी (जि. नगर) शुगर फॅक्टरी येथे शेती अधिकारी म्हणून काम करणारे रोहिदास घागरे (वय ५५) यांना कोरानाने हिरावून नेले. परंतु त्याच्या मित्रांनी आपले कर्तव्य निभावत त्यांचे कुटुंब उघड्यावर पडू नये याची काळजी घेतली. परिस्थिती सर्वसाधारण असणाऱ्या कै. घागरे यांच्या कुटुंबीयांना ही मदत लाख मोलाची ठरली.  घागरे यांना काही दिवसांपूर्वी कोरोनीची लागण झाली. त्यांच्याबरोबर पत्नी व मुलगा दोघांनाही कोरोनाने गाठले. पत्नी व मुलाने कोरोनावर यशस्वी मात केली. पण घागरे यांची कोरोनाबरोबर चाललेली झुंज अपयशी ठरली.  घागरे हे कोल्हापूर कृषी महाविद्यालयाचे १९८४-८५ चे विद्यार्थी. परिस्थिती बेताचीच. सुरुवातीला शेती केल्यानंतर त्यांना कारखान्यात नोकरी लागली. काही दिवसांपूर्वी त्यांच्याबरोबरच त्यांनी पत्नी व मुलालाही कोरोनाची लागण झाल्याने संपूर्ण कुटुंब संकटात सापडले. आप्तेष्टांनी शक्य तितके प्रयत्न केले. परंतु रोहिदास घागरे वाचू शकले नाहीत. कुटुंबीयांसाठी हा मोठा धक्का होता.  कोरोनामुळे मानवजीवन हादरून गेले आहे. सर्वच जण संकटात असल्याने कोण कोणाला मदत करणार अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. या परिस्थितीत मदतीचे असे उदाहरण मनोबल मजबूत करणारे ठरत आहे. 

कोरोना संकटात आदर्श  सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमी संपर्कात असणाऱ्या त्यांच्या मित्रांमध्ये आपला खंदा मित्र गेल्याचे कळताच हळहळ व्यक्त झाली. चोवीस तासांतच मदतीचा ओघ सुरू झाला. १ हजारापासून ५० हजार रुपयांपर्यंत प्रत्येकाने मदत केली. सुमारे शंभरहून अधिक वर्गमित्रांनी दिवंगत मित्राच्या कुटुंबाला यथाशक्ती मदत करून मैत्रीचा एका आदर्श नमुना घालून दिला. या मदतीचा कुटुंबाला मोठा आधार झाला. कर्ता पुरुष गेल्याने घागरे कुटुंबीयांवरचे संकट अधिक गडद झाले होते. परंतु जवळ जवळ सदतीस वर्षांपूर्वी एकत्र शिकणाऱ्या मित्रांनी मात्र या दु:खाच्या क्षणी आर्थिक आधाराचा दिलासा या कुटुंबीयांना दिला. संबंधित कारखान्यानेही त्यांना मदत केली.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com