Agriculture news in Marathi The agricultural admission process is close to CET | Agrowon

कृषी प्रवेशप्रक्रिया ‘सीईटी’कडेच 

टीम अॅग्रोवन
बुधवार, 13 ऑक्टोबर 2021

कृषी शिक्षणाच्या विविध अभ्यासक्रमांसाठी राबविली जाणारी प्रवेशप्रक्रिया सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडूनच (सीईटी सेल) होईल, असा निर्वाळा शासकीय सूत्रांनी दिला. 

पुणे ः कृषी शिक्षणाच्या विविध अभ्यासक्रमांसाठी राबविली जाणारी प्रवेशप्रक्रिया सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडूनच (सीईटी सेल) होईल, असा निर्वाळा शासकीय सूत्रांनी दिला. 

प्रवेशप्रक्रियेचे काम पूर्वीप्रमाणेच सीईटीऐवजी महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेकडे (एमसीएईआर) सोपविण्याचे संकेत शासनाने यापूर्वी दिले होते. उपमुख्यमंत्र्यांच्या एका बैठकीत तशी चर्चादेखील झाली होती. मात्र ‘प्रवेशप्रक्रिया आमच्यामार्फतच व्हावी’, असा प्रस्ताव सीईटी प्रशासनाकडून आणण्याचे प्रयत्न सुरू होते.  त्यामुळे प्रवेशप्रक्रिया सीईटी कक्ष राबवितो, की ते काम कृषी परिषदेकडे सोपविले जाते, याबाबत कृषी शिक्षण क्षेत्रात चर्चा झडते आहे. 

कृषी पदवीला व्यावसायिक शैक्षणिक अभ्यासक्रमाचा दर्जा देण्यात आला आहे. व्यावसायिक दर्जा मिळताच परीक्षेसाठी सीईटी पद्धत लागू करावी लागते. एकदा परीक्षेचे काम सीईटीमार्फत केले गेल्यास पुढे प्रवेशदेखील सीईटीनेच घ्यावे, असे नियम सांगतो. 

‘‘कायद्यामध्ये व्यावसायिक अभ्यासक्रमाची प्रवेशप्रक्रिया सीईटी कक्षाकडे दिलेली आहे. यापूर्वी सोयीचा भाग म्हणून कृषी परिषदेकडे प्रवेशाचे काम दिले गेले होते. ही चूक होती. मात्र पुन्हा नियमाप्रमाणे सीईटीकडेच प्रक्रिया सोपवून झालेली चूक दुरुस्त करीत आहोत, असा मुद्दा सीईटी कक्षाने राज्य शासनासमोर मांडला. तसेच प्रवेशप्रक्रियेत अडचणी येणार नसल्याची हमीदेखील दिली आहे,’’ अशी माहिती कृषी परिषदेच्या सूत्रांनी दिली. 

कृषी पदवीची व्यावसायिक प्रवेशप्रक्रिया राबविणारा ‘सक्षम प्राधिकारी’ म्हणून कायद्यात कृषी परिषदेचा नव्हे; तर सीईटी कक्षाला उल्लेख आहे. त्यामुळे इच्छा असूनही प्रवेशाची कामे परिषदेकडे सोपविता येत नाहीत. असे असूनही कृषी विभागाने ही प्रक्रिया आमच्याकडे (परिषदेकडे) सोपविण्याची लेखी विनंती करून पाहिली. मात्र त्यास आता नकार मिळाला आहे.

‘‘प्रवेशप्रक्रिया पूर्णतः परिषदेला देता येत नसेल तर किमान परिषदेच्या समन्वयाने तरी राबवावी, अशीही विनंती करण्यात आली. मात्र काही चुका झाल्यास त्याला नेमके जबाबदार कोणाला ठरवायचे, असा मुद्दा उपस्थित झाला. त्यामुळे परिषदेचा समन्वयदेखील यात असू नये. संपूर्ण प्रक्रियेत सीईटी कक्षाशिवाय कोणत्याही यंत्रणेचा भाग असू नये, असे स्पष्ट केले गेले,’’ अशी माहिती सूत्रांनी दिली.

प्रवेशप्रक्रिया नोव्हेंबरपासून शक्य
परीक्षेची कामे संपुष्टात आल्यानंतर निकाल लागण्यासाठी दोन-तीन आठवडे जातील. त्यानंतर अंदाजे एक नोव्हेंबरपासून प्रवेशप्रक्रियेला सुरुवात होण्याची शक्यता आहे, असे कृषी विद्यापीठ सूत्रांचे म्हणणे आहे.


इतर अॅग्रो विशेष
अन्नधान्य भाववाढीच्या चर्चा निराधारपुणे : सध्या अन्नधान्य महागाईच्या चर्चांना ऊत आला...
राज्यात थंडीची चाहूलपुणे : नैऋत्य मोसमी वारे (मॉन्सून)...
इंधन दरवाढ, महागाई दिसत नाही, कांद्याची...नाशिक : एकीकडे इंधन खर्च, निविष्ठांचे वाढते दर,...
पावसामुळे द्राक्ष हंगामात अडचणी वाढल्यानाशिक : सप्टेंबर महिन्यापासून द्राक्ष उत्पादक...
सरासरी ते सरासरीपेक्षा कमी तापमानाचा...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) १४...
महाराष्ट्राच्या समृद्ध पीकसंपदेचा...संगमनेर, जि. नगर ः ‘‘महाराष्‍ट्रात पिकांची मोठी...
सांगली जिल्ह्यात ५० टक्के द्राक्ष...सांगली : जिल्ह्यात द्राक्ष पिकाच्या फळछाटणीची गती...
लखीमपूर खेरी घटनेतील  शेतकऱ्यांच्या...वर्धा : उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे भाजप...
राज्यभरात निघणार लखीमपूर खेरी  किसान...  नाशिक : उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खेरी...
गोड्या पाण्यात निर्यातक्षम व्हेमानी...गोड्या पाण्यात कोळंबी व त्यातही ‘व्हेनामी’ जातीचे...
‘ऑयस्टर’ मशरूमला मिळवली बाजारपेठसांगली जिल्ह्यातील बावची येथील प्रदीप व राजेंद्र...
कृषी विकासाचे भगीरथ ठरलेल्या...पुणे : कष्टकरी शेतकऱ्यांच्या मनगटाला बारा...
राज्यात ‘ऑक्टोबर हीट’चा प्रभावपुणे : राज्याच्या तापमानात चढ-उतार सुरूच आहेत....
शेती, पर्यावरण संवर्धनातून वाघापूरची...पुणे जिल्ह्यात वाघापूर गावाने लोकसहभागातून आपले...
भाजपतर्फे एक नोव्हेंबरला काळ्या फिती...परभणी : मराठवाडा, विदर्भातील अतिवृष्टिग्रस्त...
नाशिक :कांदा व्यापाऱ्यांवर आयकर...नाशिक : जिल्ह्यात कांदा विक्रीसाठी आघाडीवर...
गुजरातमधून गुळाला मागणी वाढलीकोल्हापूर : यंदा गुजरातमधून गुळाला मागणी वाढत आहे...
अनिश्‍चित काळासाठी रस्ते अडविता येणार...नवी दिल्ली ः आंदोलन करण्याचा शेतकऱ्यांना अधिकार...
निर्यात पडतळमुळे सोयाबीन दराला आधारपुणे : देशात सोयापेंडचे दर अधिक होते त्यामुळे...
राज्याच्या तापमानात चढ-उतारपुणे : राज्यात पावसाने उघडीप दिल्यानंतर तापमानात...