agriculture news in marathi agri transforamation is possible through public participation | Agrowon

लोकसहभागातून परिवर्तन शक्य

डॉ. कैलास बवले
शुक्रवार, 1 मे 2020

‘आमचं गाव- आमचा विकास' या लेखमालेच्या निमित्ताने राज्यभरातून ग्रामविकासाबाबत विविध प्रश्न आणि समस्या लोकांनी मांडल्या. शाश्वत ग्रामविकास होण्यासाठी ज्ञानग्राम चळवळ ही गावातील सकारात्मक परिवर्तनासाठी उपयुक्त ठरू शकते. गावाच्या विकासासाठी सामुहिक नेतृत्वाची अत्यंत आवश्यकता आहे.

‘आमचं गाव- आमचा विकास' या लेखमालेच्या निमित्ताने राज्यभरातून ग्रामविकासाबाबत विविध प्रश्न आणि समस्या लोकांनी मांडल्या. शाश्वत ग्रामविकास होण्यासाठी ज्ञानग्राम चळवळ ही गावातील सकारात्मक परिवर्तनासाठी उपयुक्त ठरू शकते. गावाच्या विकासासाठी सामुहिक नेतृत्वाची अत्यंत आवश्यकता आहे.

‘आमचं गाव आमचा विकास' ही ग्राम विकासाची अत्यंत महत्त्वाची योजना राबविताना ग्राम पातळीवर मोठ्या प्रमाणावर माहितीचे अज्ञान आणि उदासीनता दिसून येते. या लेखमालेच्या निमित्ताने राज्यभरातून ग्रामस्थ, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि शासकीय पदाधिकारी, स्वयंसेवी संस्थेचे पदाधिकारी यांनी देखील आपली मते मांडली. त्यानुसार हे विश्‍लेषण करताना ग्रामपंचायतींचे वर्गीकरण, प्रतिसाद देणाऱ्या ग्रामस्थांचे क्षेत्रानुसार वर्गीकरण, त्यांनी मांडलेल्या समस्या व या समस्यांवर सुचविलेल्या शिफारशी याची मांडणी करण्याचा प्रयत्न आहे. ‘नॉलेज-कॉलेज-व्हिलेज' या सहयोगी योजनेची व्यवहार्यता, ज्ञानग्राम चळवळीची गरज आणि स्विकारार्हता याची मांडणी करणे महत्त्वाचे ठरणार आहे.

समस्यांचे वैविध्य 

  • ‘आमचं गाव- आमचा विकास' या योजनेची माहिती बहुतांश लोकांना नाही, हे सर्वांनी मान्य केले. योजनेबाबत माहिती नसल्याने अज्ञानातून ग्राम पातळीवर विकासाच्या विविध समस्या निर्माण होतात. ग्रामविकासात अज्ञान आणि असंघटित ग्रामस्थांमध्ये मोठ्या प्रमाणात अडथळे निर्माण होत असल्याचे बऱ्याच लोकांचे म्हणणे आहे.
  •  ग्रामसभा या गावाच्या संसद आहेत, असे आपण म्हणतो. त्या अपवाद वगळता कुठेच पूर्ण गणसंख्येसह होत नाहीत. ग्रासभेबाबत गाव पातळीवर सर्वच घटकांमध्ये प्रचंड उदासीनता आहे. त्याचे कारण म्हणजे ग्रामसभेच्या आयोजनाबाबत गावात वातावरण निर्मितीतून जागृती निर्माण केली जात नाही. त्याची कारण मीमांसा सांगताना गावातील विकासाची कामे करताना व योजना राबविताना अनुदान वितरणात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होतो. पारदर्शकता नसते, अनियमितता होते.
  • ग्रामविकास आराखडे तयार करताना गावाच्या मूलभूत गरजांचा विचार होतोच असे नाही. बहुतेक आराखडे हे नक्कल स्वरूपाचे असतात. गावाच्या लोकसंख्येच्या आकारानुसार अंदाजपत्रकीय आकडे बदलून हा विकास आराखडा तयार केल्याचेही काहींनी बोलून दाखवले.
  • गावातील वेगवेगळ्या गटांनी, पक्षांच्या सत्ताधाऱ्यांनी केलेल्या कामातील अपारदर्शकता, दर्जाहीन काम हे बाहेर येऊ नये म्हणून एकमेकांच्या कारभारावर पांघरूण घालून पुढे जाण्याची स्थिती देखील काही ठिकाणी दिसून आली.
  • कामातील अफरातफरीमुळे लोक आपल्याला प्रश्‍न विचारतील या भीतीने देखील ग्रामसभा घ्यायला संबंधित ग्रामपंचायत पदाधिकारी घाबरतात. काही ठिकाणी गावातील लोकच सत्ताधाऱ्यांना फितूर असतात. ते संगनमताने अपारदर्शक कारभार चालवितात. या सर्व बाबी ग्रामविकासातील अडथळे आहेत.

