agriculture news in Marathi agri tourism under threat due to corona Maharashtra | Agrowon

कोरोनामुळे कृषी पर्यटन व्यवसाय अडचणीत 

विकास जाधव
शनिवार, 4 एप्रिल 2020

कोरोना संकटामुळे सर्वत्र काळजीचे वातावरण आहे. या ससंर्ग टाळण्यासाठी लॅाकडाऊन सुरू असल्यामुळे कृषी पर्यटनाचा व्यवसाय अडचणीत आला आहे. यासाठी कर्जाचे हप्ते, व्याजात सवलत द्यावी. तसेच हा व्यवसाय सुर राहण्यासाठी शासनाने मदत करावी. 
- आनंदराव शिंदे, आनंद कृषी पर्यटन केंद्र, बोरगाव. ता. सातारा

सातारा : कोरोनाच्या संसर्गामुळे दिवसेंदिवस बळी वाढत असल्यामुळे सर्वत्र भितीचे वातावरण आहे.त्यामुळे लॅाकडाऊनचा उद्योगधंद्यासह शेती आणि शेती पूरक व्यवसायांनाही बसला आहे. कृषी पर्यटन केंद्रांचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या सातारा जिल्ह्यातील कृषी पर्यटन व्यवसाय कोलमडला आहे. ऐन हंगामात केंद्रे बंद ठेवावी लागल्यामुळे कोट्यवधी रुपयांचा तोटा सहन करावा लागणार आहे. परिणामी कर्जाचा डोंगर वाढणार असल्याने कर्जाच्या हप्ता व व्याजात सवलत देण्याची मागणी शेतकरी केंद्रचालकाकडून केली जात आहे. 

शेतकऱ्यांनी शेतीतील धोके कमी व्हावे तसेच शेती शाश्वत होण्याच्या दृष्टीने कृषी पर्यटन व्यवसाय पुढे आला. जिल्ह्यात उपलब्ध असलेल्या नैसर्गिक साधन संपत्तीमुळे या व्यवसायाकडे शेतकऱ्यांचा कल वाढत गेला. जिल्ह्यातील महाबळेश्वर, पाचगणी, कास, ठोसेघर, तापोळा, प्रतापगड या प्रमुख ठिकाणांमुळे कृषी पर्यटनास प्रतिसाद मिळत गेला. हा व्यवसाय शेतीला पूरक म्हणून फायदेशीर वाटू लागल्याने मागील सात ते आठ वर्षांत जिल्ह्यात सुमारे १२२ कृषी पर्यटन सुरू झाली आहेत. 

शेतकऱ्यांनी कर्ज काढून कोणत्याही अनुदानाची प्रतीक्षा न करता हे व्यवसाय सुरू झाले. शेतकऱ्यांचा उत्साह पाहून सातारा जिल्हा मध्यवर्ती बॅंकेने कृषी पर्यटन करणाऱ्या शेतकऱ्यांना कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करून दिली आहे. या कर्ज पुरवठ्यामुळे केंद्रे उभे करताना शेतकऱ्यांना आर्थिक अडचणीही कमी झाल्या. जिल्ह्यात प्रत्येकवर्षी केंद्राच्या संख्येत भर होत असून सध्या १२२ कृषी पर्यटन केंद्र आहेत.

महाबळेश्वर, जावळी, सातारा, वाई, कऱ्हाड, कोरेगाव या तालुक्यात सर्वाधिक कृषी पर्यटन केंद्रे आहेत. कार्यरत असलेल्या सुमारे ८० टक्के कृषी केंद्रास सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेने अर्थसाहाय्य केले आहे. या व्यवसाचा प्रमुख हंगाम दिवाळी व उन्हाळी सुट्यांचा असतो. दिवाळीही पाऊस लांबल्याने केंद्रांना अपेक्षित व्यवसाय झाला नाही. त्यामुळे एप्रिल, मे मधील हंगामाकडे शेतकऱ्यांच्या आशा लागल्या होत्या. 

कृषी पर्यटनास मामाचे गाव म्हणून संबोधले जात असल्याने उन्हाळ्याच्या सुट्यांत सर्वाधिक पर्यटक केंद्रात येत असतात. मात्र या हंगामावर कोरोनाचे सावट आल्याने हा व्यवसाय पूर्णपणे कोलमडणार आहे. सध्या सुरू असलेले लॅाकडाऊन तसेच कोरोनाचा वाढता प्रभाव यामुळे हंगाम सुरू होण्याची शक्यता कमी झाली आहे.

