agriculture news in Marathi agri students help friends family after his death Maharashtra | Page 2 ||| Agrowon

मित्राच्या मृत्यूनंतर कुटुंबाला मदतीचा हात 

राजकुमार चौगुले
शनिवार, 15 मे 2021

हसता खेळता चेहरा अचानक निघून गेल्याने सगळे मित्रमंडळ स्तब्ध होते. आता झाले ते झाले, पण त्याच्या कुटुंबाचे काय, असा प्रश्‍न निर्माण होतो, आणि अचानक ३७ वर्षांपूर्वी सुरू झालेला मैत्रीचा झरा वाहू लागतो. अवघ्या चोवीस तासांत तब्बल सव्वापाच लाख रुपये जमतात.

कोल्हापूर : एकेकाळी महाविद्यालयात एकत्र धमाल केलेल्या मित्राचा मृत्यू कोरोनाच्या लाटेत होतो. हसता खेळता चेहरा अचानक निघून गेल्याने सगळे मित्रमंडळ स्तब्ध होते. आता झाले ते झाले, पण त्याच्या कुटुंबाचे काय, असा प्रश्‍न निर्माण होतो, आणि अचानक ३७ वर्षांपूर्वी सुरू झालेला मैत्रीचा झरा वाहू लागतो. अवघ्या चोवीस तासांत तब्बल सव्वापाच लाख रुपये जमतात. ती मदत त्या मित्राच्या कुटुंबाला दिली जाते. 

कोरोनाने माणुसकी दुरावत असली, तरी कोल्हापूर कृषी महाविद्यालयाच्या १९८४-८५ च्या बॅचने मात्र मैत्री जिवंत ठेवली आहे. राहुरी (जि. नगर) शुगर फॅक्टरी येथे शेती अधिकारी म्हणून काम करणारे रोहिदास घागरे (वय ५५) यांना कोरानाने हिरावून नेले. परंतु त्याच्या मित्रांनी आपले कर्तव्य निभावत त्यांचे कुटुंब उघड्यावर पडू नये याची काळजी घेतली. परिस्थिती सर्वसाधारण असणाऱ्या कै. घागरे यांच्या कुटुंबीयांना ही मदत लाख मोलाची ठरली. 

घागरे यांना काही दिवसांपूर्वी कोरोनीची लागण झाली. त्यांच्याबरोबर पत्नी व मुलगा दोघांनाही कोरोनाने गाठले. पत्नी व मुलाने कोरोनावर यशस्वी मात केली. पण घागरे यांची कोरोनाबरोबर चाललेली झुंज अपयशी ठरली. 

घागरे हे कोल्हापूर कृषी महाविद्यालयाचे १९८४-८५ चे विद्यार्थी. परिस्थिती बेताचीच. सुरुवातीला शेती केल्यानंतर त्यांना कारखान्यात नोकरी लागली. काही दिवसांपूर्वी त्यांच्याबरोबरच त्यांनी पत्नी व मुलालाही कोरोनाची लागण झाल्याने संपूर्ण कुटुंब संकटात सापडले. आप्तेष्टांनी शक्य तितके प्रयत्न केले. परंतु रोहिदास घागरे वाचू शकले नाहीत. कुटुंबीयांसाठी हा मोठा धक्का होता. 

कोरोनामुळे मानवजीवन हादरून गेले आहे. सर्वच जण संकटात असल्याने कोण कोणाला मदत करणार अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. या परिस्थितीत मदतीचे असे उदाहरण मनोबल मजबूत करणारे ठरत आहे. 

कोरोना संकटात आदर्श 
सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमी संपर्कात असणाऱ्या त्यांच्या मित्रांमध्ये आपला खंदा मित्र गेल्याचे कळताच हळहळ व्यक्त झाली. चोवीस तासांतच मदतीचा ओघ सुरू झाला. १ हजारापासून ५० हजार रुपयांपर्यंत प्रत्येकाने मदत केली. सुमारे शंभरहून अधिक वर्गमित्रांनी दिवंगत मित्राच्या कुटुंबाला यथाशक्ती मदत करून मैत्रीचा एका आदर्श नमुना घालून दिला. या मदतीचा कुटुंबाला मोठा आधार झाला. कर्ता पुरुष गेल्याने घागरे कुटुंबीयांवरचे संकट अधिक गडद झाले होते. परंतु जवळ जवळ सदतीस वर्षांपूर्वी एकत्र शिकणाऱ्या मित्रांनी मात्र या दु:खाच्या क्षणी आर्थिक आधाराचा दिलासा या कुटुंबीयांना दिला. संबंधित कारखान्यानेही त्यांना मदत केली. 
 


इतर अॅग्रो विशेष
कोकणात तुरळक ठिकाणी मुसळधारेचा इशारा पुणे : कोकणसह राज्यातील काही भागांत मॉन्सून...
राज्यात ठिकठिकाणी धुव्वांधार पुणे : रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुंबई, ठाणे...
दूध उत्पादकांचे उत्पन्न पोचेल २५...गायी म्हशींमधील लिंग विनिश्‍चित वीर्यमात्रांच्‍या...
धरणक्षेत्रांत पावसाचा जोर पुणे : तीन दिवसांपासून कोकणसह, सह्याद्रीच्या...
सरळ कापूस वाण बियाण्यांचा खानदेशात...जळगाव : खानदेशात केळी पट्ट्यात सरळ वाणांची...
मॉन्सूनची वाटचाल सुरूच पुणे : उत्तर भारतात मॉन्सून दाखल झाल्यानंतर...
कृषी सचिव एकनाथ डवले रमले शिवारात नांदेड : राज्याचे कृषी सचिव तथा नांदेड जिल्ह्याचे...
विद्यापीठाच्या कांदा बियाणे विक्रीत ‘...नाशिक/नगर : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर बियाणे...
कृषी पर्यटनातून शेतकऱ्यांना पूरक...पुणे ः सहकार विकास महामंडळाबरोबर झालेल्या...
कोकण, घाटमाथा, विदर्भात अतिवृष्टीचा...पुणे : बंगालच्या उपसागरात कमी दाब क्षेत्र तयार...
दूध उत्पादकांना रोज १४ कोटींचा फटका नगर ः लॉककाडउनमुळे दुधाची मागणी घटल्याचे सांगत...
महिला गटाने रुजविले शेती, पूरक...कुशिवडे (ता. चिपळूण, जि. रत्नागिरी) आणि म्हाप्रळ...
डिजिटल सात-बारासाठी ५१ बँकांनी केले...पुणे : शेतकऱ्यांची गैरसोय दूर करण्यासाठी डिजिटल...
कांदा बीजोत्पादनात कंपन्याच मालामाल जळगाव : खानदेशात अनेक कांदा बियाणे निर्मात्या...
‘डीएससी’अभावी हजारो कोटी पडून पुणे ः पंधराव्या वित्त आयोगाचा पाच हजार कोटी...
घृष्णेश्‍वर कंपनीची सातत्यपूर्ण उंचावती...एका गटापासून सुरुवात करून विविध उपक्रम, त्यात...
२५ एकरांत शेडनेट्‍स, आदिवासींची सामूहिक...नगर जिल्ह्यात म्हाळुंगी (ता. अकोले) परिसरातील...
विदर्भात पावसाचा जोर पुणे : मॉन्सून उत्तरेकडे सरकत असताना राज्यातील...
लिंबे तोडणीलाही महाग अकोला ः कोरोनामुळे यंदा शेतकऱ्यांना मोठा फटका...
मॉन्सून जोमात, पीककर्ज कोमात पुणे ः दोन वर्षांपासून सुरू असलेल्या कोरोना...