सहयोगी योजनेचा स्वीकार (ज्ञानग्रामास पसंती)

  •  विकासाभिमुख ग्रामविकास आराखडे तयार करुन त्याच्या पारदर्शक अंमलबजावणी व गुणवत्तापूर्ण काम होण्यासाठी मांडण्यात आलेली, नॉलेज-कॉलेज-व्हिलेज सहयोगी योजना ही ग्राम विकासासाठी योग्य ठरणारी आहे. ज्ञानग्राम चळवळ ही गावागावातील सकारात्मक परिवर्तनासाठी उपयुक्त ठरू शकते.
  •  गावातील विकास कामासाठीचा श्रेयवाद हा देखील एक अडथळा आहे. त्यामुळे व्यक्तिकेंद्रित व नेताधारित विकास प्रतिमान बदलण्याची गरज आहे. त्या ऐवजी सामुहिक नेतृत्व विकास आवश्यक आहे.
  •  गावातील तरुण, युवक आणि अभ्यासकांची एक ग्रामविकास समिती निर्माण केल्यास त्या समितीच्या माध्यमातून सामूहिक नेतृत्वातून ग्रामविकासाचे असे प्रतिमान निर्माण होईल.

गावातील युवकांचे संघटन आणि प्रशिक्षण

  • प्रत्येक गावाच्या विकासाची तळमळ असणारे आणि त्यासाठी आपले योगदान देण्याची इच्छा असणारे युवक आहेत. मात्र त्यांना ग्रामविकास कामात जाणीवपूर्वक सहभागी होऊ दिले जात नाही.
  • उत्साही, प्रामाणिक, राजकारणापासून अलिप्त असणाऱ्या युवकांना गाव पातळीवर ग्रामविकासात सहभागी करून घ्यावे. त्यासाठी ग्रामपंचायत सदस्यांच्या दुप्पट संख्येची गावामध्ये ‘युवा ग्रामविकास परिषद' तयार करून त्यास ग्राससभेची मान्यता घेतली पाहिजे.

अनिवासी गाववासींचा विकासात सहभाग
प्रत्येक गावातून शिकलेले काही तरुण नोकरी व कामधंद्यासाठी शहरात गेलेले आहेत. त्यांची देखील गावाच्या विकासात योगदान देण्याची इच्छा व भूमिका असते. अशा अनिवासी ग्रामस्थांना एकत्र करून त्यांचा सहभाग ग्रामविकासात घेणे फायद्याचे ठरणार आहे.

संपर्क - डॉ.कैलास बवले, ८८८८८९२७५७
(समन्वयक,डॉ.धनंजयराव गाडगीळ शाश्‍वत ग्रामविकास केंद्र, गोखले अर्थशास्त्र संस्था, पुणे)


इतर ग्रामविकास
शेती. शिक्षण, विकासकामांतून पुढारलेले...भाटपुरा (जि.धुळे) गावाने सिंचनाचे शाश्‍वत स्त्रोत...
ज्ञानग्राम-शाश्‍वतग्राम निवडीचे निकषज्ञानग्रामासाठी निवड करण्याची मागणी गावाकडूनच आली...
नॉलेज-कॉलेज-व्हिलेज' योजनेचा आराखडा‘नॉलेज- कॉलेज- व्हिलेज' सहयोगी योजना ही मागणी...
आदिवासी शेतकऱ्यांच्या जीवनात झाला बदलटाटा ट्रस्ट `सेंट्रल इंडिया`च्या माध्यमातून...
स्नेहग्राम बनलंय उपेक्षित मुलांचा आधारसमाजातील वंचित, उपेक्षित घटकासह, एकल पालकांच्या...
सर्वसमावेशक ग्रामविकास आराखडा महत्वाचाविविध प्रकारच्या स्वयंसेवी संस्था ग्रामीण भागात...
लोकसहभागातून परिवर्तन शक्य‘आमचं गाव- आमचा विकास' या लेखमालेच्या निमित्ताने...
ग्रामविकास आराखड्यातील जबाबदाऱ्यांचे...प्रत्यक्ष गाव पातळीवर ग्रामपंचायतींना...
शेलगाव बाजारने मिळवला ‘स्मार्ट ग्राम’...बुलडाणा जिल्ह्यातील शेलगाव बाजार गावाने अलीकडील...
शाश्‍वत विकासाचा आराखडागावांच्या भौतिक विकासाच्या सार्वजनिक योजना आणि...
विविध उपक्रम, सुविधांतून नाव कमावलेले...कोल्हापूर जिल्ह्यात शिरोळ तालुक्‍यातील धरणगुत्ती...
ग्रामविकासातील अडथळेकेंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजना आहेत....
स्वयंसेवी संस्था निवडीचे निकषआदर्शगाव ही योजना स्वयंसेवी संस्थांमार्फत...
तयार करा ग्रामविकास आराखडासरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पोलिस पाटील,...
जलतंत्रज्ञानाच्या वापरातून प्रगतीची उंच...अकोला जिल्ह्यातील अन्वी मिर्झापूर येथील केशवराज...
शहर अन् गावाचा अनोखा मिलाफ - सिलेज‘सिलेज' ही संकल्पना ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ ...
केळी, मका पिकांसह दुग्धव्यवसायात...दापोरी (जि. जळगाव) गावाने केळी, मका, कापूस...
शेती, शिक्षण अन् ग्रामविकासाचा वसालोटे-परशुराम (जि. रत्नागिरी) येथील श्री विवेकानंद...
नागापूरमध्ये झाली धवलक्रांतीविविध कारणांमुळे विदर्भात दुग्ध व्यवसायाला उतरती...
ग्रामस्वच्छता, जलसंधारणातून मधापुरीची...सामूहिक प्रयत्नातून गावाचा कसा कायापालट करता येऊ...