गतवर्षीच्या आकडेवारीच्या विचार करता हा हंगामा वाया जाणार असल्याने या केंद्राचा अंदाजे १० ते १५ कोटी रुपयांच्या दरम्यान नुकसान होणार असल्याचे शेतकरी केंद्र चालक सांगत आहे. हंगाम वाया जाणार असल्याने कर्जाचे हप्ते भरता येणार नसल्याने केंद्रचालक आर्थिक अडचणीत येणार असून कर्जाचा फुगवटा वाढणार आहे. तसेच केंद्रावर कामास असलेल्या कामगारांचा रोजगार जाणार असल्याने बेकारीतही वाढ होणार आहे. एकुणच कोरोनामुळे इतर व्यवसायाप्रमाणे कृषी पर्यटन व्यवसाय कोमात जाण्याची भिती निर्माण झाली आहे. 

कर्ज हप्ते स्थगित करावे 
कोरोनामुळे हा पुर्णतः वाया जाणार आहे. यामुळे शेतकऱ्यांनी व्यवसायासाठी काढलेल्या कर्जाचे हप्ते व व्याज भरणे शक्य होणार नाही. यामुळे हा व्यवसाय टिकावा यासाठी कर्जाचे हप्ते किमान सहा ते आठ महिने स्थगित करावेत. तसेच या व्यवसायासाठी घेतलेल्या कर्जाच्या व्याजात सवलत दिली जावी अशी मागणी कृषी पर्यटन केंद्रचालक शेतकऱ्यांकडून केली जात आहे. 


इतर अॅग्रो विशेष
मराठवाड्यात जोरदार पावसाचा पिकांना फटकाऔरंगाबाद, परभणी : औरंगाबाद, जालना, बीड, लातूर,...
हजारो टन कांदा निर्यातीच्या प्रतीक्षेतमुंबई/नाशिक : देशभरात कांदा निर्यातबंदी...
बीटी वांग्याच्या दुसऱ्या टप्प्यातील...पुणे : देशभरात चर्चेत असलेल्या बीटी वांग्याच्या...
साखर निर्यातीचे करार ५७ लाख टनांवरकोल्हापूर : देशातल्या साखर निर्यातीचे करार आता ५७...
तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यतापुणे ः बंगालचा उपसागर व उत्तर तामिळनाडूच्या...
दूध सल्लागार समिती कागदावरचपुणे : राज्यस्तरीय दूध सल्लागार समितीची एकही बैठक...
राज्यात मोसंबी १००० ते ४००० रुपये...औरंगाबादमध्ये १००० ते २५०० रुपये प्रतिक्विंटल...
कांदा, लसूण शेतीत बहिरवाडीने मिळवली...बहिरवाडी (ता. जि. नगर) हे छोटे गाव कांदा व लसूण...
स्पर्धेत टिकण्यासाठी ‘ई-नाम’केंद्र सरकारने कृषी, पणन व्यवस्थेत सुधारणा घडवून...
बाजार सुधारणांत नको राजकीय धुळवडकोरोनाच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या संसद...
सुपारी फळगळीचे संकटसिंधुदुर्ग: मुसळधार झालेला पाऊस आणि सतत ढगाळ...
कोकण, मराठवाड्यात पावसाची शक्यतापुणे ः गेल्या काही दिवसांपासून राज्यातील काही...
कांदा निर्यातबंदीविरोधात मराठवाड्यातही...औरंगाबाद/परभणी: केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी...
निर्यातबंदीमुळे कांदा दरात मोठी घसरणनाशिक: केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी केल्याचा...
कांदा निर्यातबंदी विरोधात नाशिक...नाशिक: प्रतिकूल हवामान, वाढलेला उत्पादन खर्च व...
‘स्मार्ट’च्या २८ पथदर्शक प्रकल्पांना...पुणे: कृषी खात्याच्या ‘स्मार्ट’ प्रकल्पातून...
सांगली जिल्ह्यात द्राक्ष फळ छाटणी...सांगली ः जिल्ह्यात सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात...
मराठवाड्यात पावसाचा जोर कायमपुणे ः गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्यातील...
राज्यात तीन वर्षांत ‘ई-नाम’द्वारे ...पुणे: केंद्र सरकारने सुरु केलेल्या राष्ट्रीय...
दर्जेदार रोपनिर्मिती पेपरपॉट, पीट मॉसचा...रोपनिर्मिती चांगल्या प्रकारे होण्यासाठी...